uma dixit

Others

1  

uma dixit

Others

जेष्ठ नागरिक

जेष्ठ नागरिक

3 mins
691



विषय खूप जिव्हाळ्याचा नी सलणारा आहे. आपल्या अवतीभोवती किंवा घरातील कर्तीसवर्ती लोकांकडे पहातो किंवा आपण जेंव्हा ऊठबस करतो. तेंव्हा खूशालीचे चार शब्द बोलताना ही अडखळतो. कारण पिकल्या पानाचे दूःख त्यांच्या डोळ्यात हालचालीत आणि दूर्धर रोगाच्या असह्य वेदनेचे विकृतरूप पाहवत नाही. का होते अशी अवस्था ? यांना समजून घेणारे कोणी का भेटत नाहीत.? काय अवस्था होत असेल अशा नागरिकांची जी मुकाट सर्व दूःख वेदना सहन करतात.बरं दूसर्यांनी दूःख दिलं तर एकवेळ प्रतिकार करता येईल पण घरातीलच त्यांच्याच पोटी जन्म घेतलेली, त्यांच्या अंगाखांद्यावर खेळलेली , जेंव्हा मोठ्ठी होतात (खरंच मोठ्ठी असतात?) कमावती होतात तारूण्याच्या ऐन बहरात असतात, कणखर, मजबूत सर्वांगानी संपन्न असतात.आर्थिक बाजू कमी जास्त फरकानी असतेच.मग....माशी कुठे शिंकते ? काय कारण घडते जे जेष्ठांना समजून घेण्यास असफल होतात.त्यांना दूःखाच्या खाईत टाकतात.त्यांचा अवमान करतात .त्यांचा अडथळा होतो.अडचण होते.आज जो सुपात आहे तो जात्यात जाणाराच आहे.हे माहित असूनही का जेष्ठांना वृध्दाश्रमाचा आसरा घ्यावा लागतो.? हे सर्व घरातील आलेल्या मुलीकडे, सुनेकडे बोट करतात.जी घराचा ताबा घेऊन तालावर नाचविते.तिला माहेरच्या लोकांचा पूळका येतो.मुलाचे / नवर्याचे आई- वडील, सासू सासरे जवळ नको वाटतात.?त्यांना टाकून बोलले जाते उपाशी ठेवले जाते.जातायेता अपमान केला जातो.मरणाला आमंत्रण स्वतःहून देण्याची स्थिती तयार होते.अशीच परिस्थिती घरीदारी जवळपास असते.खरंच सून इतकी वाईट असते?

स्वतःच्या आई- वडीलांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून वहीनीला भाऊला बोल लावणारी मुलगी सासरी आल्यावर त्याच्या उलट का वागते?

खरोखर सुन्न करणारा प्रश्न आहे.आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एकत्र कुटूंब पध्दती होती अजूनही तुरळक ठिकाणी दिसून येते.इथे अजूनही जेष्ठांच्या मतानूसारच वागले जाते.विशेषकरून खेडोपाडी अजूनही जनलज्जेस्तव का होईना जेष्ठांना मान दिला जातो.पण....विभक्त कुटूंब आणि शहरामध्ये जेष्ठांना म्हणावा तसा मान सन्मान मिळत नाही.ज्याच्याकडे संपत्ती आहे तो ही दूःखी आहे ज्याच्याकडे संपत्ती नाही त्याचे हाल कुत्राप्रमाने होतात.आता अजूनही एक वेगळीच समस्या निर्माण झाली आहे.मुलं शिकण्यासाठी परदेशात जातात आणि तिथल्या सुखाला चटावतात.तिथली संस्कृती आपलीशी करतात.परतून येण्याची आस लावून आईवडील स्वतःस्वतःचे होईल तोवर कुढत उरी दूःखरी सल घेऊन जगत रहातात.मरण येत नाही तोवर. मुलं वारसाहक्क मागायलाच येतात किंवा सर्व क्रियाकर्म दूसर्यांनी उरकल्यावरच परततात.त्यांच्या मनात असूनही ते आईवडीलांचा सांभाळ करू शकत नाहीत.

आजकाल शाप ठरलाय जेष्ठ होणं हा.जेष्ठांचा अनुभव त्यांचे आशिर्वाद त्यांची बुध्दी चांगल्या सत्कर्मी लावली तर थोडीबहूत यात सुधारणा होईल.कायदा ही निघालाय मुलांनी जेष्टांचा सांभाळ केलाच पाहिजे.मला वाटतं आर्थिक बाजू जर चांगली असेल तर वृध्दांचे म्हातारपण चांगले जाईल मग ते मुलाशी ही जुळवून घेतील आणि मुलगाही त्यांच्याशी जुळवून घेईल.पण चांगली आर्थिक बाजू म्हणजे कशी किती ? ही त्यांच्या त्यांच्या खर्चावर किंवा दृष्टीकोनावर कारणीभूत ठरेल.

प्रत्येक मुलगा श्रावणबाळ नसतोच.किंवा पुंडलीक ही नसतोच.सूनेची ही अशीच प्रतिमा असते.तिचा जेष्ठांकडे पहाण्याचा दृष्टीकोन मनानूसार नसला तरी तिचा इतका ही वाईट नसतोच नसतो.की ती बिना आईवडीलांची किंवा हिनसंस्कृतीची ठरावी.तिचा काही हात असेल नसेल वृध्दांचा ससेहोलपट अवस्थेत.तिला ही आपला लळा लागावा अशी वृध्दांची ही वागणूक जमेची असावी.

जेष्ठ असणं आणि जेष्ठ होणं यात तफावत आहे. जो परावलंबी जेष्ठ असतो त्याला अधिक त्रास असतो.त्यातल्या त्यात ज्याची सहचारिणी जवळ नसते.याउलट जी वृध्द स्त्री एकटी असते. तिच्या वागण्या बोलण्यात लिनता असेल तर ती घरात स्वतःचे स्थान टिकवून असते.असे माझ्या पाहनीत आलेय.



Rate this content
Log in