मुलगी - काळाची गरज
मुलगी - काळाची गरज
मुलगी काळाची गरज/ स्त्रिजन्माचे स्वागत , ह्या कथेच्या शिर्षकातच सर्व लपलेलं आहे . मुलगी काळाची गरज आहे . मुलगी जन्माला द्या . तीच स्वागत करा . मुलगीच योग्य संगोपन करा . स्त्रिभून हत्या करू नका तीच स्वागत करा अशी जनजागृती करावी. मुलगी काळाची गरज आहे . तिला मुला पेक्षा कमी लेखू नका . तिला मुला समान समजा.
दुर्गा माता, कालिमाता, महालक्ष्मी माता, एकवीरा आई, जीवदानी, नऊ रात्रीच्या नऊ माता आपण नवस बोलतो देवी माते मला मुलगा होऊदे मला मुलगी नको. मला मुलगा झाला तर मी तुला पेढे देईन ,नारळ देईन , अनवाणी चालत येईन, उपवास पकडेण अरे पण ज्या देवी माते जवळ तुम्ही नवस बोलता जिला साखड घालता ती पण एक स्त्रिशक्तीच आहे हे का विसरता.आज पर्यंत बऱ्याच लोकांनी स्त्रियांचं आयुष बदलण्यासाठी हातभार लावला आहे. ती पुढे जावी म्हणून खूप प्रयत्न केले आहेत . पण पती आपल्या बायकोला किती हातभार लावतो ? एक मुलगा आपली आई पुढे जाण्यासाठी किती प्रोत्साहित करतो? तुम्ही एका स्त्रिला किती रूपांमध्ये मानता? हे ध्यानात घ्यायला हवे. तसेच एक खुनी म्हणून एका स्त्रीला किती खालीपण दाखवता हे पाहायला हवे. मुलगी पोटात आहे हे समजल की तिची पोटातच हत्या करता आणि हे का करता ? हे चुकीचं आहे की बरोबर पाहिलं आपण समजायला पाहिजे . एका स्त्रीवर बलात्कार करून तिला नदी नाल्यात फेकून देता. तिचा खून करून तिला जाळून देता नाही तर तिला अशाच नग्न अवस्थेत टाकून जाता हे किती योग्य आहे ते पाहायला हवे . एक नराधम म्हणून किती घाणेरडं काम करता हे घ्यानात यायला हवे. एक भाऊ आपल्या बहिणी सोबत किती आणि कशा प्रकारे उभा राहतो . बहिणीला संकटात कशाप्रकारे मदत करतो बहिणीसाठी सोबती कशा प्रकारे असतो हे समजून घ्यायला हवे
जरी स्त्रिया ह्या आत्ताच्या काळात कलियुगात जरी मोठमोठी पदवी घेऊन उच्च पदावर बसली तरी तिला खूपच तडजोडी कराव्या लागतात . जर एखाद्या स्त्रीला कुटुंबातून मानसिक ,शारीरिक त्रास होत असेल तर तिने शांत न बसता , छळ सहन न करता संघर्ष करावा.स्वतः पण कमी नाही आहोत आपण नारी शक्ती आहोत हे तिने ध्यानात घेतले पाहिजे . आणि मागे वळू नये. स्वतःला कमजोर समजू नये . मी त्रास सहन करणार नाही हे मनात घट्ट बांधून ठेवावे.
एक गोष्ट सांगायची म्हणजे आणि ते सांगायला वाईटच वाटते स्त्रीने कधीच आपल्या पोटातल्या बाळाचा खून करू नये. कितीही संकट आली तरी त्या बाळाला जन्म द्यावा. कायकाय जणांच्या कुटुंबात मुलगीच सासू सासरे नवरा अत्ता मुल नको तू पडून टाक मुल अस करून त्रास देतात . पण त्यांचं बोलणं ऐकणं चुकीचं आहे . पोटातल्या बाळाची काय चुकी आहे ? त्या तर जिवाला माहित पण नसतं आपण पोटात असताना आणि बाहेरची दुनिया बघायच्या अगोदरच मरण पावणार ते. अशा आईनी आपल्या पोटतल्या बाळाला जन्म देऊन चांगले संस्कार द्यावे. आज मुलीचं आधार आहेत. आईने आपल्या मुलीला सूर्य बनवून छत्रपती शिवाजी महाराज यांचे बोध आपल्या तानुल्याला द्यावे.
प्रत्येक आईने एक तरी मुलगी जन्माला घालावी. तिला पिंजऱ्यात बंद न करता उडायला शिकवावे.स्वच्छंदी आकाश गाठायला लावावे. बलात्काराचा नाश करावा.घरातून मुलीला जिजाऊ बनवा. पण मॉडेल बनवू नका. कारण ही दुनिया मुलीला स्त्रीशक्ती नाही तर माल समजायला लागली आहे . मुलीला समाजात कोणी नजर वर कोणी पाहणार नाही असं बनवा. तिला बळ द्या. तिच्या सोबत उभे रहा. आज मुलगीच तुमची मान वर करून चालायला भाग पाडेल . मुलगी शिवाजी महाराजांची तलवार आहे . ती शक्ती आहे . म्हणून मुलगी काळाची गरज आहे तीचे स्वागत करा.
"मुलीला जन्म द्या |
मुलीला वाढवा |
मुलीच्या जन्माचे स्वागत करा|
मुलगी वाचवा ||"
