Rutuja kulkarni

Romance Others

2  

Rutuja kulkarni

Romance Others

अल्लडं मनाचा खेळ...

अल्लडं मनाचा खेळ...

3 mins
132


       आज तब्बल दोन महिन्यानंतर तुझा मेसेज पाहून एरवी 'व्हॉटस अप',चे मेसेज पाहणे सहसा टाळणारी मी मात्रं आज नोटिफिकेशनमधे तुझे नाव पाहून लगेच 'व्हॉटस अप', ओपन ही केले खरे, परंतु तुझा मेसेज पाहण्यासाठी इतकी आतुर झालेली असतांना ही मनांत एक धाकधूक, होत होती. खरचं काय होतंय हे मलाही कळंत नव्हतं. का मी ईतकी आतुर होतं होते पुन्हा ही..!


    'व्हॉटस अप ', ओपन करून पुन्हा क्लोज करने जवळपास गेले अर्धा तास हाचं खेळ चालला होता माझा, शेवटी एकदा आता ठरवले, बास! काहीही असेल मला तुझ्या मेसेज ने काही फरक पडता कामा नये, आणि मनांमध्ये पाच आकडे मोजून ओपन केला तुझा मेसेज आणि.... तिथेचं कोसळले मी पुन्हा नव्याने..।


      खरेतरं आपले ठरले होते की फक्त आणि फक्त मैत्री बाकी काही नाही आणि ते ठरवून चं आपन आपल्या मैत्रीच्या नात्याची सुरुवातं केलेली कारण ही आपल्याला अगदी ठाम माहित होते की, आपल्याला एकमेकांना ची सोबत आवडते पण आपल्या दोघांनाही नको होतं ते इमोशनल असे काही आपल्यामध्ये म्हणून आपल्या नात्याचा फंडा ही हा चं होता की, "No Complains, No Demands, No Emotional Attachments and No Dramas", हो अगदी सगळे ठरले होते ना आपले आणि आपण ही वागत होतो अगदी तसेच ठरवल्याप्रमाणे, पण मी विसरले आपला फंडा, हो तु खुशाल लाव माझ्यावर विश्वासघात, मी वचन नाही पाळले म्हणून, पण मी हे मुद्दाम नाही केले हे मी तुला त्यावेळी ही सांगितले होते आणि आजही तू विचारले तरी माझा उत्तर हेचं असेल.


जवळपास एक वर्ष आपण सोबत होतो आणि खूप छान ठरल्याप्रमाणे वागलो ही, पण या सगळ्यांमध्ये मी कधी तुझ्यामधे कधी गुंतले हे मलाही कळले नाही, आणि मला जाणीव झाल्यावरं मी तुला माझा मित्र समजून सांगितले, आणि मला अपेक्षा होती तु समजून घेशील मित्र म्हणून, पण तू मात्र माझ्यावर वचन मोडणारी, आणि असे कितीतरी आरोप ठेवून मोकळा झालास आणि त्या नंतर ना मेसेज केलास ना फोन,ना माझ्या कुठल्या मेसेज, फोन ला Reply दिलास मग मी ही सोडून दिले, आणि त्या नंतर आज अचानक दोन महिन्यांनी मेसेज केलास ते ही काय, ' माझे लग्न ठरले आहे आणि मला आता तुझ्याशी पुन्हा कधीही नाही बोलायचे आहे, म्हणून मी तुला ब्लॉक करतोय ".


        हो ठरवून ही मी तुझ्याशी त्यावेळी अटैच झाले, गुंतले आणि आताही मला फरक नाही पडला पाहिजे असे ठरवून ही पुन्हा कोसळले मी, खरेतर ब्लॉक तू आधीच केले होते आपल्या मैत्रीलाही आणि मलाही, तरीही पुन्हा मला वाईट वाटलं चं.. शेवटी आपण कितीही ठरवले तरी या मनाचं काय?, आपण जेंव्हा ठरवतो तेव्हा आपल्याला असे वाटते की आपण जे डोक्याने ठरवतो ते मनाला ही पटते, पण प्रत्येकवेळी असे होते चं असे नाही, काही वेळा मन आपल न ऐकता त्याला जे हव असते ते चं करते आणि आपण मात्र स्वतःला दोष देत राहतो कधी, तर कधी उगाचंच त्या प्रवाहात वाहत जातो.

      कदाचित याला चं तर 'मनाचा खेळ ', म्हणत असतील. आणि मग माधुरी दीक्षितचे हे गाणे ऐकून ओठांवर हसू येते 

     "दिल तो पागल है, दिल दीवाना है।।"


      खरंच हे मन असचं असतं ना अल्लड, चंचल, जसे एखाद लहान मुलं.. कधी त्या लहान मुलाचे लाड पुरावेही लागतात, तसे कधी काही भावनांना कुरवाळावे, गोंजारावे लागते तर कधी कधी काही भावनांना वेळीचं थांबवण्यासाठी धाक ही दाखवावा लागतो..पण काहीही म्हणा हा 'मनाच्या खेळाचा ', रंग औरच असतो..!


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance