आजच्या युगातील प्रेम
आजच्या युगातील प्रेम
आजच्या युगातील प्रेम म्हटलं की त्याला नाय आशा नाय त्याला दिशा. आगळवेगळ म्हटलं तरी चालेल. i love you हा इंग्रजी शब्द आहे मी आणि तू मध्ये प्रेमाचा पार चुरा झाला आहे . प्रेम दाबून गेलं आहे . ह्या आजच्या युगातील रोमँटिक कथा आपण लिहिणार आहोत.चला तर मग आपण अशीच एक रोमँटिक कथा लिहूया.
जय हा आई बाबांचा एकुलता एक लाडका मुलगा . लहान पणापासून त्याचे सर्व लाड पुरवले. जय कॉलेज मध्ये जातो . कॉलेज चा पहिला दिवस असतो . खूप खुश असतो . नवीन मित्र नवीन मैत्रिणी भेटणार खूप मज्जा करणार त्याच्या डोक्यात असतं.कॉलेजच्या पहिल्या दिवशी काय. येवढी कोणासोबत ओळख होत नाही.हळूहळू दिवस जातात तशी ओळख होत जाते.
त्यांच्या २० जणांचा समूह तयार होतो त्या समूहात एका मुलीवर त्याच प्रेम होत. तीच नाव आशा असतं. जय तिच्यावर प्रेम करत असतो हे फक्त त्यालाच माहित असतं आशाला सांगायची त्याची हिम्मत होत नसे. मैत्री तुटेल ह्या भीतीने तो त्याच प्रेम मनातच दाबून ठेवतो.त्याच वागणं बोलणं सर्व बदललेल असतं हे जय च्या आई बाबांच्या लक्षात येत. ते त्याला खूप खोदून खोदून विचारात पण तो आई बाबांना सांगत नाही . थोड्या दिवसांनी त्याच्या मित्रांना पण त्याच्यावर संशय येतो याच वागणं बोलणं खूप कमी झालं आहे . त्याची नजर फक्त आशा जवळ असते. त्याचे मित्र त्याला विचारतात तू आशा वर प्रेम करतोस काय?तो मानेने हो बोलतो. पण आशाला सांगणार तरी कस ? सांगितलं आणि आशाला राग आला आणि आपली मैत्री तुटली तर? असे अनेक विचार त्याच्या मनात घोळत असतात.
१४ फेब्रुवारी येतो प्रेमाचा दिवस. जय ला त्या दिवशी रहायला होत नाही तो हिम्मत करतो की आशाला प्रेमाची मागणी घालायची जे होईल ते होईल. जय आशाला सांगतो मला तुझ्या सोबत थोड बोलायचं आहे तुला वेळ आहे का? आशा हो बोलली. ती दोघं कॉफी प्यायला जातात. कॉफी पीत असताना जय आशाला मनातील गोष्ट सांगून टाकतो की मी तुझ्यावर प्रेम करतो आशा कसलाही विचार न करता लगेच जयला हो बोलते त्याचं प्रेम दिवसेंदिवस वाढत जात.
जय आणि आशा घरातून कॉलेज मध्ये जातो अस सांगायचे पण कॉलेज मध्ये जायचे नाही ते दोघं समुद्र किनारी , हॉटेल ला जायचे आणि कॉलेज सुटायच्या वेळेला घरी यायचे. घरी गेले की घरी आई बाबांना सांगायचे की माझ्या मित्राचा मैत्रिणीचा वाढदिवस आहे मला जावं लागेल ती दोघं खोटं कारण सांगून डेटवर जायचे. अस रोज चालू असायचं .त्या दोघांना प्रेम म्हणजे डेटवर जाणे , हॉटेल मध्ये जेवायला जाणे, समुद्र किनारी फिरायला जाणे म्हणजे प्रेम वाटायचं. पण प्रेमात पैसे उधळणे म्हणजे प्रेम नसतं . प्रेम हे एक पवित्र बंधन आहे ते कधीच पैशाने विकत घेता येत नाही .
प्रेमात कधीच स्वार्थ नसावा निःस्वार्थ भावनेने प्रेम करायचं असतं . आजच्या युवा पिढीला प्रेम म्हणजे एक पैसा उधळणारा खेळ झालंय. डेटवर गेलं म्हणजे समोरची व्यक्ती आपली होते हा भ्रम झालंय . प्रेम हे मनातून हृदयातून केलं जातं. प्रेमाला नाय आशा असते नाय दिशा प्रेम, प्रेम असत फक्त प्रेम.

