shubham gawade Jadhav

Inspirational

2  

shubham gawade Jadhav

Inspirational

आत्महत्या एक गुन्हा....

आत्महत्या एक गुन्हा....

4 mins
153


आजकालच्या पिढीला काय झालय समजतच नाही .काही झालं, डिप्रेशन मध्ये गेलं ,एखादी गोष्ट सहन नाही झाली की लगेच आत्महत्या आरे काये हे? का? असं का? कधी आपल्याला जन्म देणाऱ्या, तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपणाऱ्या ,९ महिने पोटात सहन केलेल्या आईला आणि दिवसरात्र आपलं मुल चांगल शिकावं यासाठी कष्टाचं रक्त ओकत असणारा बाप .यांचा एकदासुद्धा विचार मनात येत नाही का असं काही कृत्य करण्या अगोदर .अरे किती किती किती सहन केल असत त्यांनी आपल्यासाठी .त्यांनी आपल्यावर जीवापाड प्रेम करावं .अगदी ठेस लागली तरी त्यांच्या डोळ्यात पाणी यावं असं असूनही त्यांना एकट्याला टाकून कस जाऊ वाटत आणि का ?


          काय कारण असतात आत्महत्येची मुलगी/मुलगा सोडून गेली/गेला ,मार्क कमी पडले ,डिप्रेशन अरे ही काय कारण झाली का ? करा ना दुपटीने मेहनत करा तिला/त्याला त्यांची जागा दाखून द्या .दुप्पट मेहनत घ्या आणखी मार्क मिळवा .तुमच्यात आहेत ना सगळे गुण .एक दिवस त्रास होईल दोन तीन चार पण शिकाल ना काहीतरी .प्रयत्न तर करा .


           हे पळपुटे जगणं कशाला जगताय. षंढ आहात का? की मनगटात रग उरली नाही? की मेलेल्या आईच दूध प्यायलात? फाटते का? अरे ज्यांच्या काठीचा आधार होयची वेळ येते तेव्हा तुम्ही षंढासारखे जीव देता .काय म्हणून मोठं करायचं त्यांनी तुम्हाला हा दिवस पाहण्यासाठी का ? त्यांनी तुमच्या म्हड्याला खांदा द्यावा .किती घाण गोष्टय ही. षंढ आहेत हे जीव देणारे षंढ. सगळ्या दुनियेतली संकट तुमच्याकडे आलेत का? स्वतःला सिद्ध करू शकत नाहीत का तुम्ही. ज्यांनी आयुष्य झिजवल तुमच्यासाठी, वेळप्रसंगी फाटके कपडे घातले तुम्ही चारमाणसात चांगले दिसावे म्हणून, तुटक्या चपला घातल्या, उपाशीपोटी झोपले, रक्ताचं पाणी केल तुम्हाला चांगले दिवस यावे म्हणून आणि तुम्ही असे त्यांना माघे खितपत ठेऊन जाता.थू तुमच्यासारख्या षंडाच्या जगण्यावर .ज्यांनी आयुष्यभर तुमच्यासाठी अश्रू ओघळले त्यांना विसरून मुलींसाठी किंवा मुलांसाठी लाखमोलाचा देह सोडून देता. एवढीच आग असेल तर जा ना सीमेवरती लढता लढता जीव द्या .कमीत कमीत तास मेल्यावर तरी आईबाप ताठ माना करून समाजात वावरतील.


             प्रत्येक संकटाला मात आहे .विचार करा, वेळ द्या , पुन्हा पुन्हा प्रयत्न करा मार्ग नक्की सापडेल पण असं आईबापांचे त्यांच्या मरेपर्यंत हाल होतील असं त्यांना एकटं सोडून जाऊ नका .खूप सहन केल असत रे त्यांनी जसेजसे मोठे होतं असतात प्रत्येक दिवस आनंदी असतात ते की आज ना उद्या माझं पोर माझ्या हाताखाली येईल आणि मी सुखाचा श्वास घेईल .पण तो दिवस तुम्ही असल्या घाणेरड्या कृत्याने येऊच देत नाही .का ? त्यांचा येवडाही अधिकार नाही का तुमच्यावर .


                तुम्ही चांगले दिसावेत म्हणून स्वतः फाटके कपडे ,तुटकी चप्पल घालतात ,फाटकी साडी घालते आई कारण आपलं मुलं चांगलं शिकावं .का ? कुणासाठी ? आपल्यासाठीच ना .सुखाने शेवटचे श्वास सोडावेत की तुम्ही गेलात याचे अश्रू मरेपर्यंत गाळावेत .त्यांना तुम्ही चिता द्यायची त्यांनी आपल्याला .आयुष्याचा प्रत्येक क्षण तुम्ही सुखात जगवा म्हणून आई बाप अहोरात्र खपत असतात .तुमचं थोडं दुखत म्हणलं तरी त्यांच्या डोळ्याला डोळा लागत नाही .


                   आई बाप ,बहीण ,भाऊ यासारखी सुंदर नाही नाहीत जगात .त्यांना हाताळायला शिका .मर्दासारखं संकट पेलून बाहेर निघा .शंडांसारखं जीव नका देऊ .तो तुमचा अधिकार नाही .९ महिने पोटात वागवलेल्या आणि तुम्ही जन्म घेतला नसतानाही तुम्हाला जीव लावणाऱ्या आई बापांचा आहे. सांगा ना काय कारण आहेत त्या फालतूगिरीची? मुलगी सोडून गेली ....अरे जाऊदेत १५० कोटीत दुसरी भेटणार नाही का ? मुलगा सोडून गेला ...अरे जाऊदेत ना काय बिघडतय त्यांची लायकी दाखवून द्या ना त्याला .जिवंत माणसाची लक्षण दाखवा उठा जागे व्हा आणि कामाला लागा .दुप्पट ताकदीने .


         मार्क कमी पडले ...अरे पडूदेत एक क्षुल्लक चिठोरी तुमचं आयुष्य ठरवू शकत नाही .जग खूप मोठं आणि सुंदर आहे जगायला शिका .आनंद मिळवायला शिका .छोट्या छोट्या गोष्टीत तो शोधा. अरे बिंदास रहा ना ..अडचण काय आहे ? हसा ,खेळा ,फिरा ,नाचा ,गा, मनसोक्त हुंदडा पण आत्महत्येसारखा फालतूपणा करू नका .ठेस तुम्हाला लागली ना त्रास मात्र ९ महिने उदरात सांभाळलेल्या त्या माउलीला होतो .दिवसरात्र हाडांच काड करणाऱ्या बापाला होतो आणि जीव गेल्याने प्रश्न सुटतो का ? आईबापांची मान खाली जाते .


            अरे संकटाना मर्दासारखं पेलून बाहेर या ना .गर्व वाटेल स्वतःवर गर्व .आत्महत्या केलीना तेवढ्यापुरती सहानुभूती भेटते नंतर मात्र थुकतात पाठीमागे ,नाव ठेवतात. जगायला शिका .राग आला जा ना २-४ दिवस बाहेर जाऊन या ,मार्क कमी पडले जास्त मेहनत घ्या .पण तुमच्यासाठी काय झिझवलेल्या आईबापांना वार्यावरती सोडून जाऊ नका .


             एक कळकळीची विनंती आहे . संकटाना सामोरं जा .अरे एकसे बढकर एक थोर नेत्यांच्या पावनभूमीत जन्मला आहात . आदर्श बनवा . ध्येयवेडे व्हा .जगा .जगण्याचा आनंद घ्या .त्या म्हाताऱ्या आईबापांचा काठीचा आधार व्हा .


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational