शब्दसखी सुनिता

Romance Tragedy Others

4.0  

शब्दसखी सुनिता

Romance Tragedy Others

आजही मी फक्त तुझीच आहे

आजही मी फक्त तुझीच आहे

8 mins
261


    सकाळचा प्रसन्न वारा मनाला स्पर्शून जातहोता. सूर्यनारायनाने डोके वर काढले होते.गॅलरीमध्ये नंदिनी बसली होती. चहा घेत होती.ती सतत आठवणींत रमायची... हेच तिच विश्वझाल होत.... पण आलेला दिवस ती मस्त आणिआनंदात घालवायची. तिच्या आदित्यला जसआवडायच तस... अस चेहरा पाडून बसल कीत्याला आवडायच नाही... तो म्हणायच ' सगळ्याजगाच दुःख जस काही तुलाच दिलय ' कशीचेहरा पाडून बसली आहेस... मग तो विनोद सांगुन कींवा काहीतरी फनी करायचा आणि मलाहसायला लावायचा... तेव्हा म्हणायचा बघ आताकिती छान दिसतेस... हसत खेळत जगायच ग ...अस नेहमी सांगायचा. तिला डायरी लिहायचीआवड होती... ती काहीतरी लिहण्यात मग्न होती... तेवढ्यात तिने गाण्याच्या काही ओळीकानावर पडल्या....  तुम बीन जिया जाए कैसे   कैसे जिया जाये तुम बीन  सदियों से लम्बीं है राते  सदियों से लम्बें हुए दिन आ जाओ लौट कर तुम ये दिल कह राहा है ....    


नकळत तिच्या डोळ्यांतुन अश्रूंच्या धारा वाहूलागल्या... तिला जुने दिवस आठवले...नंदिनी आणि आदीत्य एकाच ऑफिसमध्ये काम करायचे. नंदीनी नवीनच त्याच्या ऑफीसमध्येजाॅईन झाली होती. सुरूवातीला त्याने तिलाकामात खुप समजुन घेतल आणि काहीही लागलतर मदत करायचा. आदीत्यने नंदीनीला कामाचसगळ समजावून सांगितल आणि सर्व स्टाफशीतिची ओळख करून दिली. ऑफीसवर्क मधलजे काही समजल नाही ते मला विचार मी सांगेलअस सांगितल. नंंदीनीला तर त्याच दिवशी त्याच समजुन घेण , care करण खुप आवडलहोत... नाहीतर या जगात ओळख नसताना एवढकुणी समजावून घेत नाही... पण हा आदित्यखरच किती वेगळा आहे ना हे तेव्हाच समजलहोत. पहिल्याच दिवशी ऑफीसमध्ये कुणीतरीचांगला फ्रेंड मिळाला , म्हणून तिला खुप आनंदझाली होता. खर तिला पहिल्या दिवशीपासुनचतो आवडू लागला होता... हळूहळू ती त्यालाअजुन जवळून ओळखत होती. त्याच काम परफेक्ट असायच. तो प्रामाणिकपणे काम तरकरायचा... पण दिलेली जबाबदारी चोख पार पाडायचा... बाॅसचाही तो आवडता होता. ते नेहमी त्याच कौतुक करायचे. ऑफीसमध्ये त्याच सर्वांशी चांगल जमायच... सर्वच त्याचे फ्रेंन्ड्स होते. मुली तर त्याच्यावर फिदा होत्या. पण त्याला मुलींशी जास्त बोलायला आवडत नव्हते.


