STORYMIRROR

Rupali Pawar

Others

3  

Rupali Pawar

Others

स्त्री शक्ती

स्त्री शक्ती

5 mins
455

      आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ साली स्वतंत्र झाला. या स्वातंत्र्य पूर्व काळातील स्त्रिया खूप कर्तुत्व वान होत्या. भारतीय समाजा मध्ये स्त्रियांचे दुय्यम स्थान असल्याचे जाणवते.अनेक रूढी , परंपरांमुळे स्त्रियांवर अन्याय , सामाजिक विभक्तिकरण झाल्याचे दिसते . स्त्रियांना सार्वजनिक जीवनातील सहभाग नाकारण्यात आला. भरतात स्त्रियांची भूमिका न्याय अधिकार यावर चळवळी व संघटना उभ्या करण्यात आल्या.सतीबांधी , विधवा पुनर्विवाह कायदेशीर मान्यता, स्त्रीभुन हत्या प्रतिबंध,आंतर जमातिय विवाहास मान्यता , संमती वयामध्ये आहे यांचा समावेश होतो.स्त्रियांचा मतदाराचा हक्क, बालविवाह प्रतिबंधक कायदा,मर्यादित प्रमाणात मालमत्तेचा हक्क यांसारखे महत्त्वाचे बदल करण्यात आले.


      महत्त्वाचे बदल करण्याचे कार्य स्वातंत्र्य पूर्व काळातील कर्तृत्ववान स्त्रियांनी केला आहे.सावित्रीबाई फुले,झाशीची राणी लक्ष्मीबाई,हिरकणी,जिजाऊ यांनी स्त्रीशक्ती किती हिम्मत वान आहे हे त्यांनी जाणून दिले.चला तर मग आपण ह्या कर्तृत्ववान स्त्रीशक्ती विषयी माहिती करून त्यांच्या आठवणी ताज्या करूया .ह्या कर्तृत्ववान स्त्रियांचा कधी विसर पडता नये . अशा ह्या स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्तृत्ववान स्त्रियांविषयी माहिती घेऊया.


     सावित्री बाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिकाच नव्हे तर उत्तम कवियित्री, अध्यापिका, समजासेविका आणि पहिली विद्याग्रहन करणारी महिला देखील होत्या.या व्यतिरिक्त त्यांना महिलांच्या मुक्तिदाता ही म्हटलं जात.त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य महिलांना शिक्षित करण्यात गेला.महिलांना त्यांचा हक्क मिळवण्यासाठी खूप खटपट केली.मुलींना शिक्षणाचा हक्क देण्यासाठी त्यांना शिक्षित करण्यासाठी त्यांना अनेक संघर्ष करावे लागले . अनेक संघर्षाचा सामोरे जावे लागले.त्यांनी हार न मानता ध्येयाने व आत्मविश्वासाने संघर्षाला सामोरे गेल्या आणि यशस्वी झाल्या.त्यांनी आपली पहिली शाळा जिला आपलं शिक्षणाचं माहेर घर बोलतो पुण्यात सुरू केली.नंतर काही दिवसांनी मुलींची शाळेत संख्या वाढू लागली . लोकांनी सावित्री बाई फुलेंवर शेण , दगड ,कचरा फेकण्यात आला . त्यांना लोकांनी शिवीगाळ सुद्धा दिली . तरी पण त्यांनी हार मानली नाही .त्या आपल्या निश्चय पासून डगमगल्या नाहीत . आत्मविश्वासाने प्रसंगाला सामोरे गेल्या . आणि मुलींसाठी एक नवे शिक्षणाचा पाया रचला . अशा ह्या नारीशक्ती स्त्रीशक्ती देवी विषयी खूपच अभिमान आहे त्यांनी आपल्या मनात स्त्री शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली .


       गंगाधर नेवाळकर यांची कन्या म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मबाई . ह्या एकोणिसाव्या शतकातील झाशीच्या राणी होत्या. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील ह्या एक अग्रणी सेनानी होत्या. राणी लक्ष्मीबाई यांच्या धाडसी कार्याने फक्त इतिहासच नाही तर सर्व स्त्रियांच्या मनात एक धाडसी ऊर्जा निर्माण केली होती. महाराणी लक्ष्मीबाई यांनी देशाच्या स्वातंतत्र्यासाठी लढा दिला. राज्याच्या स्वातंत्र्या साठी राणी लक्ष्मीबाई ब्रिटिश राज्यविरुद्ध लढा देण्याचे धाडस केले. नंतर त्यांना वीरगती प्राप्त झाली. राणी लक्षमीबाईंनी त्याग आणि धैर्या ने केलेल्या वृत्तीतून केवळ भारत देशाचं नाही तर संपूर्ण जगातील महिलांचे नाव गर्वाने उच्च केले. त्यांचे जीवन अमर देश प्रेम आणि बलिदानाची अनोखी गाथा आहे . त्यांनी महिलांना कसे धाडसी बनून वार करायचा शिकवलं . कोणताही प्रसंग आला तरी डगमगायच नाही हे त्यांनी शिकवलं अशा ह्या नारिला कोटी कोटी प्रणाम.


