आत्मसम्मान
आत्मसम्मान
एक शिकलेला शेतकरी ज्याचा जन्म 1916 मध्ये झाला होता,आणी वडिलांचा मृत्यु लहानपनीच कदाचित स्पेनिश फ्लु महामारेने झाला असवा. आजोबांना शिक्षणाचे महत्व समजत असल्यामुळे त्यांनी त्याला 11वीं शालांत परिक्षा पास होई पर्यंत अनेक ठिकाणी ठेवुन शिकवले होते. तरुण शिकला जरी असला तरि स्वातंत्र्य चळवळी मुळे प्रेरित झाला होता. त्यामुळे खादीचे वस्त्र धारण करत असे. बरेच वेळा आपल्या भागत होणारा नेत्यांच्या मेळ्याव्यात सहभागी होत असे. स्वातंत्र्य चळवळीच्या प्रभावामुळे आपण इंग्रज सरकारची सरकारी नौकरी करायची नाही असा ठाम निर्धार केला होता. त्यामुळे घरी असलेली शेति करुनच आपल्या कुटुंबाचा गाडा ओढत असे. काही काळा नंतर कुटुंब वाढले होते. त्यात दोन मुली व चार मुले असा त्या काळाप्रमाने खटला होता. लगातार दुष्काळ व वर्षा वर निर्भर असाणारी शेती वाढत्या कुळाचा किंवा वंशाचा आर्थीक भार सहन करु शकत नव्हती. व कर्जाचा भार डोक्यावर सारखा वाढतच चालला होता.मुलांच्या शिक्षणाची जवाबदारी एक मोठी समस्या बनली होती. देश आता मागे-पुढे स्वतंत्र होणारच आणी इंग्रज सरकारच्या जागी आपले स्वतंत्र भारताचे सरकार येणार.आता आपल्याला जवळच्या शहरात जावुन नौकरी करायला हरक नाही. म्हणुन योजने प्रमाने शहरात वास्तव्य करण्यासाठी कुटुंबा सोबतच आला होता. शिक्षण असल्यामुळे लगेच तहिसिल मध्ये वरिष्ठ कारकुनची नौकरी मिळाली होती.सर्व काही व्यवस्थित चालले होते. त्या काळात पन फितुरी आणी इंग्रजांची गुलामगिरी करणारा भारतीय समुह होता. काही आपल्या तत्वाला न पटणा-या बाबीवर त्यांचे आपल्या सहकर्मी व अधिकारी सोबत वाद नेहमीच होत असे.अशाच एका पेचिदा प्रकरणा वर तत्वाला न पटल्यामुळे त्यांनी राजीनामा देवुन टाकला होता. कदाचित जर संयम बाळगला असता तर वेळो-वेळी मिळणा-या बढतीमुळे चांगल्या सरकारी मोठ्या पदावर जावुन सेवानिवृत होवुन चांगली पेनशन मिळाली असती. व परिवाराचे जीवन सुरक्षित व सुखी झाले असते !.
देश स्वतंत्र झाला.पण सर्वांच्या पदरी आर्थीक स्वातंत्र आले नाही. शेवटी परिवाराची जवाबदारी असल्यामुळे ते एका निजी बैंकेत कँशिअरची नौकरी करु लागले होते. मुले मोठी झाली होती. काहींचे शिक्षण,लग्नपन झाले होते. किरायाच्या घरात किती दिवस राहावयाचे म्हणुन स्वतःचे घर बांधने सुरु केले होते.त्याच काळात भारत सरकारने बैंकेचे राष्ट्रिकरण केले होते. राष्ट्रिकरणामुळे सर्व कर्मच्या-याना पगार वाढ झाली होती.या सर्व परिस्थिति वर मात देत सर्वच मुला-मुलींना त्यांनी शिकवले होते. सर्वात मोठा मुलागा हा बैंकेत लागला होता, तर एक केंद्रीय विद्यालत शिक्षक व मुलगी भारतीय डाकघरात कार्यरत होती. मधला मुलाला शिक्षण असुन सुधा नौकरी मिळाली नाही. त्यामुळे त्याला त्यांनी शेति करायला पाठवले होते. आता ते बैंकेतुन सेवा निवृत झाले होते. पन दुर्दैवाने त्यांना काही रोख रक्कम मिळाली होती. त्यात त्यांनी लहान मुलीचे लग्न केले होते. व काही रक्कम मुदतठेवी मध्ये ठेवले होते.लहान मुलगा विज्ञान स्नातक झाला होता. त्याची फार तीव्र ईच्छा एम.एससी करण्याची होती. पन वडिलांनी त्याला लवकरात लवकर आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिला होता. घरची परिस्थितिचे आकलन करत असातांना त्याच्या लक्षात आले कि आर्थीक स्त्रोत संकुचित अर्थात सुकुडले आहे, वडिल आता पैशे देवु शकणार नाही. वडिल भावांचा पण कौटोंबिक खर्च वाढला आहे. जसे वडिल नेहमी सांगत आहे, त्याप्रमाने काही शिक्षणाला हात-भार लावणार नाही.एकंदर परिस्थितिचा आढावा घेतल्या नंतर धाकट्या मुलाने शिक्षणा सोबतच स्पर्धा परिक्षाची तैयारी करने सुरु केले होते. त्यात त्याला यश पण मिळाले.त्याला एका केंद्र सरकारी कार्यालयत सांयटिफीक जॉब मिळाला होता. तरुणाला याचे समाधान मिळाले. आपण सांयस शिकलो आणी विज्ञानाच्या क्षेत्रातच कार्य करित आहो.