तो मनाने चांगला तर होता... शांत स्वभाव आणिसर्वांना समजुन घ्यायचा आणि मुलींचा आदरकरणारा होता. हे सगळ मला हळूहळू कळत गेल.तसा तो अजुन आवडायला लागला... आमचीओळख झाली होती. कामाच्या बाबतीत थोडबोलण व्हायच. मी सुरूवातीला जरा शांतचबसायचे. नवीन होते म्हणून... थोडी घाबरायचे.पण ती सानवी... अरे बाप रे सारखी आदित्यलाबोलायची, काही ना काही कारण काढुन ....सारखी त्याच्या मागे लागलेली असायची...खुप वेडी होती ती... मला तिचा खुप राग यायचा.कारण मला पण आदित्य आवडायला लागलाहोता. तो मला बोलू लागला होता... काम जमतयकी नाही विचारायचा... मी पण त्याला बोलायचे.मला त्याच्याशी बोलायला आवडायचा... त्याचास्वभाव छान होता... मनमोकळेपणाने बोलायचा...माझी पण नंतर ऑफीसमध्ये सर्वांशी चांगलीमैत्री झाली. मग काहीच टेन्शन नसे, सगळेएकमेकांना समजुन घ्यायचे. मग आदित्य आणिमि रोजच ब्रेकमध्ये बोलायचो... आमची मैत्री झाली... हळूहळू एकमेकांना गोष्टी शेअर करू लागलो... ऑफीस सुटल की मला पाणीपुरी खायला खुप आवडायच.... कींवा आदीत्यसोबतअसल्यावर चहा... त्याच्यासोबत खुप मस्त वाटायचा... सगळा कामाचा ताणच दूर पळूनजायचा... आदीत्यला बाहेरच खाण आवडत नसल तरी तो सोबत असायचा.     


 आदित्यला त्याच्याबद्दल मी विचारल तर तोघरात लहान आणि दोन मोठ्या बहीणींची लग्नझालेली होती. मग त्याने मला विचारल...मी एकटी आहे, मला सख्खे बहीण भाऊ नाहीत,पण चुलत बहीण भाऊ आहेत, खुप मोठी फॅमीलीआणि आई गावी असतात. शेती खुप आहे...बाबा लवकर गेले म्हणुन सगळ शेतीच काकाबघतात. आणि मी नंदीनी... हसत ती स्वतःबद्दलसांगते... शिक्षण झाल्यावर इथे मुंबईत तुझ्यासोबतजाॅब करते. आदित्यला तिला अस बोलताना बघुन खुप हसायला आल...नंदीनी - आदि , माझ्या बोलण्यावर हसलास ना...दात काढ तु .... आम्ही काय बिचारे गावाकडीललोक... अस तुमच्यासारख स्टँडर्ड नाही बोलतायेत...आदीत्य - हो का मिस नंदीनी मॅडम ...अहो खुपच भारी बोलता तुम्ही... बोलता बोलताआदीत्य म्हटला की म्हणुनच तुम्ही मला खुपआवडता... नंदिनीला आनंद झाला पण ती क्षणभर थांबली... पण आदीत्यने लगेच विषयबदलला... पण तो मनातल बोलून गेला होता.नंदिनीला खुप भारी वाटत होत... ' आज यानेमला अस म्हटल... खर सांगु मला खुप आवडल.  काही दिवसांनी नंदिनी गावाला गेली. तिच्याआईला तिची खुप काळजी वाटत होती... इकडेआदित्य रोज नंदीनीला काॅल करायचा, त्यालातिच्याशिवाय ऑफीसमध्येही करमत नव्हत. मग आदीत्यने सांगितल की आईलाच इकडे घेऊन ये... त्याच्या म्हणण्याप्रमाणे नंदीनीने आईलाशहरात मुंबईला आणल... दोघी मस्त फ्लॅटमध्येराहू लागल्या... आईलाही छान वाटल...


