आणि मृत्यू येऊन गेला...
आणि मृत्यू येऊन गेला...


एक होता तो अन एक होती ती… दोघांच एकमेकांवर खूप प्रेम होतं… आता तर लग्नही होणार होतं… ती म्हणजे आनंदाचा उसळता झराच होती… तिच्या नजरेतून बघितलं तर आयुष्य म्हणजे एक मोठा उत्सवच होत… तो फार खुश होता, जिच्यावर तो जीवापाड प्रेम करत होता ती आता त्याच्या आयुष्याचा एक भाग होणार होती… अशातच एक दिवस… तिच्या गाडीला अपघात झाला … खरतर हे ऐकून तो हादरलाच होता… पण तिचे डोळे जाण्याशिवाय तिला कुठलीही दुखापत झालेली नाही हे ऐकून तो सावरला...बाकी सर्व छोट्यामोठ्या जखम भरत आल्या तरी अजूनही तिच्यासाठी दुसऱ्या पर्यायी डोळ्यांची व्यवस्था काही होऊ शकली नव्हती… अशाच परिस्थितीत २ महिने निघून गेले… आणि एक दिवस ती आनंदाची खबर घेऊनच सकाळ उजाडली… तिला पुन्हा पाहता येणार होतं… तिच्यासाठी कुणा अनामिक दात्याचे डोळे मिळाले होते… सगळ्यांनाच खूप आनंद झाला … सगळे सोपस्कार पार पडून १५ व्या दिवशी तिच्या डोळ्यांची पट्टी सोडण्यात आली… पहिल्याच प्रयत्नात तिने अगदी त्याच्यासकट सगळ्यांना ओळखलं… नुकताच कुठ आठवडा उलटला होता न अचनक… नुकताच कुठ आठवडा उलटला होता अन अचानक त्या रात्री तिचे डोळे फारच चुरचुरायला लागले… हळूहळू त्यांची आग व्हायला लागली… काही क्षणानंतर ती म्हणाली कि तो आता पायऱ्या चढून आलाय… त्याला दार उघडण्याची गरज लागत नाही… तो तसाच आत घुसेल… साळवी आजींचा हात धरून त्यांना ओढून घेऊन जाईल… बस आणि ती तिची शुद्ध हरवून बसली… त्यानंतर आलेल्या जागेपणी तिला काहीच आठवत नव्हतं… त्याने तिला सांगितलं कि आज पहाटेच साळवी आज्जी गेल्या… आणि मग हे घडत राहिलं… सतत… त्याला मनस्ताप होईल इतके वेळा… कधी कुणाचा अपघात होई… कुणी आत्महत्या करे… कुणाची हत्या होई… पण जेव्हा जेव्हा तिचे डोळे चुरचुरत तेव्हा तेव्हा हे असच काही ऐकायला येई… या सगळ्यांनी त्याच्यापेक्षा तीच जास्त धास्तावली होती… कुठे आधीच आयुष्य अन कुठे आताचं हे सापळ्यात सापडल्यासारखं … तिला डोळे मिटायचीच भीती वाटायला लागली आताशा… आणि त्याही रात्री तिचे डोळे चुरचुरायला लागले… पण आज तो तिच्याजवळ नव्हता… कुठल्यातरी मिटिंग मध्ये अडकला होता… तिने रेकॉर्ड करून आपला आवाज पाठवून दिला… मी उद्या लोकलमध्ये असेन। साधारण ९ वजता… माहित नाही मी नक्की कुठे जातेय… पण घड्याळात ९.३० वाजलेले असताना एक मोठा आवाज होइल… कशाचा कुणास ठाऊक?… पण मग सगळीकडे आगीच साम्राज्य पसरेल… तेवढ्याच वेळात तो येईल मझ्याकडे… चल तुझी वेळ संपली असं म्हणेल आणि मला घेऊन जाईल… अर्ध्या रात्री परतताना त्याने ते सगळं ऐकलं… ती जाणार ह्याच्या नुसत्या कल्पनेनच तो सैरभैर झाला… तशातही तिला गमवायंच नाहीये असं मनाशी पक्का ठरवलं त्याने… ती सकाळ तशी अस्वस्थच होती… तिला फोन आला अन तिने डॉक्टरांकडे जाण्याची तयारी सुरु केली… ती नाही म्हणत असतानाही तो हट्टालाच पेटला सोबत येणारच म्हणून… शेवटी दोघंही एकत्रच बाहेर पडले… तो फक्त बघत होता कि ती जे म्हणाली ते न ते सगळ तसाच घडतय का ते… अगदी ९.२० मिनिटांनी त्याने साखळी खेचली अन गाडीची गती कमी होण्याची वाटही न बघता आपल्याला काही दुखापत होईल याची जराशीही पर्वा न करता तिचा हात हातात घटत धरून जीवाच्या आकांताने बाहेर उडी मारली… फ्लटफॉर्मवर पडलेले ते दोघेही सावरतायतच इतक्यात मोठा आवाज झाला आणि दुसऱ्याच क्षणाला आगीच्या ज्वालांनी तो डबा घेरला होता… सगळीकडे किंकाळ्या न आरडा ओरड्याचा आवाज भरून राहिला होत… पण तो मात्र खुशीत होत… ती अजूनही त्याच्यासोबतच होति… अगदी तशीच… त्याची ति… पण जेव्हा अग्निशामक दल आग विझवायला आले तेव्हा त्याच्या लक्षात आलं कि तिला पुन्हा दिसत नहिये…