Shalini Wagh

Others

4.8  

Shalini Wagh

Others

गगन स्पर्श

गगन स्पर्श

1 min
1.9K


बालपणण खूप सुंदर असत. त्याकाळातिल आपले बाल विचार निरागस तर असतातच पण हास्यास्पद ही असतात.बालपणाचे विचार आपला परीसर कुटूंबात होणारे संवाद आणि घरातील धार्मिक वातावरण या आशा बाबींवर अर्धवट विचार सुरू होत असतात. बालपणी योगेश ला असाच एक विचार यायचा आकाश कडे पाहून हे आकाश निळ्या रंगाच्या कापडाने बनलेल आहे. अखंड कापड कुठून आल. ते कस पसरवल याबाबत अनभिज्ञ होता. पण देव सारकाही करू शकतो. हे ठाम होता त्या वेळी वय असेल 6/7 वर्षा च. आकाशाकडे पाहून हा विचार सतत मनत यायचा. आणि एक दिवस स्वप्न पडल. योगेश शिडी चढत जाऊन त्या कापड पर्यंत पोहचला. त्याच्या हाताने त्याला स्पर्श केला. ते खूप मुलायम होते. त्याने खिशातून चाकू काढला आणि ते कापड कापल त्यातून तो वर गेलो. वर पाहील तर गोठयाच गोठया चमकत होत्या. त्याने चार पाच गोठ्या खिशात घातल्या. आणि खाली यायला निघाला. तर पहतो काय शिडी गायब. खुप घाबरून गेला. आणि त्याला जाग आली असं हे लहान पण कल्पनेला मर्यादा नसते. कुठे ही स्वछंद ते जाऊ शकत.


Rate this content
Log in