नाकारलेली सत्यता (दुसरा दिवस)
नाकारलेली सत्यता (दुसरा दिवस)


पुढील कथा माझ्या शब्दात
वार मंगळवार ,कॉलेजचा दुसरा दिवस. नेहमीप्रमाणे बस ची वाट पाहत मी स्टँडवर थांबलेली ,आणि बस आली. बस मध्ये पहिल्या सीटवर मला जागा मिळाली. बस आधीच पूर्ण भरलेली होती .पुढच्या स्टॉपवर शेजारी असलेली महिला खाली उतरली ,आणि एक व्यक्ती, जे की दिसण्यात, बोलण्यात ,वागण्यात जरा निराळा ...निराळेपण आढळलं शेजारील बाकावर बसलेली ती व्यक्ती कदाचित तृतीय पंथी असावी माझ्या लक्षात आलं. पण शेजारी बसल्या कारणास्तव त्या माझ्याशी हितगुज साधू लागली होती नाव काय, ? काय करते ? थोडक्यात बोलण आवरून "खुदा तेरा भला करे "असं म्हणत, हातावर टाळी वाजवत पुढे सरकली. सगळ्या लोकांना 'छान दिसतो ', देव तुझं भलं करेन ,तुला छान बायको मिळेल, असे बोलत पैसे गोळा केले आणि पुन्हा माझ्या शेजारी येऊन बसली .
लोकांच्या तिच्याकडे पाहण्याचा नजरा वेगळ्याच होत्या आणि मी पण जरा बिनधास्तपणे बोलत होते. माझा स्टॉप आला मी उतरले खाली. क्लासमध्ये आले नवीनच होते त्यामुळे जादा परिचय नव्हता कोणाशी, मानसी नावाची एक मुलगी, तिच्याशी बोलत असताना लक्षात आलं कि ती माझ्या घराजवळ थोड्या अंतरावर राहते आणि चर्चा सुरू झाली. अचानक प्रश्न केला आता याला प्रश्न म्हणावा की सल्ला मला समजलेच नाही प्रश्न असा होता की बस मध्ये तू त्या व्यक्तीसोबत बोललीस का.... ते कोण आहेत माहिती आहे का? आणि विविध प्रश्नचिन्ह माझ्या भोवती उभे केले मी नॉर्मली सांगत होते पण तिचे विचार आणि डोकं थांबायला तयारच नव्हतं .
माझ्याकडे निगेटिव दृष्टिकोनाने काही मुली पाहू लागल्या माझ्या मनाला जरा लागलं ते पण तरीही मी शांत राहिले मनात प्रश्न कल्लोळ चालू होता आणि माझाही डोक्यात विचार आला. महाविद्यालयात शिकायला गेले पण इथे फक्त पुस्तकी अभ्यासक्रम पाहिला जातो समाजाने घातलेल्या परंपरा कोणी तोडण्याचे धाडस करत नाही. आणि दिलखुलास प्रमाणे राहणं म्हणजे जणू "जीवावर तलवारीचे घाव" असंच वाटू लागलं होतं. मला पण त्याच दिवशी समजलं इथे शिक्षण दिलं जातं युनिव्हर्सिटीने ठरवलेल्या अभ्यासक्रमाच. जगाचा अभ्यास स्वतःला करावा लागणार मला मान्य होतं तृतीयपंथी व्यक्ती निराळी जरी असली तरीही वाईट असतेच असं नाही त्या व्यक्तीने मला दिलेले गुड विशेष छानच होते. मला काही वाईट वाटलं नाही पण कदाचित त्या मुलींनी नाकारलेली सत्यता असेल असं वाटलं आणि थोड्याफार प्रमाणात मनाच्या द्विधा अवस्थेत मी गेले. दुसरा दिवस कॉलेजचा त्यातही नाकारलेली सत्यता ताळमेळ बसणं जरा अवघडच स्वतः क्लियर असावं असं म्हणतात मी तर आहे पण कुठेतरी बदल व्हायला हवा असा विचार करत दुसऱ्या दिवसाचा शेवट झाला.