      हिरकणी ह्या धनगर कुटुंबातल्या होत्या.त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह गुरांच्या दुधावर चालायचे.दूध विकून जे काही पैसे भेटतील त्या पैशातून ते त्यांचे घर चालवत असतं. गडावर दूध नेण्याचे काम घरातील स्त्री हिरकणी करायची . हिरकणी ह्या एक तानुल्याच्या आई होत्या .तरीही त्या गडावर दूध विकण्या साठी जायच्या. जेव्हा त्या दूध विकायला गेल्या तेव्हा संध्याकाळ झाली होती. गडाचे दरवाजे बंद झाले होते. रायगडाचे दरवाजे बंद झाले की फक्त वारा आणि पाऊसच गडावर पोचायचा . दरवाजावर जाऊन हिरकणी शिपायांना विनवणी करायला लागली . हात जोडून ती रडक्या आवाजात विनवणी करत होती की मला घरी जायच आहे कृपया दरवाजा खोला पण शिपायांनी तीची विनवणी ऐकली नाही. तिला घरी जाणं गरजेचं होत . तिचा जीव मागे पुढे होत होता . तिचा लक्ष फक्त बाळा जवळ होता. तिला काहीही सुचत नाय होत. बाळ काय करत असेल याच्याकडेच तीच लक्ष होत. त्याला भूक लागली असेल . तो दुधासाठी रडत असेल असच तिच्या मनात येत होत .कारण ती एक आई होती . आईची माया आभाळा पेक्षा पण मोठी असते. तिच्या डोळ्या समोर अत्ता फक्त बाळाचा चेहरा दिसत होता. तिला कुटच्याही परिस्तीत घरी जायचं होत.ती एकटीच गडावर फिरू लागली. घरी जाण्यासाठी रस्ता शोधू लागली . ४४००फूट उंचीवरून माता खाली उतरली . रात्रीची वेळ होती . तरीही त्या घाबरल्या नाही. डगमगल्या नाही. रातकिड्यांचा आवाज. त्यातच हिंस्त्र प्राणी त्यांचा विचित्र आवाज . पूर्ण अंधार होता. त्यातूनच ही आई घरी जाण्यासाठी निघाली . तिला काढीचाही भय वाटत नाय होता . नाय पशुंचा नाही सरपटणाऱ्या प्राण्यांचा कारण तिचा लक्ष फक्त बाळा जवळ होता. ती अत्ता सामान्य स्त्री नाय होती ती अत्ता वात्सल्याने भरलेली फक्त माता होती.तिला फक्त तिच भुकेने व्याकूळ झालेलं बाळ दिसत होत. ज्या गडावरून जान येणं कोणालाच शक्य नव्हतं ते ह्या मातेने शक्य करून दाखवलं. तिच्या आंगवर खूप जखमा झाल्या होत्या. काट्यानी तिच्या पायातून आंगतून भळाभळा रक्त वाहत होत. ती घरी येताच पाहिलं आपल्या बाळाला घेतलं . बाळाला घेताच तिच्या जखमांचा तिला विसर पडला होता . कारण एक आई ही कोणताही रूप धारण करून आपल्या मुलांना वाचवू शकते अशा ह्या नारीशक्ती ने इतिहास घडवला .


      जिजाऊ , जिजामाता, जिजाई , अशा अनेक नावांनी ह्या मातेला ओळखलं जातं . ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई . धाडसी , हिंमतवाल्या , . जिजाऊंनी सर्व नात्यानं बाजूला सारून कर्तव्य हाच आपला पहिला धर्म अशा समजत असतं. त्यांनी कर्तव्य पार पाडण्यासाठी माहेरची माणसं पण तोडली होती. त्यांना पहिला मुलगा संभाजी झाला. त्यांनतर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराज यांची सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली. पुण्याची जहागिरी राजमाता स्वतः सांभाळायची. छत्रपती शिवाजी महाराजांना कसे घडवायचे हे ज्ञान त्यांना होतेच. रामायण , महाभारत ,कथा जिजाऊ राजेंना सांगत . योद्धाचे माहात्म्य व त्यांचे पराक्रम राजमाता राजेंना समजावून सांगत. नवनवीन संकल्प, राजकारण,डावपेच,सहकार या सर्व गोष्टी राजमाता हाताळत असतं. राज्य करीत असताना सामान्य माणूस, दीन दुबळे यांचाआधार बनून उभ राहणे , त्यांचा आधार फक्त राजाचं असतो हे राजेंना सांगत. धर्म हाच वैयक्तिक प्रश्न असतात हे बाळकडू राजांना दिलं. जिजाऊ माता ह्या छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली गुरू होत्या . अशा ह्या जिजाऊ मातेला शतशः प्रणाम . 


     अशा प्रकारे आपल्या भारत देशात स्वातंत्र्या पूर्व कर्तृत्ववान स्त्रियांनी एक वेगळाच इतिहास घडवला . आपल्या शक्तीने धैर्याने रक्षण करून महिलांना वेगळा मार्ग दाखवला आहे .


Rate this content
Log in