पण या सगळ्यात तिला आदीत्य आणि तिची मैत्रीण नेहायांनी खुप मदत केली. परत पहिल्यासारख छानवाटु लागल. दोघांनाही एकमेकांची सोबत हवीशी वाटत होती. मैत्री छान दिवसेंदिवस बहरत चाललीहोती. आदित्य जरा बोलायला घाबरायचा... म्हणून मीच त्याची गंमतीत मज्जा घ्यायची.कधी कधी मुद्दाम रागवायचे... तेव्हा त्याला खरवाटायचा... तेव्हा आदीत्यचा उतरलेला चेहराआणि सारख सारख साॅरी म्हणुन मनवण मलाखुप आवडायच. मी पण थोड्या वेळ जाऊनद्यायचे. मग त्याला माफ केलय तुला सांगायचे.कधी कधी तर मला त्याच्यावर खुप हसायला यायच. पण त्याला माझा स्वभाव कळायला लागला होता. तिला चेष्टा मस्करी करायची सवयआहे , हे त्याला समजल होत.    सगळ छान चालल होत. आदीत्य आणि मीसुट्टी असल्यावर फिरायला जाण.... कधी मुव्हीबघायला जाण, ट्रिपलाही जायचो, खुप धम्मालकरायचो. इथे आल्यापासुन ना आदित्यमुळे मीखर जगायला शिकले. एक दिवस माझ्या आईनेआदीत्यला आणि नेहाला घरी जेवायला बोलवलहोत. तेव्हा पासुन आईलाही आदीत्य चा स्वभावआवडला होता. तो नेहमीच सपोर्ट करायचा.नेहा तर आम्हांला दोघांना खुप चिडवायची...आमच्या दोघांचीही काॅमन फ्रेंड.... एकमेकांच्यासाथीने लाईफ मस्त enjoy करत होतो.      


आदीत्य खुप खुश असायचा, नंदीनीमुळे तोस्वतःला वेळ देऊ लागला होता. नाहीतर नुसतआॅफीस, मिटींगची फाईल आणि काॅलवर बोलणएवढच चाललेल असायच. कुणाशीची जास्त बोलत नव्हता. पण आपल्या मुलात झालेला बदलमिनलला जाणवला.... मिनल म्हणजे आदीत्यचीआई.... चला, बर झाल देवा... नक्कीच आदीत्यकुणा मुलीच्या प्रेमात पडला असणार.... म्हणुनदेवाला नमस्कार करतात आणि खुश होतात.पेपर वाचणारे आदीत्यचे बाबाही तीच ते वागणबघुन हसतात... आदीत्य लहान होता आणि एकच मुलगा असल्यामुळे त्याची जास्त काळजीआईला वाटायची. आदीत्य हळूहळू नंदीनीमध्ये गुंतू लागला होता.त्याला एक दिवस पण तिच्याशिवाय करमत नसे.आणि नंदीनीचही असच होत. दोघांपैकी कुणीनाही आल तर ते नेहालाच विचारायचे. नेहा यांची जवळची आणि खास मैत्रीण होती. नंदीनीला आदीत्य खुप आवडायचा... तो इतरमुलांपेक्षा वेगळा होता... ऑफीसच्या रस्त्यावर गणपतीच मंदीर होत. आदीत्य रोज सकाळी मंदिरात जाऊन देवाला नमस्कार करुन ऑफीसला यायचा... एक दिवस चतुर्थी होती, नेहाहीजायची मंदिरात त्यादिवशी पण तिच्यासोबत गेले.तेव्हा आदित्य तिथे देवाला नमस्कार करून हातजोडून बराच वेळ ऊभा होता. मी आणि नेहानेत्याला बघितल आणि बाहेर आल्यावर नेहानेत्याला विचारल....  " आदीत्य तु देवाजवळ इतका वेळ काय मागत होतास " सांग ना मला.चांगली मुलगी मिळो लग्नासाठी की गर्लफ्रेंड...बोल ना हेच मागत होतास ना....आदित्य - ( गोंधळून गेला त्याला काय बोलाव पटकन् तेच कळेना ) नेहा, अस काहीच नाही म्हटल मी.... तो शांत झाला....लगेच नेहा अरे आदित्य काय झाल...??सहज म्हटल लगेच सिरियस नको होऊ...नंदीनी या दौघांच बोलण ऐकून आणि त्याचीअवस्था बघून तिला हसायला येत होत. मगतिघेही गप्पा मारत ऑफीसला गेले. आमच्यातिघांचही छान जमायच....     


