गांव
गांव
जमाना बदलत चाललाय. लोकांचं गावाकडं शहराकडील आकर्षण वाढले. मग ते शिक्षण , नोकरी ,सोयी-सुविधांचा ,असो किंवा मनोरंजनाच. वाढत्या धावपळीच्या काळात सगळेच बदलतय. शहरात सबदून घेण्यासाठी तिथले रूल्स फॉलो करायचे आणि करावे लागतात. राहणीमान आणि विचार .लखलख चमकणारे लाईट जणू दिवाळीच वाटते शहरात माणूस कोणाच्या शेजारी राहतो हे जाणून घ्यायला वेळ देखील नसतो .चमकणाऱ्या शहरात नेत्रसुख भेटतं पण मानसिक समाधान मात्र गावी भेटत असावं.
गावाकडील जीवन सुख समृद्धीने भरपूर असतं .मान्य आहे ,नोकरी नाही भेटत पण पारंपारिक व्यवसाय जोरात चालतात .दिवाळी दसरा आला की शेण
ाचा सडा, रांगोळी ,पुरणपोळी ,मनात उत्साह, चेहऱ्यावर प्रसन्नता.
आत्या ,मामा ,काका ,मावशी ,सगळी नाती अनोळखी व्यक्ती सोबत जोडतात पण मनातून निभावतात. दिवसभर काबाडकष्ट करायचं ,आणि संध्याकाळी एका ठिकाणी सर्व एकत्र होऊन चर्चासत्र भरवायचं. मस्तच ना.. आणि आधी मामाच्या गावाला जाण्याची ओढ सर्वांच्या मनात असायची. मदतीची भावना आणि एकी गावातच आढळते .
मानव तर एकच आहे विभागला गेलाय शहर आणि गावात अजूनही शहरातील लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो गावी जायचं म्हटलं तरी .खरंतर फॅशनच्या बळी न पडणारा गावठी माणुस पण माणुसकी साठी बळी वर चढायला तयार असतो.