Vilas Yadavrao kaklij

Drama Tragedy Inspirational

2  

Vilas Yadavrao kaklij

Drama Tragedy Inspirational

आनंद

आनंद

4 mins
144


मानवी जीवनाचा तुलनात्मक अभ्यास या विषयावर संशोधन करित मी अनेक राज्य गावे फिरत विविध प्रकारची लोक कशा रितीने जी व न जातात हे प्रत्यक्ष त्यांच्यात राहून अनुभव घेत गेली २२ वर्ष माझा प्रवास चालु आहे . अशात एका गावात जागृत देवस्थान प्रसिध्द आहे व लोक प्रचंड गर्दीने का ?येतात हे जाणून घेण्यासाठी मी जाण्याचे ठरवले . त्याप्रमाणे सकाळी लवकर एसटी स्टॅन्ड वर पोहचलो. बस दुपारी व एकच गाडी त्या रस्त्याने जाते व एका फाटयावर उतरून पाई चालत जावे लागते अशी थोडी माहिती होती . त्याप्रमाणे दिवसभर मी गाडीची प्रतिक्षा करत थांबलो पोटासाठी कशा प्रकारे लोक धावतात कष्ट करतात . हे बघत होतो .एक चारपाच वर्षाच पोरगा गोळयचणे फुटाणे विकत होते साहेब घ्या ना ? त्याचे कडे बघुन मी फुटाणे व गोळया घेतल्या त्याचा चेहरा खुलला होता मला खानून मिळणारे समाधानापेक्षा त्याचे चेहऱ्यावरिल समाधान जास्त वाटले दुपारी चार वाजता बस आली गाडीत जावून बसलो मात्र सिट भरत नव्हते मुक्कमी बस असल्याने ड्रायव्हरला घाई नव्हती शेवटी कडंक्टर आला .म्हसोबा फाटा चे तिकिट घेतले बस काही निघत नव्हती शेवटी कळाले कि अजून शेंवता आजी आली नाही . धावत पळत एक म्हातारी आली सारे प्रवाशी शेंवता आज उशिरका ? झाला कधी वेळ न चुकवणारी शेंवता गाडीत चढली डोक्यावर टोपली एक गाठोड जणु एखादा साहेब आल्याप्रमाणे गाडी निघाली दोन तासानीं बस उधळत निघाली जीव मुठित धरून धूळ खात बस निघाली कच्चा रस्ता ,खड्डे , अंगदुखत एका फाटयावर बस थांबली मी व म्हातारी उतरलो शेंवता म्हणाली पाव्हण कुणाकडे वाडीला जायचे ? कारण शेंवता प्रत्येकाला ओळखत होती .मी म्हणालो नाही सहज वाडी बघायची म्हणून आलो. मग रहाणार कुठ एखादया मंदिरात ? साहेब इथुन चार मैल चालत जाव लागेल अंधार पडतो वाडीत पोहचायला रात्री?वाडीत एकच मंदिर आहे टेकडीवर मात्र रात्री कुत्री मांजरी पण फिरकत नाही मग राहिल कुठतरि जागा मिळेल कि . पण पाव्हण विनाकारण कुणीसहज फिरत नाही तुम्ही काही तपास करता काय ? नाही आजी मी लोकांचा अभ्यास करतो . काही पुस्तक लिहतो .मी दोन पद्व्या घेवून अनेक गावे पालथी घातली पण शेंवता कडे असलेल ज्ञान व अनुभव बघुन हे एक चालते बोलते विद्यापीठ होते माझ्या प्रत्येक प्रश्नाच उतर शेंवताकडे होत . चालता चालता पाय दुखत होती पण म्हातारी कडे वतीचा चालण्याचा वेग पाहुण मी मुकाटपणे धापा टाकत चालत होतो पाव्हण दमला कि एवढे तरणा गडी धाप लागते शारीर पोसल . कमावल दिसत नाही ?आजी तुमच वय किती असल काय सांगता येत नाही पण मोठा दुष्काळ व्हता त व्हा माझा धाकला लेक वीस वर्षाला होता . अंदाज केला तेंव्हा म्हातारी सत्तर ऐंशी वर्षाची होती एकदा वाडी जवळ आली सारी माहिती देत एकदा पोहचलो चला पाव्हण माझ्या घरला चहा घ्या माझ्या वाडयात रहा  माझ्या लेका वाणी आहे . वाडयात पोहचलो भला मोठा वाडा त्यात एकही शेवंता रहात होती . पाणी दिल हातपाय धुतले व चहा टाकला म्हातारी न गाईची धारकाढली चारा पाणी केला मायेने हात फिरवला आजी तुझा घरची माणस ?१ोंवता सांगू लागली धनी गेल आज तीस वर्ष झाली असतील दोन मूल वरच्या गल्ली तर रहातात तुम्ही एकट्या होय दुसऱ्याच्या संसारात लुडबुड करणे मला आवडत नाही कष्टान कमावून खाव समाधानी व आनंदी रहाव . साहेब सुखा मागे पळत सुटला कि ते सापडत नाही मात्र दुःख वाटयाला येत व त्यातून वाट काढत काढत आयुष्य सरत म्हणून सुखासाठी पळायचे नाही आनंदि जीवन जगायचे सुख तुमच्या घरात आंनदाने येईलव दुःख शोधुन सापडायचे नाही . काही मूले होत नाही म्हणून आयुष्यभर प्रयत्न करतात त्यांचे साठि राबतात व शेवटी मूल त्यांचे साठी जगतात व पदरी दुःख वाटयाला पण आयुष्यात आहे त्या गोष्टीत समाधान मानायच , आनंद सापडवायचा जास्त गोष्टी जमावल्या कि त्यासाभंळण्यात वेळ जातो उपभोगण्याचा आनंदच मिळत नसे ल तर उपयोग काय ?साहेब मी लेकाच्या घरि साहिले असते तर विना कष्ट मिळेण्याची अपेक्षा ठेवून शरिर रोगी व भोगी झाले असते व आज स्वतःच्या पायाने चालता आले नसते ? प्रत्येक गोष्टीत आनंद माना शोधायची गरज पडणार नाही . सुखाचा पसारा वाढला कि तेच दुःख तयार होते व त्यात आयुष्य हरवून जाते . हरवल्याचे दुःख केले कि जीवनातील आनंद संपतो व तो संपला कि जीवन व्यर्थ .भकस वाटते व ते संपवण्याचा प्रयत्न होतो म्हणून साहेब मी माझ्या जीवनात आनंदी आहे .मी साऱ्या गप्पा ऐकुण हेच जागृत देवस्या न व विद्यापीठ आहे मला सर्व काही मिळाल्याचा आनंद झाला धन्य ती शेंवा ना व मला मिळालेला खरा " आनंद "


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama