शोध स्वतःचा
शोध स्वतःचा


माझ्या निदर्शनास आलेली गोष्ट .खडक उन्हाळ्याचे दिवस ,आणि घरातील लाईट गेलेली. विशाल आणि आई बाहेर बसलेले होते मोकळ्या हवेत ,घरातील मंडळी सुट्ट्यांना बाहेर गेलेली होती .घरात पूर्ण शांतता होती पण करमत नसल्या कारणाने बाहेर बसून गप्पा करत होते. विशालच्या बोलण्यात थोडासा निराळेपण आढळत होता. बालपण आणि आता संसाराचा सारीपाट खेळताना त्यात झालेले बदल आईने जाणले होते .आणि मग चर्चा सुरू झाली
कामाचा तणाव ,बायकोची चिडचिड वाढती धावपळ, त्यामुळे विषय विशालचा स्वभाव चिडचिडा झाला होता .अशांत होत होता तो .
आई : त्याला विचारते सर्व काही ठीक आहे ना बाळा
विशाल : समजत नाही आहे सर्व काही असून पण मी सुखी नाही चिडचिड होते माझे
आई : सर्व काही ठीक होईल लवकरच
विशाल : चिडला आणि आईला म्हणाला पण कधी बोलणं सोपं असतं
आई विशालला समजावत नाही बाळा तू विनाकारण दुसऱ्या गोष्टीच्या मागे धावतोय तुझ सुख, दुख सगळं काही तुझ्या हातात आहे मग का त्यामागे पळतोय ? सुख तुझा अंतरिक गुण आहे . लहानपणी तू गाडी खेळताना जर अचानक कोणी गाडी घेतली तर तू खूप रडायचा. त्याला जे पाहिजे ते तुला पण पाहिजे मग थोडा मोठा झाल्यानंतर तुझ्या लक्षात यायला लागले की ती वस्तू खेळानंतर समोरची व्यक्ती आपोआप देऊन टाकेल हे तुझ्याही लक्षात आले मग तू रडन ही सोडून दिलं तसेच सुख ,प्रेम ,समाधान ,सगळं काही तुझ्यामध्ये आहे पण तू मात्र आता शोधण्यात व्यस्थ झालाय धावपळीच्या जगात तुला धावण्याची सवय लागली आहे थोडा थांब सावलीच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला तर सावली पुढे पुढेच पळणार तिला नाही धरू शकत . खूपदा असं होतं हरवलेली वस्तू स्वतःजवळ असते पण दुसरीकडे शोधण्याचा प्रयत्न करतो . विशाल ला ही सर्व काही मान्य झालं आणि जीवन जगण्याची एक नवीन दिशा भेटली.