केंद्र सरकारचे दफतर असल्यामुळे त्याची बदली वारमवार देश भरात होत होती. वडिलांनी आपल्या जीवनातील शेवटचे महत्वाचे कार्य म्हणजे त्यांनी तरुणाचे लग्न करुन दिले होते.त्यांना आपल्या जन्म्भूमि व कर्मभूमि सोबतच आपल्या इष्टमित्रांचे पन तेवढेच आकर्षन होते. त्यामुळे ते कोनताहि मुलाकडे कायमचे राहण्याचे टाळत असे. पन सर्वांच्या जवाबदा-या वाढल्या असल्यामुळे व आईच्या दिर्घ आजार पणा मुळे त्यांची हवी तशि मदत मुले करत नसे. शेवटि धाकट्या मुलाने त्यांच्या घराचे दोन हिस्से करुन दिले होते.त्यामुळे त्यांना घरभाडे मिळने सुरु झाले होते. मुदत ठेवी वर काही व्याज प्राप्त होत असे. त्यांची मुले जेव्हा-केव्हा आई-वडिलांना भेटायला येत असे तेव्हा त्यांच्या क्षमता व ईच्छेनुसार आर्थीक मदत करित असे.पण त्यांनी कोनालाही आपल्या पत्निची सेवा करण्यासठी आग्रह केला नाही. शेवट पर्यंत त्यांनी खाटीवर असलेल्या पत्निची तबल दहा ते बारा वर्षे योग्य तरेने सेवा केली होती. केव्हाच कोण्या मुलाला किंवा मुलीला तीला तुम्हच्या जवळ घेवुन जा असे म्ह्टले नाही. खाटिवर असणा-या पत्निची सेवा न थकता,न चिडचिड करता, आपले हेच आता कर्तव्य उरले आहे समजुन तबल दहा-बारा वर्ष सेवा केली होती. त्यांचे ठाम मत होते कि या हाताने सेवा घ्यावी व त्या हाताने सेवा द्यावी. कदाचित पत्नीने केलेल्या सेवेची ते परतफेड करित होते. आता शेवटी ते पण थकले होते. त्याच काळात त्यांचा कनिष्ठ मुलगा बढतीवर नागपुरला आला होता.त्याने आल्यावर तिथे स्वतःचे घर बांधले.तो आपल्या आई-वडिलांना सोबत घेवुन आला होता.आई तशिच बिमार होती. शेवटी एक ते दोन वर्षाच्या दरम्यान तीने आपले प्राण त्यागले होते. तीच्या मृत्युच्या पहिले कुटुंबामध्ये तीची सुन व नात व नातु आजरी पडले होते. लगेच ते बरे होते कि नाही ,कुटुंब प्रमुख मलेरियामुळे आजारी पडला होता. त्याचे प्लेट्लेट्स अत्यंत कमी झाल्यामुळे त्याला भरती करावे लागले होते.त्याच अवधी मध्ये म्हातारीची प्रकृति खराब होवु लागली होती. त्यामुळे थोडि प्रक्रुति बरी होताच तो दवाखाण्यातुन लगेच डिसचार्ज घेवुन परत आला होता. सकाळी तीला दवाखण्यात नेण्याचे ठरविले होते. पन त्याच पाहटे तीने आपले प्राण त्यागले होते.आपण तीला शेवटी डॉकटर कडे नेवु शकलो नाही याची खंत आजही त्या मुलाला होते.
