Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

uma dixit

Abstract Others

1  

uma dixit

Abstract Others

आठवण

आठवण

2 mins
735


आठवण, सय ,तंद्रि , स्वतःमध्येच रममाण होणे, एखादा विषय ऐकला, एखादी घटना पाहिली , किंवा एखादा नाटक, चित्रपट पाहिला की अचानक आपण आपल्या भूतकाळातील घटनांचा धांडोळा घेत रहातो. भावनांचा हा हिंदोळा एकाग्र चित्त असेल तर अधिकच गहिरा होतो.

ऐतिहासिक कथा ,कादंबरी वाचताना अचानक त्या दृष्याशी एकरूप होतो.आपल्या समोर ती घटना जीवंत होत जाते. हा आभास आहे हे समजून ही नकळत त्या घटनेत मन तल्लीन होऊन जातं. पराक्रमाच्या , शौर्याच्या गोष्टी मनाला नवी उभारी आणतं.मन प्रफूल्लीत होतं .तेजस्वी तलवारी प्रमानं लखलखतं .अंगात खुमारी येते. रक्त सळसळतं.थोर पराक्रमी योध्दांचं जगणं ,रहाणीमान, विचारधारा सर्वच आपलं आपलं वाटायला लागतं.नकळत आपलं दैवत होतं.आपल्या चालीबोलीत वावरण्यात त्याचा समावेश होतो. आपली विचारसरणी अगदी त्याच पध्दतीची व्हायला लागते.खरोखर कोणताही इतिहास हा इतका रोमांचकारी असतो की त्याची आठवण काढत आपण आपलं आयुष्य जगत असतो.आपल्या नातपरतवंडांना अशा गोष्टी सांगताना आपणच हरवून जात असतो. आपल्या बालमनावर ज्या ज्या गोष्टीचा पगडा असतो, त्या त्या गोष्टी मनाच्या सुप्तावस्थेत घर करून असतात. त्या अशाच कधीतरी एखादी त्या सारखी घटना घडली की आपसूक आठवायला लागतात.भावनांचे हे जाळे विस्तृत आहे. आपण बोलून सांगून त्या व्यक्त करत असतो.आणि अशा आठवणींचा ठेवा कधी आपल्याच तर कधी कवितातून तर कधी गोष्टीरूपातून कागदावर उतरवित असतो.मनाचा हा राजा आठवणींच्या हिंदोळ्यावर स्वच्छंदपणे बागडत रहातो. मग या आठवणी कटू असोत कि गोड आपल्या एकांताचे सोबती असतात.

या आठवांचा उत्सर्जित होतानाचा आवेग कधी दूःखी , कधी आनंदी कधी कटू तर कधी उत्फूर्त असतो. बालपणाची सय छोट्या मूलांना पाहिलं की येतेच येते.कुणी अगदी जवळची व्यक्ती अचानक गेली किंवा एखादी ह्रृदयद्रावक घटना घडली की तिच्या आठवणीत मन अधिक काळ गुंतून रहाते.ही घटना जितकी विस्मृतीत जाईल तितकी बरी.पण जर का याचा अंमल मनावर गारूड होऊ लागला की समजावे आपल्याला या घटनेचा विसर पडत नाहीयं. आपण त्याच गोष्टीचा सतत विचार करू लागलोय.ती घटना आपला पाठलाग करतेय.जागृत सुप्त अवस्थेत ही तिचाच भास होतोय.ती जवळपास इथेच कुठेतरी आहे.असा भ्रम निर्माण होतोय.आणि नकळत त्या घटनेची सतत पुनरावृत्ती होतेय अशी धारणा तयार होते.ही अवस्या नाॅर्मल मनुष्याच्या लक्षणेत बदल घडून आणते. आणि वेळीच अशा आठवणींचं ओझं अधिक होण्याअगोदर त्यापासून परावृत्त ,वेगळं होऊन दूसर्या गोष्टीकडे मन वळवणं श्रेयस्कर असतं.


Rate this content
Log in

More marathi story from uma dixit

Similar marathi story from Abstract