STORYMIRROR

Arun Gode

Inspirational

3  

Arun Gode

Inspirational

अडथळा

अडथळा

4 mins
157

     एका साधारण कुंटुंबात एक सर्वात लहान मुलगा होता. तो लहान असल्यामुळे सर्वांचा लाडका होता. त्यामुळे त्याच्या वर विशेष घरातील जवाबदारी नव्हती. त्यामुळे त्याच्या जवळ इतर मुलांपेक्षा जास्त वेळ होता. तो डोक्याने हुशार होता पण इतर मुलांसारखा अभ्यासु नव्हता. त्याचा अभ्यास म्हणजे चालत-फिरता करीत होता. त्याच्या मित्राची रांग ही त्याच्या पेक्षा वयाने लहान-मोठे अशी होती. त्याच्या घरा समोर एक वयाने मोठा असा मित्र राहत होता. तो ब-याच वर्षापासुन दहावी बोर्डा मधे सारखी गचकणी खात होता. मेहनत करुनही त्याची अवस्था कसले काय अन फाटक्यात पाय अशीच होती. नविन अभ्याक्रम सुरु झालामुळे त्याच्या जवळ दहावीं बोर्डची परिक्षा पास करण्यासाठी सिमित संधी राहिली होती. त्यामुळे त्याचे आई-वडिल तो घरात मोठा असल्यामुळे चिंतित होते. संपूर्ण कुंटुंब सापळ्यात अडकले होते. चिंध्या वेचलेल्या अन गोदडया शिवलेल्या परिस्थिति कुंटुंबाची होती.त्याच्या आई-वडिलाला त्याच्या मित्राचा हेवा वाटत होता. खूप शिकवणी वैगरे लावल्या होत्या. तरी तो गणित या विषया मधे पास होत नव्हता.त्याचे आई-वडिल नेहमी त्यांच्या लेकाला म्हणायचे की तु तुझ्या मित्रा सोबत अभ्यास करित जा !. त्यामुळे तो जेव्हा कधी अभ्यास करित राहत होता. तेव्हा त्याचा मित्र नेमका त्याच्या सोबत बसत होता. अडला हरी गाढवाचे पाय धरी अशी त्याची अवस्था होत होती.त्याने एक दिवस मित्राचे अचानक गणिताचे पुस्तक बघितले होते. तेव्हा तो म्हणाल हे सर्व काही त्याच्या अभ्याक्रमात पण होते.अरे हे नविन गणित खूप सोपे आहे. त्याने लगेच मित्राचे काही गणिताचे उदाहरणे पण करुन दाखवले होते. त्याचे वडिल म्हणाले होते कि तु याला रोज शिकवत जा. सुरवातीला त्याला ते आवडत नव्हते. पण तो ज्या पध्दतीने त्याला सांगत होता. ते त्याला लवकर-लवकर गवसत होते. त्याने मग त्याचे बोर्डाचे मागिल सर्व वर्षांच्या परिक्षेचे प्रश्न पत्रिका बघितल्या होत्या. प्रत्येक वेळस तेच प्रश्न आलटुन-पालटुन विच्यारल्या जात होते .फ्क्त अंकाची अदला-बदली राहत होती. कधी तेच प्रश्न मागे-पुढे किंवा क्रम बदलून विचारल्या जात होते.

      त्याच्या कनिष्ठ मित्राने विचार केला कि आपल्या मित्राला फक्त गणित या विषयातच पास व्हायचे होते. बाकी तो सर्व विषयात उत्तीर्ण झाला होता.गणितात पास होने हाच एक मात्र अडथळा दिसत होता. त्याने त्याच्या सोबतच काही सोपे आणि नेहमी हमकास येणार प्रश्न त्याला सोडवायला प्रेरित करित होता. तेव्हा त्याच्या लक्षात आले होते कि त्याच्या मित्राल मुळातच गणिताचे सामान्य नियम किंवा तत्व माहित नाही. ते त्याने कधी कोना कडुन कधी शिकण्याचा प्रयत्न केला नव्हता. त्यामुळे त्याचा गणिताचा मूळ पायाच पक्का झाला नव्हता. त्याचे वडिल पण याच कारणा मुळे शिकले नव्हते. त्यांचा असा समज होता कि आडात नाहीतर पोह-यात कसे येईल !. त्यामुळे ते मुला पेक्षा स्वतःलाच यासाठी दोषी मानत असे. त्याच्या मित्राला त्यांचा हा भ्रम दूर करायचा होता.म्हणुन त्यासाठी शिव धनुष्य पेलवुन घेतले होते. आपल्या मित्राचे अष्टकोनी वाटोळे होऊ नये म्हणुन तो गतिशिल व कियाशिल झाला होता. 

