आणि शेवटी गंगेत घोडं न्हालं...
आणि शेवटी गंगेत घोडं न्हालं...
अनन्या आणि कबीर म्हणजे अगदी उत्तर दक्षिण...अनन्या तामिळ सावळी, स्मार्ट आणि अतिशय हुशार, महत्वकांशी मुलगी...तर कबीर गोरापान, हुशार आणि संवेदनशील मुलगा... दोघांच्या भाषा, चालीरीती सगळंच वेगळं. दोघेही अगदी एकमेकांच्या विरुद्ध... पण मनाला हा बांध कसा कळणार... दोघेही एकमेकांच्या प्रेमात अगदी आकंठ बुडालेले होते. लवकरच आपल्या या प्रेमाला एक नाव मिळून आपण लग्न बंधनात बांधले जावे अशी त्यांची इच्छा होती.
पण... हा पण खूपच मोठा होता. दोघांच्याही घरचे त्यांच्या लग्नाला तयार नव्हते. खूप समजावूनसुद्धा त्यांचा नकार काही बदलला नाहीच...
घरच्यांच्या संमतीशिवाय लग्न न करण्याचा निर्णय दोघांनीही घेतला होता त्यामुळे आता अगदी नाईलाज झाला होता. दोघांच्याही घरच्यांनी त्यांना एकमेकांना न भेटण्याचं वचन घेतलं. दोघेही एकमेकापासून वेगळे झाल्यामुळे अगदी खंगत चालले होते. त्यांची अवस्था दोघांच्याही आई बाबांना बघवली नाही. खूप सांगूनही दोघे दुसऱ्या कोणाशीही लग्नाला तयार नव्हते...
शेवटी दोन्हीकडच्या मंडळींनी अनन्या आणि कबीरच्या लग्नाला संमती दिली. कबीर - अनन्या दोघांनाही काही कळू न देता दोन्ही परिवारांची परस्पर भेट झाली आणि लग्न दोन्ही पद्धतीने होईल यावर एकमत झालं..! लग्नपत्रिका छापून आई-बाबांनी अनन्या आणि कबीरला सरप्राइज दिलं..
आणि शेवटी एकदाचं गंगेत घोडं न्हालं...!

