स्टोरीमिरर व हिरकणी साहित्य - आजची स्त्री कशी असावी.
स्टोरीमिरर व हिरकणी साहित्य - आजची स्त्री कशी असावी.
स्टोरीमिरर व हिरकणी साहित्य सेवाभावी संस्था आयोजित....जागतिक महिला दिना निमित्त स्टोरीमिरर व हिरकणी साहित्य समूह यांच्या संयुक्त विद्यमाने हिरकणी कथा,कविता व चारोळी लेखन उपक्रम.
प्रसिद्ध कवयित्री व समाजसेविका काशीकन्या वनश्रीताई पाटील यांच्या मार्गदर्शना नुसार संपूर्ण महाराष्ट्रभर हा उपक्रम राबवण्यात येत आहे . महाराष्ट्रासह देशातील महिलांचे विविध क्षेत्रातील स्थान, विविध क्षेत्रातील महिलांची उल्लेखनीय कामगिरी त्याच बरोबर विविध क्षेत्रात महिलांवर होणारे अत्याचार ,अन्याय या सर्व विषयाला अनुसरून महिला दिना निमित्त फक्त महिलांसाठी राष्टीय स्तरावरील विशेष उपक्रम.
आजची स्त्री कशी असावी.
स्त्रीशक्ती किंवा नारीशक्ती.
आजची स्त्री ही अबला राहिलेली नाही . ती आत्ता सबला झाली आहे . स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला ती खंबीर आहे . लहान पणापासून मुलींना उच्च शिक्षण द्यायचा निर्णय त्यांच्या आई वडिलांचा असतो. मुलगी मोठी होऊन उच्च पदावर जावी मोठ मोठ्या शहरात परदेशी जाऊन मोठी व्हावी असतं आई वडिलांचा विचार असतो .कारण मुलगा आणि मुलगी समान आहेत.
आजचा विषय आहे मुलगी कशी असावी ? मुलगी पक्षी असावी. उंच आकाशी झेप घेणारी असावी . स्वच्छंदी जीवन तीचे जगणारी असावी. कुटच्याही संकटाला सामोरे जाण्याचे धाडस तिच्यात असावे. कधीही अशी वेळ आली तर कमजोर अस वाटायला लागलं तर जिजाऊ आईचे विचार मनात आनावे. सावित्रीबाई फुले यांना देखील शाळा सुरू करताना खूप संघर्ष करावा लागला . खूप कष्ट घ्यावे लागले तरी त्या डगमगल्या नाहीत. धेर्याने शाळा सुरू केल्याचं. सांगायचं तात्पर्य असं की महिलांनी धीर सोडू नये.
आजची स्त्री ही नारीशक्ती झाली पाहिजे.मुलगी जन्माला द्या.
"मुलगी शिकली ,प्रगती झाली".
मुलीला मोठं होऊ द्या . ती घरातच राहून चूल आणि मुल सांभाळणे हेच काम न करता बाहेर जाऊन नोकरी मिळवावी. आजची नारी ही कमजोर नाही आहे ती स्त्रीशक्ती आहे ती माता ,देवी च रूप आहे. अजूनही मुलींना शिक्षण घ्यायला परवानगी देत नाहीत. जास्त शिकून काय करायचं आहे ? लग्ना नंतर किती दिवस कामाला जाणार आहेस? तिकडे जाऊन पण घरातच रहायचं आहे . फक्त घरातली कामं येणं जरुरी आहे .अशी चुकीची समज काहींच्या डोक्यात असतात. अजूनही खेड्यापाड्यात वाहनाची आणि शाळेची उपलब्धता नाही आहे . काही मुली शाळा शिकू नाही शकत . तरी पण खेड्यातल्या स्त्रियांनी स्वतःला कमी समजू नये. ती मोल मजुरी करताना पुरुषां सोबत काम करते आहे . पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरतानाही दिसते आहे. मोठं मोठ्या पदावर पुरुषांपेक्षा अधिक वेतन घेत आहे . आजची स्त्री ही स्त्रीशक्ती आहे .
आजच्या स्त्रीने खूप प्रगती केली आहे . ती मागे हटणारी नाही आहे. असाच तीने मनाचा निश्चय धरला पाहिजे.