या दोन वर्षाच्या प्रवासानंतर अखेर नंदीनीआणि आदीत्यने एकमेकांना प्रपोझ करून पुढेही असच सोबत राहू म्हणून एकमेकांना प्रोमीसकेल. दोघे कधी एकमेकांचे झाले त्यांच त्यांनाकळल नाही... पण त्यांच एकमेकांवर प्रेमआहे हे त्यांना समजल होत... पहील्यासारख सगळ छान चालल होत. दोघेही आपापल्या घरीसांगणार होते. नंदीनीला तर हे स्वप्नच वाटत होत.आयुष्यभराची स्पप्ने रंगवायला लागली होती...तिला नेहा आणि आदीत्य चांगले मित्र मिळालेहे God gift च होत. एकदा आई आजारी पडलीमी ऑफीसला नाही गेले तर आदीत्य घरी आला.त्याला आई आजारी आहे कळल तर त्याने आईशी गप्पा मारल्या तिला लवकर बर व्हा...अस सांगितल नि आईला त्याच हे बोलण खुपछान वाटायच.... आपलेपणा वाटायचा...मला तर त्याच्याविषयी असणारा आदर अजुनवाढला. कधी मी आजारी पडले तर तो रागवायचाकाळजी घेत जा म्हणुन... तो खुप माझी काळजीनेहमीच घ्यायचा.


ऑफीसमध्येही सर्वांना माहीतहोत की आम्ही चांगले फ्रेंन्डस आहोत. नंदीनीआदीत्यच्या रोजच नव्याने प्रेमात पडायची...आदीत्यला काही म्हटल का नेहा लगेच मित्राचीबाजु घ्यायची....तर मी रागवले तर माझी बाजुघ्यायची... मग ती चिडली का आम्ही दोघे तिलाहसवायचो.... अस खुप छान दिवस होते ते...कधीही विसरू शकत नाही. सगळ चांगल चाललेल असताना तो दिवसआजही आठवतो... आदीत्य ऑफीसमध्ये आलानाही, मला वाटल काम असल, उशीरा येईल.मी काॅल, मेसेज केले पण रीप्लायच नाही ...मग मी नेहाला सांगितल तिनेही केले पण त्यानेरीप्लायच करत नाही. अस तो कधीच करीत नव्हता.त्यामुळे नंदीनीला पण काही कळेना, तिलाखुप काळजी वाटत होती. सकाळपासुन तिलाअस्वस्थ वाटत होत... मनच नव्हत लागत... ऑफीसच्या नंबरवरून काॅल केले तर कुणीतरीकाॅल घेतला.... नेहाला तिकडून फक्त एवढचकळाल की तो हाॅस्पीटलमध्ये आहे. मला तरकाही समजत नव्हत.... मी रडायला येत होत..पण नेहाने सावरल आणि आम्ही दोघीही त्यांनीसांगितलेल्या हाॅस्पीटलच्या पत्त्यावर पोहोचलो.तिथे गेल्यावर चौकशी करून आम्ही त्या वार्डजवळ पोहोचलो... नेहाला त्याचे आईबाबा दिसले आणि इतर सगळे त्यांचे घरचे रडत होते.तेव्हा आम्हांला कळल की त्याचा सकाळीच अपघात झालाय.... वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे तो जागीच गेला...हे ऐकून तर मी एकदम् सुन्न झाले, हातपायात त्राणच नाही राहीला.अस कस होऊ शकत काल संध्याकाळीच तरनेहा, मी आणि आदीत्य सोबत होतो आणि आजहे अस.... घरचे सगळेच खुप रडत होते. मी तरहे ऐकून आणि बघुन माझी शुध्दच हरपली होती.पण नियतीच्या पुढे कुणाचही काही चालत नाहीहेच खर ! दोघेही लग्न करणार होते, आयुष्यभराचेसोबती होणार होते पण नियतीला मान्यच नसाव कदाचित....खुप मोठा धक्का होता हा अस कस आदीत्य एका दिवसात सोडून जाऊ शकतो यावर तर माझा विश्वासच बसत नव्हता. नेहाने सावरलमला, धीर दिला आणि पुढेही सावरल....