         त्याने प्रथम त्याच्या मित्राला मूलभूत गणिताचे नियम कधी अभ्यास करतांना तर क्धी-कधी खेळता-खेळता, व फिरता-फिरता त्या मूल-भूत नियमाची उजळणी करित होतो. त्या मुळे ते त्याच्या चांगलेच डोक्यात आत पर्यंत शिरले जात होते. आणी तो त्याला नेहमी सांगत होतो की याच नियमाचा प्रत्येक उदाहरणात उपयोग नियमित करावयाचा असतो. त्यामुळे तो बरेच प्रश्न हळु-हळु टप्या-टप्याने ब-याच टप्या पर्यंत सोडवत जात होता. हळु-हळु तो प्रश्नाच्या उतरा कडे पहिले पेक्षा आत्मविश्वासाने पुढे जात होता. तो जिथे अटकत होता तीथेच आता मित्राची मदत घेत होता. न कर्त्याचा वार म्हणजे शनिवार त्यासाठी लागु होत नव्हता. आम्ही आता खेळता-खेळता पण गणिताची उजळणी करु लागलो होतो. आता तो सर्व जुने प्रश्न जवळ-पास साठ टक्या पर्यंत बिना मदतीने सोडवु लागला होता. आता त्याचा आत्मविश्वास वाढला होता.ढवळ्या सोबत पावळ्या बांधला गेला होता. वान नाही पण त्याचा गुण त्याच्यात हळू-हळू उतरत होता. त्याच्या मित्राने त्याला एकच बजावले होते कि परिक्षेत तुला जे प्रश्न सोडवता येते तेच आधी करायचे. पण प्रत्येक प्रश्न सोडवतांना गणिताच्या नियमाप्रमाने सोडवायचे !. कोणाचीही नकल करायची नाही असे बजावले होते. जे प्रश्न तुला अर्धवट येतात तीतक्याच टप्यापर्यंत सोड्वायचे पण चुकिचे उत्तर आपल्या मनाने लिहावयाचे नाही असे खडसावुन सांगितले होते. तु जर असे केले तर एवढ्याच अभ्यासावर गणितत पास होवु शकतो !. त्याला त्याने प्रश्न पत्रिकेवर प्रश्नाच्या समोरच त्याचे उत्तर लिहुन आनण्यासाठी सांगितले होते.जेव्हा तो पेपर देऊन आला होता. तो पेपर त्याला पुन्हा सोड्वण्यासाठी सांगितले होते. त्याने तो पेपर जवळ-जवळ पन्नास टक्या पेक्षा जास्त बरोबर सोडवला होता. त्याला त्याने सांगितले तु या वेळेस पास होणारच !. काकांना पण त्याने हा आत्मविश्वास दिला होता. त्यांचा त्याच्या वर विश्वास तेव्हा बसला होता कि नाही हे त्याला समजले नव्हते.पण जेव्हा परिक्षेचा परिणाम आला होता. तेव्हा तो पास झाला होता.

   घरचे वातावरण एकदम आनंदीत झाले होते. ठरल्याप्रमाणे त्याला होमिओपॅथिक डॉकटर व्हायचे होते.त्याने एडमिशन घेऊन तो कोर्स पूर्ण केला होता. सुरुवातीला आजु-बाजुच्या खेड्या मध्ये वैद्दाकीय धंदा सुरु केला होता.जिथे पिकते तीथ विकतं नाही. काही दिवसाने तो एका मोठ्या शहरात सराव करत होता. लगेच त्याच्या निर्दशनात आले की त्याच्या मित्राच्या मित्राला एक वैद्दाकीय साहाय्यकची आवश्यकता आहे. तो मोठा हृदय रोग तज्ञ होता. त्याने त्याच्या मित्राचा परिचय डॉकटरांना साक्षात्काराच्या वेळेस दिला होता. डॉकटरांनी गावंच्या मित्राचा परिचित असल्यामुळे त्याला कामा वर ठेवून घेतले होते. तिथे तो नियमित नोकरी करीत होता. आणी उरलेल्या फावल्या वेळेत आपल्या होमियोपॅथि डॉकटरचा धंदा करीत होता. मोठ्या थाटाने आपला संसार चालवित होता आणि सुखी संसाराचा उपभोग घेत होता. त्याच्या जीवणातील मुख्य अडथळा ज्या मित्राने दूर केला होता. त्याचे तो आभार नेहमीच मानत होता. याच्या पेक्षा त्याच्या लहान मित्राला अजुन मोठ्या गुरुदक्षिणेची अपेक्षा नव्हती !.



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational