आयआयटीयन
आयआयटीयन
एका लहानशा खेडात एक मध्यम संपन्न परिवार राहत असे. कुटुंब प्रमुख एका जवळ्या खेड्यात शिक्षक होते. ते शिक्षिकेच्या पेशा सोबत आपला शेतीचा व्यवसाय आणी घरघुति दुग्ध व्यवसाय पण करित होते. त्यामुळे परिवार आर्थीक दृष्टया संपन्न होता. परिवार मध्ये तीन मुली व तीन मुले होती.सर्वात मोठी मुलगी आणी त्या नंतर मुलगा होता. मुलाचे नांव आजी- आजाने प्रेमाने राजीव असे ठेवले होते .पण त्याला राजा या नावाने बोलवत असे. तो लहान पणा पासुन थोडासा विकृत प्रवृत्तिचा किंवा चंट होता. त्यामुळे त्याचे वडिल त्याच्या असहनिय व्यवहारावर नेहमी खिन्न झाल्या वर त्याची चांगलीच मार-झोड करित होते. तसे त्या काळातील शिक्षक विद्यार्थाला खूप मारत असे. बरेच वेळा तो आपले गांव सोडुन जवळच असलेल्या आजी-आजोबा कडे गांवाला निघुन जात असे. तो घरी न आल्यामुळे त्याचे आई-वडिल ईकडुन –तिकडुन माहिती मिळाल्या नंतर समजुन जायचे कि तो आपल्या आजी-आजोबाच्य गांवाला गेला आहे. काही दिवसा नंतर त्याचा एखादा मामा त्याला खेड्या वर घेवुन जात असे. अशा प्रसंगाची पुनरावृत्ति बरेच वेळा होत होती.
पण त्याच्या व्यवहारात फारसा फरक पडत नव्हता. नंतर तो मोठा झाला. शालांत परिक्षा चांगल्या गुणाने पास झाला. नविन –नविन सुरु झालेल्या दहा अधिक दोन अधिक तीन या नविन अभ्यासा क्रमात बारावी करण्यासाठी जवळ्या शहरात गेला. तीथे बारावीत सर्वात जास्त गुन मिळवुन त्याचा एकट्याचा इंजिनिअरिंगला कराडला नंबर लागला होता. आई-वडिलांनी त्याला इंजिनिअरिंग पदवी मिळवण्या साठी कराडला सरकारी ईलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगला दाखला करुन दिला होता. आता मुलग़ा सुधरला आणी मोठा अभियांत्रीकी होणार याचे स्वन्प बघत असे. त्यांने तीथे जावुन नेतागिरी करने सुरु केली होती. घराचा संपन्न आणी घरुन दूर असल्यामुळे वडिल पैसे पाठवण्यात जास्त आणा-काणी करत नव्हते. नेतागिरीमुळे त्यांचे लक्ष्य अभ्यासातुन उडले होते.
चार वर्षाचा इंजिनिअरिंगचा अभ्याक्रम कुथ –काथ करत जवळ-जवळ आठ वर्षात वडिलाच्या दबावा खाली पूर्ण केला होता. धक्के खात झालेला हा ईलेक्ट्रीकल इंजिनिअर शिफारशीमुळे वडिलांनी जवळ्याचा सहकारी साखर कारखन्यात नौकरी मिळून दिली होती. तसेही त्या काळात इंजिनिअर लोकांची किल्ल्त होती. नौकरी आणी घरच्या संपन्नते मुळे त्याला त्याच्या आत्याच्या मुलीचा संबंध आला होता. त्यांचे लग्न झाले होते.मुलगी संपन्न घरची आनी नंदेची मुलगी असल्यामुळे, ती आपली बाजु नेहमी वर-चढ ठेवण्याचा प्रयत्न करित होती. कदाचित तीला तसे शिक्षण पण दिले गेले असेल . त्यामुळे घरातील वातावरण बिघडत चालले होती. शेवटी त्याने आपली अलग ग्रहस्ती बसवली होती. काही वर्षांनी तो साखर कारखाना बंद पडला. नंतर तो असेच कारखाने सोडत- सोडत फिरत होता. कधी साखर कारखाना, रसायन तर कधी मेडिकल कॉलेज कुठेच टिकत नव्हता.शेवटी कंटाळुन नौकरी सोडली होती.
आता समोर काय करायचे म्हणुन कुटुंबा सोबत आपाल्या गावी आला होता. आपल्या गावांत येवुन दुग्ध व शेतिचा व्यवसाय करु लागला. त्याला एक मुलगा होता. तो पण वडिला सारखा फार हुशार होता. गांवाच्या बाजुला असल्यालेल्या शहरात तो शिकत होता. आई पॉलीटेकनीक झाली होती आणी त्याच्या सोबत राहुन त्याचे मार्गदर्शन करत होती. तो शालांत परिक्षेत मेरिट आला. मुलाचे करिअर चांगले घडविण्यासाठी मुलाच्या आईने एक ठोस निर्णय घेतला होता. जे त्याच्या वडिलांना एकटे राहुन आपला करिअर बिघडवले होते त्याची पुनरावृत्ति होवु नये म्हणुन त्याच्या सोबत बारावी व जीईई परिक्षेच्या तैयारी साठी त्याला घेवुन तबल दोन वर्ष राजस्थान कोटा मध्ये जावुन राहिली. आणी त्या मुलाने जीईई मध्ये चौथी रैंक मिळ्वली होती.त्याला आय.आय टी मुंबई मध्ये ईलेक्ट्रीकल शाखेला प्रवेश मिळाला. अभ्यासक्रम पूर्ण झाल्या नंतर, त्याला लगेच कंपनि तर्फे वार्षिक पन्नास लाखाचे पैकेजची ऑफर मिळाली होती. जगात सर्वत्र कोरोनाचे थैमान पसरले होते व आहे.अशा परिस्थिति मध्ये सुध्दा मुलाच्या आईने मन घट करुन मुलाला पी.एच.डी करण्यासाठी अमेरिकेला पाठविले आहे.
सामान्यपणे आपण समाजात पाहतो कि आई-वडिलांची विशेष म्हणजे आईची ईच्छा असते की तीचे मुल-बाळ हे तिच्या नजरेतच असावे.तीला ती आपल्यापासुन दूर असने खपत नाही. जर मुलगा एकटाच असेल तर मग तो दूर असने फार दूरची बाब आहे. या प्रसंगात त्या मातेने त्याला घडवण्यासाठी काय त्रास व कोणत्या –कोणत्या समस्यासी झुंझ दिली असेल ते तीलाच महित आहे. आपण त्याची फक्त आपल्या वरुन कल्पना करु शक्तो. आणी आता अमेरिकेत असलेल्या मुलाच्या विरहात व कोरानाच्या महामारीत मनाची काय अवस्था असेल याची कल्पना करणेच कठीण आहे. निश्चितच ही मुलाची आई मुला साठी व अन्य मातेसाठी सुपरमॉम आहे.