तिलाही खुप वाईट वाटत होत, एक चांगला मित्रगमावला म्हणुन पण माझ्यापुढे ती दाखवत नव्हती.ऑफीसमध्ये तर सर्व फ्रेन्ड्सला खुप वाईट वाटल.त्याची खुप सवय झाली होती. एका दिवसात असहोत्याच नव्हत झाल होत. तो दिवस नंदीनी कधीच विसरू शकत नव्हती. तिचा आदीत्यज्याने तिला जगायला शिकवल... आयुष्यभर साथ द्यायच प्रोमीस केल नि अस अर्ध्यावर तिलाएकटीला सोडून तो निघून गेला... त्याच्या जाण्यानंतर तिला आयुष्यच संपल्यासारख वाटत होत.तिच्या आईलाही वाईट वाटल आईनेही तिला धीर दिला. नेहा तर तिला म्हणायची...नंदीनीतु छान आणि आनंदी राहाव कायम हेच त्यालाहीवाटायच ना.... मग तुला अशी रोज रडताना पाहूनत्याला अजुन वाईट वाटेल ग.... तिने त्यादिवशीनेहाच बोलण मनावर घेतल, तेव्हा तिला कळल.नेहाच खर आहे.... माझ जग म्हणजे आदित्यहोता , खुप प्रेम होत त्याच्यावर... तो आता नाहीपरंतु अस राहीलेल त्याला नव्हत आवडत.त्याच अस अचानक सोडून निघून जाण ,त्याच्याशिवाय जगण्याची कल्पनाच करू शकत नव्हती.पण त्याच्यासाठी तरी छान राहील.... हळूहळू तीस्वतःला सावरत होती. ती त्याला विसरू शकतनव्हती... त्याला जे जे आवडायच ते ते सगळकरायची.... तिला तो नेहमी सोबत आहे असं वाटायच... त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्यासाठी त्याच्याशिवाय जगायला शिकली...    


आज ' व्हेलेंटाइन डे ' ला आदीत्यच्या आठवणींतकिती वेळा गेला तिला समजलच नाही.... मग तीडायरीत काहीतरी लिहत होती... तु आज इथे नाहीस यावर तर माझा विश्वासच नाही... पण तु नेहमी माझ्या मनात राहशीलआणि सोबत असतोस...तुझ्या प्रेमाचा रंग अजुनही बहरत आहे...शेवटच्या क्षणापर्यंत मी फक्त तुझीच आहे.माझ मनापासुन प्रेम होत आणि राहील.मी तुला जशी मी राहीलेली आवडते तशीचराहते पण मला तुझी सोबत हवी होती...तु नाहीस यावर पर माझा विश्वासच बसत नाहीपण मला माहीत आहे, तु नेहमी माझ्या आजुबाजुला आणि सोबत असतोस....माझा प्रत्येक दिवस तुझ्या आठवणींत जातो.तुच सांग... श्वासाविना कुणी जिवंत राहू शकत का ? नाही ना ....तसच झालय माझ .... तुझ्याविना नाही करमतइथे... पण मनाला समजावते... आणि जगत असते.... तु कायम सोबत आहेस आठवणींतआणि कायम राहशील....नंदीनीचा फोनची रिंग वाजली ती लगेच भानावरआली.... आणि फोन घेतला तेव्हा तिला कळल की ऑफीसची वेळ झाली... चला निघायला हव...नाहीतर नेहा मॅडम रागवतील... हा आदीत्य पणअसा आहे ना.... मी याला विसरूच शकत नाही...डोळ्यांत आलेले अश्रु पुसुन ती त्याच्यासाठी हसायला लागली आणि तिने वही बंद केली...त्यावर शेवटी लिहले...   आजही मी फक्त तुझीच आहे ....


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance