शब्दसखी सुनिता

Romance Tragedy Others

4.0  

शब्दसखी सुनिता

Romance Tragedy Others

आठवणीतील अव्यक्त प्रेम

आठवणीतील अव्यक्त प्रेम

4 mins
345


आज अचानक पंधरा वर्षांनी काॅलेजसमोरून जात असताना समिरला तिची आठवण आली... आजही ती आणि तीची आठवण मनातुन जात नाही. ती म्हणजे दिव्या तीच नाव. हो ती होतीच इतकी सुंदर काॅलेजमधील सर्व मुले तिने काॅलेजमध्ये एन्ट्री केली तेव्हाच सगळे तिच्याकडे पाहत होते. काॅलेजमध्ये असताना मला ती आवडायला लागली होती.तिच्याविषयी खुप प्रेम होत मनात पण तिला कधीच सांगु शकलो नाही. एकदा एका मुलाने तिला प्रपोझ केल, तो तिला त्रास देत असेल, म्हणुन तिने त्याच्या कानाखाली मारली. तेव्हापासून मुले तिला जरा घाबरूनच असत.तो दिवस आठवला.  " दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडत... तसच काहीस पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येत... या सूधीर मोघेंच्या कवितेच्या या सुंदर ओळी आठवल्या. " 


तसच काहीस काॅलेजच्या  दिवसात वाटू लागल होत. काॅलेजच वय तसच असत... आपणही कुणाच्या तरी प्रेमात पडाव ही भावना मनात यायची. काॅलेज मध्ये असताना मी आणि माझे मित्र खुप छान दिवस enjoy करत होतो. आमचा मित्रांचा ग्रुप आजही आठवणीत आहे. सगळ्या मित्रांना हळूहळू गर्लफ्रेंड मिळाल्या. मीच एक असा होतो, ज्याला गर्लफ्रेंड सोडा पण मैत्रीणही नव्हती. सगळे मला यावरून हसवायचे, चिडवायचे. त्यावेळेस मला एक मुलगी आवडली होती. पण मी मित्रांना सांगितल नव्हत. घरी मी एकटाच असल्यामुळे बाबांचा खुप धाक होता. नेहमी चांगला अभ्यास कर आणि मोठा हो म्हणायचे. मी ही अभ्यासात हुशार होतो. मलाही परिस्थितीची जाणीव होती. त्यामुळे प्रेमात वगैरै पडणे यात मी थोडा मागेच होतो. काॅलेज सूरू होऊन बरेच दिवस झाले होते. म्हणुन मित्र सगळे म्हणायचे, " काय मग सम्या, काॅलेज सूरू होऊन इतक्या दिवसांत तुला एकही मुलगी पटली नाही. कुणीच कशी आवडली नाही तुला, अरे यार सांगेल ना. एवढी काय घाई आहे... सांगेल लवकरच म्हणून मी घरी जायला निघालो. यांना काय सांगु आता मि काॅलेज चालु झाल्यापासून दिव्याला पाहतोय. ती आवडते पण तिला अजून सांगितल कधी नाही.   


काॅलेजमध्ये एकदा कार्यक्रमात तिने गाण म्हटल. होत... " तु आता है, सिने में जब जब साँसे चलती है " तिच्या आवाजात हे ऐकताना तिला पहिल्यांदाच जवळून पाहत होतो. तिचा आवाज गोड होता. तिला गाण्याची प्रचंड आवड होती. ती सतत तिच्या मित्र- मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये असायची. त्यामुळे ठरवून पण कधी बोलता आल नाही. फ्रेंडशिप करावी असही वाटल होत. पण तेही कधी जमल नाही. पण जेव्हा तिला पाहील तेव्हापासून ती आवडायला लागली होती. मनाला खुप भारी वाटायच. तिच्या स्माईलमध्ये हरवून जायचो. तीच्या नकळत तिच्याकडे बघायचो. म्हणतात ना... प्रेमात पडल्यावर माणसाला सगळ जगच सुंदर वाटू लागत... कशाचही भान नसते... प्रत्येक क्षणाला त्याच व्यक्तीचा विचार मनात येत असतो... दिवसातुन एकदा तरी त्या व्यक्तीला पाहण्यात एक वेगळीच मजा असतो... ती व्यक्ती दिसली नाही की मनाला बैचेन वाटणे... अस त्या वेळी वाटायच. खरच प्रेम ही भावनाच खुप सुंदर आहे. फक्त ती समजून घेतली तर अजून सुंदर आहे. थोड्याच दिवसांत हे काॅलेजच वर्ष संपायच्या आत तिला सगळ सांगून टाकायच अस ठरवल होत. जीवाला जीव देणारे मित्र नेहमी मला गर्लफ्रेंड वरून चिडवायचे, त्यांना दिव्याला प्रपोझ करून मी सांगणार होतो. अस त्यांना सांगुन सरप्राईज द्यायच ठरवल होत. पेपर चालु होते. मी काॅलेजमधून बाहेर पडत होतो, तेव्हा शेजारचे काका मला घेऊन जायला आले. त्यांनी मला माझ्यासोबत चल, तुझ्या बाबांना अॅडमीट केल आहे हाॅस्पिटलमध्ये, त्यांना आईने मला घ्यायला पाठवल होत. दोघेही आम्ही हाॅस्पिटलमध्ये पोहचलो. पण खूप उशीर झाला होता.


दोन लहान बहीणी आणि आई खुप रडत होत्या. मामा, मावशी आणि आजी आईजवळ होते. मला हे दृश्य पाहून माझा तर त्राणच निघून गेला. ' नक्की काय झाल असेल बाबांना, म्हणून तिथे गेल्यावर आतमध्ये जाऊन बघितल, " बाबा आम्हांला सर्वांना सोडून निघून गेले होते. " त्यावेळेस मला तर सगळ संपल्यासारख वाटत होत. काकांनी खुप धीर दिला. एका दिवसात सगळ होत्याच नव्हत झाल होत. बाबा, मी मोठा असल्याने सर्व काही आधी सांगत पण यावेळेस तर काही न सांगता निघून गेले. पण ते अभ्यास कर मोठा हो म्हणायचे, हे त्यांचे शब्द आजही आठवतात. ते अचानक सोडून गेले हा फार मोठा धक्का होता माझ्यासाठी, मग मी स्वतःला सावरल. आई आणि दोन लहान बहीणी यांना धीर दिला. बहिणी शाळेत जात होत्या. माझे पेपर संपले. ते वर्षही संपल होत. आम्ही ते शहर सोडून मामाच्या गावाला शिफ्ट झालो होतो.आता फक्त ते काॅलेज आणि दिव्याच प्रेम फक्त आठवणीत जपुन ठेवल होत.    


सगळ विसरून जाॅब करू लागलो. शिक्षण बाहेरून चालु होत. त्यामुळे नवीन काॅलेजला फक्त परीक्षा देण्यासाठी जात होतो. कारण आई आणि बहीणींची जबाबदारी माझ्यावर होती. आज मि काॅलेजच शिक्षण पूर्ण करून चांगल्या पोस्टवर जाॅब करत आहे. बहीणींचेही शिक्षण पूर्ण झाले आज त्याही नोकरी करत आहे. सुखी आहेत. तेव्हा फक्त डोळ्यापुढे जबाबदारी आणि शिक्षण एवढच लक्ष्य होत. दिव्या पहिल काॅलेजच प्रेम होत. त्यानंतर मी परत कधी प्रेमाच्या भानगडीत पडलो नाही म्हणजे वेळच नाही मिळाला. एकच व्यक्ती आवडली होती. तिलाही सांगु शकलो नाही. काॅलेजमधील अव्यक्त प्रेम.... जे आजही आठवणीत आहे. आज सहज त्याच काॅलेजसमोर चहाच्या टपरीवर चहा पिताना तिची आठवण आली... आज तिही सुखी असेल तिच्या आयुष्यात... तेव्हा मी कसा होतो लवकर काहीच बोलू शकत नव्हतो, ते दिवस आठवले की माझ मलाच हसायला येत. पण असो... प्रेम मिळवायलाही नशीब असाव लागत... माझ्या नशिबात नसेल तिच प्रेम... पण छान आहे माझ्या आठवणीतील अव्यक्त प्रेम... जे मिळत तेच खर प्रेम असत अस काही नाही... जे अधुर राहत ते ही खर प्रेमच असत... (काल्पनिक कथा आहे.)  


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance