कर्तृत्ववान स्त्रिया
कर्तृत्ववान स्त्रिया
1 min
192
आधुनिक काळातील स्त्रीने
ओळखली आपली शक्ती,
मी अबला नाही सबला आहे
बनली ती नारीशक्ती.
जन्म देऊन मुलीला
दिले तिच्यावर संस्कार,
स्वतःच्या पायावर उभे राहून
बनली आई मुलीचा आधार.
उच्च शिक्षण घेतलं मुलींनी
घेतल्या मोठ्या पदव्या,
शहरात परदेशी जाऊन
पदवीधर झाल्या स्त्रिया.
सखी सहेली बनली स्त्री
पती सोबत वाटते दुःख,
त्याच्या खांदाला खांदा देऊन
शोधू लागली सुख.
प्रत्येक कामात हातभार लाऊन
वाढत चालला आत्मविश्वास,
उभं राहून स्वतःच्या पायावर
ध्येय गाठणे हाच ध्यास
