त्याचा एकांत आणि ती
त्याचा एकांत आणि ती


खुप दिवसानंतर अनिल गावी आला होता .गावात फेरफटका मारताना त्याची नजर अचानक एका मैदानात असलेल्या बाकड्यावर गेली. कोणीतरी होतं तिथं हातपायाची होणारी हालचाल लक्षात आल्यावर अनिल त्याच्याजवळ गेला आणि बघतो तर काय बालपणीचा मित्र होता तो .मनोज, मनोज त्याचं नाव खूप दिवसातून त्यांची झालेली भेट पण दोघांमध्ये खूप फरक होता .अनिल च्या हातात बॅग होती आणि त्यात लॅपटॉप ,आणि मनोज मात्र त्याच्या एकांतात आणि तिच्यासोबत,म्हणजेच दारूची बाटली त्याचे ते लाल झालेले डोळे अनिल ने कसेबसे तरी त्याला सावरलं आणि थोडं गप्पांना सुरुवात झाली पिल्यानंतर गप्पा म्हणजे तिथे न्यायाधीशाची गरज नाही .अनिलच्या प्रश्नांचा भडीमार मनोज वर होत होता तू पीत नव्हता मग कसं ? काय ?कधीपासून पितो ? मनोज मात्र त्याच्या धुंदीत प्रश्नाचे उत्तर भेटत नव्हत त्याला सांभाळत त्याने त्याच्या घरी आणले .ती रात्र सरल्यावर मात्र सकाळ झाली. मनोज थोडा गडबडला आणि हिंमत करून अनिल समोर आला अनिल ने हि जरा गोडीत घेतलं आणि चर्चासत्र सुरू झाल चर्चेतून खूप प्रश्न समोर आले घरातला वाद-विवाद ,कामाच्या ठिकाणची ताणतणाव, डोक्यावर असलेले कर्ज, खूप काही कारणं होती एकंदरीत एकच ही टेन्शन फ्री होण्यासाठी मनोज दारू प्यायली होती .अनिल ला मात्र सर्व समजले होते त्यांनी खूप छान मार्गदर्शन केले त्याला
अनिल: थोडा आलेल्या टेन्शन कमी होण्यासाठी पिता पण थोडा थोडा करून त्याची सवय लागते आणि कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा झाली की त्याचे रूपांतर विषयात होते त्याला इंग्लिश मध्ये toxicity म्हणतात. मनोज शांततेत ऐकत होता.
मनोज: भावा तू सांगतो ते सर्व बरोबर आहे पण डोक्यातली गण गण शांत व्हावी म्हणून मी थोडी घेतली
अनिल: मग झाली का गण गण कमी अरे खुळ्या मी तुला सांगतो नेमकी काय होतं
अनिल उत्तरला आपल्या मेंदूमध्ये एक पडदा असतो त्या पडद्यातून अल्कोहोल सहजपणे पास होते आणि न्यूरॉन्स पर्यंत पोहोचते जेव्हा हे अल्कोहोल पेशीं पर्यंत पोहोचते तेव्हा मेंदू च्या हालचालीमध्ये बदल दिसतो ग्लूटामेट नावाचा न्युरोट्रान्समीटर निर्माण होतो आणि एक असा पडदा तयार होतो की भूल पडल्यासारखं होतं सगळ्या गोष्टींचा विसर पडतो आणि पिणाऱ्याला वाटते की टेन्शन फ्री झालो पण खरं तर तसं नसतं शुद्धीत आल्यानंतर याचाही विचार करायला हवा काही क्षणासाठी वाईट सवय लावून घेतो, आलेला पैसा काही क्षणाच्या टेन्शन फ्री सवयीसाठी वाया घालवतो , त्या ऐवजी मित्रांसोबत वेळ ,बगीच्यात जाणं , मेडिटेशन करणे, गाणी ऐकणं हे उपाय करू शकतो. मनोजला हे सर्व काही पटत होतं .मनोज ने ही ठरवल सोडून द्यायचं हे सर्व आणि अनिल च कौतुक केल. अनिल नि त्याच्या ज्ञानाचा वापर करून मनोज ची समजूत काढली आणि मनोज मध्येही बदल झाला अश्चर्याची गोष्ट आहे शिक्षण सारखच आहे तरीही वागण्यात बदल, विचारात बदल
तात्पर्य :शिक्षण सर्वच घेतात पैसे देऊन का होईना पण शिस्त ही आत्मसात करावी लागते त्याला नाही कोणती किंमत.