आत्मा
आत्मा
असे म्हणतात माणूस स्वतःच्या विचारानुसार त्याचा स्वभाव बदलत असतो. जर वेळ आणि परिस्थिती छान आली तर आयुष्य सुंदर आहे असं वाटू लागतं. जर ती जागा दुखत घटनेने घेतली तर मग थोडे दुःख होतं. टोकाचे निर्णय देखील घेतो. मग आठवतात ते गाणी "मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया" इट्स डिपेंड ऑन सिच्युएशन, सिच्युएशन कोणतीही असो पण मनाची तळमळ होते आणि आत्म्याला त्रास देतो आपण.
खरंतर जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा आत्मा कोऱ्या कागदा सारखा असतो आणि त्यात आपण विविध रंग भरतो आपल्या विचारांचे , आपल्या सवयींचे. जसजसे अनुभव येतात तसे आपण मनावर बुद्धीवर कोरायला सुरुवात करतो.
एखाद्या वाईट घडलेल्या घटनेची तीव्रता डोळ्यातील अश्रूंनी जितकी लवकर दिसते. त्यापेक्षा हजार पटीने आत्म्याला त्रास होत असतो. पण दाखवू शकत नाही आणि दिसतही नाही असं म्हणतात की "इंसान खाली हात आया है खाली हात जाना है "| खर आहे ते पण माणूस काही नेत नाही मारताना
न सोना ,न पैसा,न नाती सर्व ब
ंधनातून मुक्त होऊन जातो पण सोबत नेतो ते आत्म्यावर घडवलेले संस्कार जे आपण क्षणोक्षणी आत्म्यास दिले ते मग ते समाधानाचे असो किंवा असमाधानाचे. स्वतः खुश राहणं हे आपले प्रथम कर्तव्य आहे.
असं म्हणतात देखील दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. हे खरं असलं तरी विज्ञानाच्या दृष्टिकोनातून परंतु त्यालाही अंत आहे. दिसत नाही डोळ्यांना तेच खरं.. जसं की, प्रेम ,सुख ,समाधान, दुःख, हवा ,आत्मा, या गोष्टी दिसत नाही पण असल्याची जाणीव मात्र होत असते वेळोवेळी आणि या सर्व गोष्टी अमर आहे त्याला न मर्यादा आहे ,न कोणी कैद करून ठेवू शकत.
यात मध्ये खूप मोठी ताकद सामावलेली असते जितके सकारात्मक विचार करतात तितका सकारात्मक होईल आपण जे काही व्हायब्रेशन्स देतो आत्म्यास त्यावर आपला रिझल्ट डिपेंड असतो. Be positive, stay happy.
शेवटी एक पेनात शाई असली की कोर्या कागदावर लिहिता येतं. अन् सकारात्मक विचार आणि योग्य समज आली की आत्म्यावर संस्कार घडवता येतात.