कदाचित तीला मरतांना ही खात्री झाली होती कि तीच्या मृत्यु नंतर लहान पुत्र वडिलांची देखरेख करेल. म्हणुन आईने प्राण त्यागले असावे. तेव्हा वडिल पण आजारी होते. आईच्या मरणानंतर त्यांनी लगेच अन्न-पानी सोडले होते.त्यांना मुलांनी खुप आग्रह केला कि तुम्ही दवाखाण्यात भर्ती होवुन जा. तीथे तुम्हची चांगली व्यवस्था होवु शक्ते.पण ते सारखे नाकारत होते.तुला जर काही करायचे असेल तर माझी व्यवस्था घरीच कर. मला दवाखाण्यात भरती करुन माझे हाल करु नको. बाबा चांगले असतांना नेहमी म्हणतं असतं कि म्हातारपणी शेवटच्या घटकेला लोकलाजेस्त्व वृध्दांना दवाखाण्यात भरती करतात, व तीथे त्यांच्यावर निर-निराळे प्रयोग करु रुग्णचे हाल करतात. व शेवटी तीथेच रुग़्ण मृत्युमुखी पडतात. हे ते नेहमी सांगत असे. म्हणुन त्यांची वेळ आली व काळ समोर दिसत असतांना आपल्या निर्नयावर ते ठाम होते. घरी त्यांचा उपचार चालु होता. पण काही सुधारणा दिसत नव्हती.ते केव्हा प्राण त्याग करितील याची काहीच खात्री नव्हती. शेवटी मोठ्या जावायाच्या सल्यानुसार आईची तेरवी येणा-या-जाना-याची गैर सोय होऊ नये म्हणुन रद्द करण्यात आली.तीची तेरवी शेवटी घरच्या सदस्यांमध्ये घरघुती पद्ध्तीने सर्व संस्कार करुन करण्यात आली होती.त्याच दिवशी बाबानी फक्त खिरी सोबत थोडे अन्न ग्रहन केले होते.हे दृश्य बघुन सर्वांना कुतुहल वाटले होते.कदाचित प्रकृतिने त्यांना जी प्रेम व्यक्त करण्याची संधी दिली होती.त्याचा सम्मान करुन त्यांनी तीला कदाचित आपले तीच्या विषयी असणारा जीव्हाळा,आपुलकी, प्रेम व्यक्त केले असावे. सर्वांना आता बाबा काही दिवस जगनार म्हणुन आपल्या- घरी निघुन गेले होते. त्यांचा लहान मुलगा रोज आवश्यक सकाळची वडिलांची दिनचर्या आटपुन ऑफिसला जावु लागला होता.आईच्या तेरवी नंतर चौथ्या दिवशी नेहमी प्रमाने लहान मुलगा आवश्यक सकाळची दिनचर्या आटपुन ऑफिसला जाण्याची तैयारी करत होता.त्याच अवधीत त्यांची सुन सहज काही कामा निमित्य वर आली होती.सासरे बाबांना काही हवे कां हे विचारावे म्हणुन त्यांच्याजवळ गेली होती.त्यांनी तीला पाणी पाजण्याचे संकेत दिले होते. तीच्या हातुन पाणी पिल्यावर त्यांनी लांब स्वास घेवुन तीच्या कडे पाहत आपले प्राण त्यागले होते.त्यांची ती अवस्था पाहुन ती घाबरली होती. तीने मला लवकर वर या म्हणुन आवाज दिला होता. मी वर येई पर्यंत त्यांनी आपले प्राण त्यागले होते.मला विश्वास बसत नव्हता म्हणुन मी डॉकटरला बोलावले होते.त्यांनी चेक केल्यावर बाबा गेल्याचे सांगितले होते.
मी थोड्या वेळेपूर्वीचा सगळी सकाळची बाबांची दिनचर्या आटपुन खाली ऑफिसची तयारी करण्यासाठी गेलो होतो.तेव्हा मी पण त्यांना काही हवे कां असे विचारले होते.त्यांनी तसे काहिच संकेत दिले नाही. जगात सर्व आई=वडिलांची अशी तीव्र ईच्छा असते कि त्याच्या मुलाने अंतिम क्षणी त्यांच्या तोंडात तुळशीपत्र व गंगाजळ सोडावे. पन असे घडले नाही.कदाचित सुनेने केलेल्या सेवेचे बक्षीस त्यांना फक्त सुनेलाच द्यायचे असावे.यातुन एक भाव व्यक्त होतो कि त्यांनी कधीही सुन,मुलगी-मुलगा यांच्या मध्ये भेदभाव केला नसावा. ज्यांच्या कार्याचे श्रेय त्यालाच दिले पाहिजे असा त्यांचा निर्धार असावा.नंतर आम्ही आई- वडिलांची सयुक्त तेरवी त्यांना आवडणा-या खाण्याचे पदार्थ तेरवीच्या जेवनात ठेवले होते. तो तेरवीचा कार्यक्रम कामी वाटत होता व भेटी-गाठीचा कार्यक्रम जास्त वाटत होता.दुःखाचे काही वातावरणच नव्हते.बाबांनी शेवटपर्यंत विनाकारण मुलांना त्रास होवु नये म्हणुन स्वतःच त्रास सहन केला होता. त्यांनी जीवनात घेतलेल्या धाडसी निर्नयामुळे त्यांचे मुल-मुली शिकले.त्यांचे स्वतःचे बंगले आहेत.त्यांचे नातु,पणनातु डॉकटर,इंजिनिअर आहेत. त्यांनी जर शिक्षणाला प्राधान्य दिले नस्ते, तर त्यांची मुल व नातु आज ही गांवात शेतिवर कबाड-कष्ट करित असती.ते फ्क्त सुपर डॅड नव्हते,ते सुपर आजोबा ही होते.
ये प्रकृति मेरी है तुझसे बिनती
झुकनेवालो में ना हो मेरी गिनती.
मुझे इतनी दे हे प्रकृति शक्ति
अंत तक बच्चों की सेवासेही मिले मुझे मुक्ति
