होस्टेल
होस्टेल


सोमवारचा तो दिवस होता. गच्ची मध्ये बसलेली मी, आणि पोस्टमन आला त्याच्या हातातील टपाल घेतले सही केली. अश्विनीच्या नावाने आलेलं पत्र होते. अश्विनी माझी मोठी बहीण आणि प्रिया माझी छोटी बहिण पत्रात काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती या पत्रामध्ये get together साठी तिच्या वर्गातील मुलींनी केलेले नियोजन होतं. अश्विनीला घरातून परवानगी भेटल्यानंतर प्रियालाही ताई बरोबर जायचे होते खुप दिवसानंतर सर्व मुली एकत्र भेटणार होत्या , आणि तयारी सुरु झाली. आणि ठरल्याप्रमाणे सर्वांनी बसस्टॉप वर भेटायचं ठरलं होतं. सर्वांची भेट झाल्यानंतर छोटेमोठे कार्यक्रम पार पडले. आणि एक दिवस शाळेला आणि होस्टेलला भेट द्यायचे ठरवले तो दिवस उजाडला शाळा आणि गेट पाहिल्यानंतर आठवणींना परत उजाळा मिळाला. आनंदाने मन भरून आले... शाळेतील बाकडे आणि शिक्षक आठवू लागले. खेळण्याचे मैदान आणि जेवणासाठी बसण्याचे झाड आता मात्र ते झाड तिथे नव्हते शाळेमध्ये खूप बदल झाला होता. शाळा फिरून झाल्यानंतर आणि शिक्षकांची भेट घेतल्यानंतर प्रत्येकाची पावले होस्टेलकडे वळत होती आणि मैत्रिणींच्या चेहऱ्यावर हसू पण मनात खूप काही दडलेलं होतं. अश्विनीच्या डोळ्याला तर पाणीच आले
प्रिया ; - ने विचारले ताई काय झाले ? मग अश्विनीच्या भावनांनी अजूनच उंच झेप घेतली. अश्विनी आणि मैत्रिणी तिला होस्टेलच्या गमती सांगू लागल्या. प्रियालाही आश्चर्य वाटत होतं. सोडलेले होस्टेल आणि शाळा यात काय असावे ? की ताई आणि मैत्रिणी इतक्या दिवसानंतर येऊनही खुश आहेत सगळ्या मुली आपापल्या बेडजवळ गेल्या बेडवर प्रचंड धूळ होती पण त्या धुळीत त्यांच्या आठवणींचे धूके दिसत होते.
प्रिया :- अश्विनीताई होस्टेल ला सोडल्यावर तुला घरचे आठवण नाही आली ?
अश्विनी:- आली ना खूप आली खूप रडले होते, खूप काही दिवस करमत देखील नव्हता वातावरणात बदल आणि नवीन मैत्रिणी ऍडजस्ट करणे अवघडच होतं पण करून घेतलं.
प्रिया:- ताई आई-बाबा जवळ नसताना तुझ्या मैत्रिणी तुला जीव लावायच्या का?
अश्विनी:- तेव्हा नवीन नवीन नव्हतं समजत खूप मैत्रिणी दुश्मन वाटत होत्या सारखे भांडण रांगेत नंबर लावण्यापासून झोपताना लाईट चालू ठेवण्यापर्यंत खूप तू तू
मी मी मी होत होतं खूप दिवस त्यांच्यासोबत राहिल्यानंतर मनातले गैरसमज दूर झाले त्यांच्याबद्दलचे, मी अड्जस्ट करायला शिकले, आणि ज्या मैत्रिणी मला दुश्मन वाटत होत्या त्याच मैत्रिणी माझ्या पक्क्या फ्रेंड झाल्या. आजही आम्ही सोबत आहोत.
ताईच्या बोलण्यात दुःख डोळ्यात पाणी आणी चेहर्यावर हसू सांगत होतं होस्टेलमध्ये लपलेल्या आठवणी.
आठवड्यातून एक दिवस फोनचा महिन्यातून एक दिवस भेटण्याचा बस येवढच पण त्यास होस्टेलमध्ये परके आपले बनले होते. रात्री खेळलेले गाण्यांच्या भेंड्या, दम-शेरा ,आठवण आल्यानंतर रडणार्या मुली, रेक्टर मॅडम समजावताना, घरून आणलेला खाऊ वाटून खाणं आणि रूम मधल्या मुलींचे अबोला सोडवणे ,हे तर खूप चालायचं हॉस्टेलमध्ये. ती हॉस्टेलची रूम मात्र आता अडगळीची खोली तयार झाली होती पण खूप खूप काही आठवणी अजूनही तिथे आहेत कधी कधी वाटायचं खूप कंटाळा आलाय होस्टेलमध्ये राहून पण हॉस्टेल सोडावे लागणार शिक्षण पूर्ण होत आलं होतं. पुढील शिक्षणासाठी बाहेर जायचं होतं समजत होतं पण मन मात्र ऐकायला तयार नव्हतं आणि हॉस्टेल सोडताना खूप खूप रडलो सगळं काही आठवत होतं .ताईच्या डोळ्यातून तर गंगा जमुना निघत होत्या प्रियालाही होस्टेल बद्दल आवड निर्माण होऊ लागली होती. वेळ इतकी लवकर गेली ती घरी जाण्याची वेळ आली सगळ्यांच्या जीवनाचा आढावा घेण्याचे काम सुरू झालं..नोकरी मिळालेली होती, पगार पाणी ठीक पण टाईमच कमी पडत होता. आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि मैत्रिणींचे भेट मात्र सोशल मीडिया व्हाट्सअप हाईक सारख्या ॲप ज्यादा वापरू लागले होते पण आजचे हॉस्टेल भेट झाल्यानंतर सगळ्यांचे चेहरे आनंदी दिसत होते .
प्रियाला आवड निर्माण झालेली आहे होस्टेल बद्दल हेही मुलांच्या लक्षात आले आणि हसता-हसता म्हणाल्या तू ही जगून बघ हॉस्टेल लाईफ. खूप काही गोष्टी असतात आई आई बाबा परिवार सोबत राहून नाही समजत पण खरे अनुभव हे हॉस्टेलमध्ये येतात मग ते सुखद असो दुःखद आयुष्यभर लक्षात राहणारे .आणि आठवल्यावर मात्र डोळे ओले चिंब होणारे. प्रियालाही छान वाटलं आणि हॉस्टेल लांब आई-बाबा नसतात ही भीती ची संकल्पना दूर झाली आणि ती ही भावी आयुष्यात संधी आलीच तर बाहेर जाण्यास मनाच्या तयारीला लागली.