स्टोरीमिरर व हिरकणी साहित्य से
स्टोरीमिरर व हिरकणी साहित्य से
जागतिक महिला दिना निमित्त स्टोरीमिरर व हिरकणी साहित्य समूह यांच्या संयुक्त विद्यमाने हिरकणी कथा,कविता व चारोळी लेखन उपक्रम. प्रसिद्ध कवयित्री व समाजसेविका काशीकन्या वनश्रीताई पाटील यांच्या मार्गदर्शना नुसार संपूर्ण महाराष्ट्रभर हा उपक्रम राबवण्यात येत आहे .महाराष्ट्रासह देशातील महिलांचे विविध क्षेत्रातील स्थान, विविध क्षेत्रातील महिलांची उल्लेखनीय कामगिरी त्याच बरोबर विविध क्षेत्रात महिलांवर होणारे अत्याचार ,अन्याय या सर्व विषयाला अनुसरून महिला दिना निमित्त फक्त महिलांसाठी राष्टीय स्तरावरील विशेष उपक्रम.
प्राधान्य नोकरीला की घराला ? हा प्रश्न एका महिलेसाठी कठीण नाही आहे . कारण एक स्त्रि घर सांभाळून नोकरी करते ती पण व्यवस्थित रित्या. घरातील सर्व काम आटपून आपलं कामावरच पण काम व्यवस्थित करत आहे. घरात ती एक आई आहे ती मुलांची काळजी घेते. योग्य मार्ग दाखवते आणि उच्च शिक्षण देऊन मोठं करते.मुलांना शिस्तबद्ध ठेवते. त्यांना त्यांची कर्तव्य काय ती व्यवस्थित रित्या समजाऊन सांगते. तसेच घरचे सासू सासरे यांचा मान ठेऊन ती घर सांभाळत असते.स्वतः एक घास कमी खाते पण मुलांना आणि सासू सासऱ्याना पोट भर जेवू घालते . घरात ती एक अन्नपूर्णा असते . आणि नोकरी करताना ती एक नारीशक्ती असते . गडबडीत घरातून कामाला जाताना तिला स्वतः जवळ लक्ष द्यायला वेळ नसतो. तरी पण ती घर सांभाळून नोकरीही करते. सावित्रीबाई फुले यांनी शाळा मुलींसाठी सुरू केल्या. आज मुलगी शाळा शिकुन उच्च पदावर आहे आणि घर पण व्यवस्थित चालवत आहे.
सांगायचं म्हटलं तर आपल्या देशातील पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या पण कर्तृत्ववान स्त्री . त्यांनी घर सांभाळून संपूर्ण देश सांभाळला. कल्पना चावला पहिल्या पायलट महिला होत्या त्यांनी आकाशी झेप घेत स्वतःच आणि देशाचं नाव उंच केलं. झाशीची राणी , जिजाऊ माता , हिरकणी, यांनी घर सांभाळून आपल्या देशाला एक संदेश दिला की स्त्रि पुरुषांपेक्षा कमी नाc आहे . उलट पुरुषांपेक्षा जास्त आपलं कर्तव्य पार पाडू शकते . तिच्यात खूप हिम्मत आहे .ती एक सबला आहे . आजची स्त्रि ही नोकरीला आणि घराला प्राधान्य देते आणि धैर्य , शौर्य , जिद्दीने आपले कर्तव्य पार पाडत आहे .
सावित्री फुलेंचे विचार आठवून पुढे चालत चालली आहे आजची स्त्रि. शाळा जेव्हा सावित्री बाई यांनी सुरू केली तेव्हा त्यांना खूप संकटाना सामोरे जावे लागले तरी त्यांनी हार नाय मानली आणि आपण तर एकोणिसाव्या शतकातील आहोत . आपण का हार मानावी . जिद्दीने पुढे जायचं . घर सांभाळून नोकरीही करायची असा दृढ निश्चयाने आपली कर्तव्य पार पाडावी. नारीशक्ती चे नवीन रूप जगा समोर घेऊन यायचं. फक्त चुल आणि मुलं नाय तर घर आणि नोकरी पण करू शकते हे दाखुन द्यायचं. स्त्रि एक देवीच रूप आहे ती कोणताही कार्य व्यवस्थित आणि सुरळीत हाताळू शकते . अशाप्रकारे आजची स्त्रि ही घर सांभाळून नोकरी सांभाळते आहे आणि आपली कर्तव्य व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी धडपड करत आहे.आशा ह्या आजच्या नारीला सलाम .
