uma dixit

Others

1  

uma dixit

Others

निसर्ग

निसर्ग

2 mins
637


      हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे.किंवा निसर्गराजा ऐक सांगते.अशी गाणी गुणगुणत आपण मोठ्ठे झालोय.निसर्ग आपला बालसखा किंवा बालमैत्रिण असते.आपल्या सुखदःखाशी एकरूप होणारा निसर्ग असतो.बालवयात पाठशिवणीच्या खेळात निसर्गाचा आडोसा आपलाआपलासा वाटतो. आईचा ओरडा खाल्ला की अंगणातली तुळस आपली जवळची वाटते.रडत बोबडे बोल बोल लावित आईच्या कागाळ्या हमसून हमसून सांगत मन मोकळं व्हायचं.कधी परसातील अबोली तर कधी मोगरा कधी कुंदा तर कधी गुलाब स्वतःच्या रंगरूपातून एक वेगळेच नवचैतन्य वाटायचे.एकएक कळी खुलताना सृजनाचा ध्यास लागायचा.कधी कळी कोमेजली तर वाईट वाटायचे.झेंडूचा बहर मन उल्हासून टाके.परवर, काकडी, भोपळा, वांगी भेंडी, घोसावळा अशा वेलांचा चढताना तो सरळ चढावा म्हणून लावलेला टेकू त्यावरून नागमोडी तर कधी सरळ चढणारा वेल, बीयांचे रोपट्यात रूपांतर होणारे रूप हिरवा पारवा पानांचा रंग छोटीछोटी फूलं त्याचे फळात होणारे कोवळे कोवळे नाजूक रूपडे.पक्षांचा किलबिलाट चोचीनं फळांचा घेतानाचा आस्वाद.गलका पक्षांचा पाहून फळाला कपडा बांधून परिपक्व होईपर्यंत घेतलेली काळजी.जांभूळ, पेरू, अंजीर, बोरं, ऊंबर यांचा परसातला पडलेला सडा.झाडावर चढून कसरत करून काढलेली फळं, शाळेत जाता येता रस्त्यालगत असलेल्या चिंचा तोडण्याचा अट्टाहास कोवळी पानं तिखटमीठ लावून चट्टामट्टा करणारे ते आठवणीतले बालपणीचे क्षण निसर्गाच्या बहराप्रमाने बहरणारेच होते.

शालेय सहली, जवळपासच्या डोंगर दर्या, नदी ,ओढे पाटाचं पाणी कुईकुई वाजणारा मोटेचा आवाज पाटाचं सोडलेलं पाणी त्यातून सळसळत ,खळखळत जाणारं पाणी.ओढ्याचं खळाळतं रूप, आपल्या बरोबर वाढलेली झाडं मनाला तजेला देणारं सावली देणारं फळं देणारं अगदी हवंहवंसं वाटतं.

निसर्ग आपला प्राणदाता आहे.निसर्ग आपला सोबती आहे.निसर्गातील प्रत्येक जीव एकमेकावर अवलंबून आहे.वनौषधी, पुषौषधी मानवाला वरदान ठरत आहेत.निसर्गाच्या सानिध्यात घालवलेला प्रत्येक क्षण नवी उमेद, नवी स्वप्न, नवचेतना ,नव प्रतिभा देत असतो.कवी लेखक, कलाकार आर्टिस्ट यांचा निसर्गाकडे पहाण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो.कवीची प्रतिभा फूलते ती निसर्गामुळेच.

निसर्गाचं हे देणं आपण आपल्या हव्यासापायी , लोभापायी नष्ट करत आहोत.जंगलात ही प्राणी पक्षी सुरक्षित नाहीत.शहरात सिमेंटची जंगलं झपाट्यानं वाढत आहेत.पाळीव प्राणी नामशेष होत आहेत.हिंस्त्र प्राणी मानसाच्या वस्तीत भक्ष शोधण्यास भटकत आहेत.मानसाच्या रक्ताला चटावलेले प्राणी अकस्मात येऊन झडप टाकून पाळीव प्राणी लहान मूलं पळवित आहेत.निसर्गाचं चक्र कोलमडून पडले आहे.निसर्ग बेताल झालाय.अतीवृष्टी, अती ऊन, अती थंडी रोगराई पसरवित आहे.निसर्गानं आपलं रौद्ररूप दाखविण्यास सुरूवात केली आहे.पाण्याचा, अग्नीचा,धनधाण्याचा कुठे सुकाळ तर कुठे आहाकार माजला आहे.निसर्ग आहे म्हणून जीव जगतोय.निसर्ग आहे म्हणून माणूस श्वास घेवू शकतोय.निसर्ग आपला देव, मायबाप कर्ताधर्ता सर्वकाही आहे.त्याचे रक्षण करणे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे.

पुढच्या पिढीला समृध्द जीवन जगता यावं ही आपली नैतिक जबाबदारी आहे.ती पार पाडूयात.चला निसर्गाकडे वळूयात.Rate this content
Log in