सावर रे
सावर रे
एका गावात शुभम नावाचा मुलगा राहत होता. खेळण्यात खूप आवड होती. लहानपणापासूनच निरनिराळ्या स्पर्धेत भाग घेऊन वेगवेगळी बक्षिसे मिळवली होती. प्राथमिक ,माध्यमिक वर्गात डोक्यावर अभ्यासाचे ओझे असतानादेखील तो खेळत होता. त्याचं मत असं होतं की खेळ की टेन्शन दूर होतं. जर तो खेळला नाही तर त्याला अस्वस्थ वाटायचं. उच्च महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला चांगल्या पगाराची नोकरी भेटली. कामाचा बोजा ,जबाबदारी ,पूर्ण टाईम कामात व्यस्त हातात चेंडू ऐवजी बॅग, आली ट्रॅक सूट च्या जागा ब्लेझर आणि टायनी घेतली. मैदानी खेळा एवजी नेटवर्किंगचे खेळ खेळायला लागला. एक दिवस ऑफिस मध्ये मुलाखत घेण्यात येते.
रिपोर्टर उत्सुक असतात शुभम ची मुलाखत घेण्यासाठी आणि मग रिपोर्टरच्या प्रश्नांचा भडीमार सुरु होतो .
हे पद कसा प्राप्त केलं ? कोणती मेहनत घ्यावी लागली ? यामागे कोणाचा हात आहे ? अशा अनेक प्रश्न विचारले पण म्हणतात शेवट गोड करावं म्हणून विषय छंदाकडे वळाला...
रिपोर्टरने विचारले सर तुमचा छंद काय ?
सरांनी :- उत्तर दिलं खेळणे फुटबॉल माझा आवडता खेळ. हे सांगताना चेहऱ्यावर चमक काही न
िराळीच होती
रिपोर्टर नि पुन्हा प्रश्न विचारला आता किती टाइम देतात खेळण्यासाठी ? त्यावर सर उत्तरले काम असल्याकारणाने रोज नाही खेळू शकत पण आठवड्यातून दोन दिवस नक्की खेळण्यात घालवतो आणि ती वेळ माझ्यासाठी खूप खास असते.
रिपोर्टर :- टाईम मॅनेज होतो का सर ?
सर :- आवड तिथे तर सावड. वेळ पुरत नाही वेळ काढावाच लागतो .
पण सरांनी वरील प्रश्नांची उत्तरे जर एका वाक्यात दिलेले असली तरी खेळण्याबद्दल विचारलेल्या प्रश्नांची स्पष्टीकरण देत होते. सरांनी अजून सांगत मोलाचे शब्द सांगितले सर आपण मोठे होतो बालपण आणि बालपणीचे सवायी सोडाव्या लागतात ,हे जरी खरं असलं तरी सगळं काही गमवा पण छंद जोपासा. कामाचा हुद्दा आणि छंद यातला बॅलन्स उत्तम रित्या सावरता आला पाहिजे असं म्हणत सरांनी स्पष्टीकरण संपवले
मी ही मुलाखत ऐकली आणि खरच आपण बिझी म्हणून घेतोय स्वतःला. स्वतःचे छंद विसरत चाललोय असं मनाच्या कोपऱ्यात प्रश्नचिन्ह निर्माण झालं आपणही छंद जोपासण्यास वेळ दिली पाहिजे असं मनात पक्क केलं आज खूप दिवस लोटल्यावर देखील मीही काम व छंद यातला बॅलन्स उत्तम रीतीने सावरला आहे