कर्तृत्ववान स्त्रिया
कर्तृत्ववान स्त्रिया
आधुनिक काळातील स्त्रिया खूप कर्तृत्ववान आहेत. त्या स्वतः आपल्या पायावर उभ्या आहेत . जिद्दी आणि धैर्य शौर्य आहे त्यांच्या अंगात . स्त्री म्हटलं की ते रूप त्यांचं डोळ्यासमोर येत , जी नारीशक्ती , माता , ममता , प्रेम आहे . आत्ताच्या स्त्री ला अबला समजू नका ती खूप पुढे जाऊन सबला झाली आहे. स्वतःच कर्तव्य काय असतं हे त्यांनी निरखून घेऊन जिद्दीने पुढे गेल्या आहेत.
आजच्या आधुनिक काळात स्त्री ने स्वतःची भूमिका ओळखून पुढे गेली आहे . आपल्यात पण एक जिद्द आहे शक्ती आहे हे तीने ओळखले आहे
ती आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी लढू शकते . तू स्वतः लढण्यात सक्त आहे . स्वतःच एक धाडसी शक्ती निर्माण केली आहे
स्त्रीची हत्या होत होत्या हे तर आपल्या कानावर पडलच असणार . पण हि प्रथा स्त्रीनेच बंद केली . आणि नरीला एक दिशा दिली . आपल्या मुलीला जन्म द्यावा आणि तिला मोठं करून उच्च शिक्षण देऊन तीला तिच्या पायावर उभी कारण हे आजच्या स्त्री ने कार्य केलं आहे. अशी आई आपल्याला आपल्या देशात आपल्या समोर पाहायला भेटते. असे बरेच कुटुंब आहेत ज्यांना एकच मुलगी आहे किव्हा दोन मुली आहेत पण मुलगा नाही आहे . पण आजची मुलगी स्वतः तिच्या आई बाबांना सांभाळत आहे . मुलगा जेवढा आई बाबांना सांभाळतो त्या पेक्षा दहा पटीने ती आपल्या आई बाबांना सांभाळत आहे.
आपल्या समोर अशी पण काही कुटुंब पाहायला भेटतात ज्यांना मुलगा पण नाही आणि मुलगी पण नाही . अशी लोक आपलं कुटुंब पूर्ण होण्यासाठी अनाथाश्रम मधून मुल घेतात पण मुलगा नसून मुलगी घेतात.त्यांचं चांगल संगोपन करतात. तिला उच्च शिक्षण देतात व शिकून मोठं करतात. कारण त्यांना माहीत असतं आपल्याला मुलगीच सांबाळणार. मुलगीच आपला आधार आहे. हे त्यांच्या ध्यानात असतं .
काही जण तर अस पण बोलतात मुलगी कशाला पाहिजे? मुलगी शिकून काय करणार? शेवटी काय मुलीची जात आहे . तिला फक्त चुल आणि मुलचं सांभाळायच आहे . अशा परंपरांना झुकरून लग्ना अगोदरच मुलींना उच्च शिक्षण देऊन त्यांचे विकास करणे गरजेचे आहे . शिक्षणासाठी मुली मोठ्या मोठ्या शहरात जावून मोठ्या पदव्या घेत आहेत. उच्च नोकरी करून आपली ओळख निर्माण केली आहे . त्यांचा आत्मविश्वास वाढत चालला आहे . त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. त्यांनी आपली ओळख फक्त भारतातच नाही तर विदेशी जाऊन आपलं नाव रोशन केली केलं आहे . आजची आधुनिक काळातील स्त्री ही अन्याय सहन करणारी नाय आहे . ती अन्याय विरुद्ध लढत आहे . लढण्याचे ध्येय्य तिच्या अंगात आहे . ती जोमाने अन्यायाचा विरोध करू शकते, कारण ती अबला नाही आहे सबला आहे .
आधुनिक काळातील स्त्री ही खऱ्या अर्थाने सखी - सहकारी बनली आहे .ती आपल्या पतीसोबत त्याचे दुःख वाटून घेऊन त्याच्या सोबत खंबीर पण उभी आहे .फक्त पाणी म्हणून सुख सुविधांचा लाभ न घेता त्यांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांच्या सोबत उभी आहे . आपल्या पतीला सुख प्राप्त करून देते. त्याला आधार देते. त्याच्या कामात त्याला सहकार्य करते . सुखातच नाही तर त्याला दुःखात सुद्धा उभी असते . त्याच्या सोबत दुःख वाटून घेते . अशी ही हिम्मतवाली नारीशक्ती आहे.
शिक्षण घेऊन घराबाहेर जाऊन काम करायला लागली आहे. योग्य पत्नी सोबत ती योग्य आई देखील आहे . मुलांना सांभाळून योग्य संस्कार देऊन संवेदनशील बनली आहे . मुलांना योग्य मार्ग दाखवला आहे . त्यांचे पालन पोषण करून त्यांना योग्य रस्ता दाखवणारी ती आई आहे . घर सांभाळून मुलांना सांभाळून बाहेर नोकरी करणारी आजची ही आधुनिक काळातील स्त्री खूपच खंबीर आहे . अशा ह्या स्त्रीशक्तीचा खूप अभिमान आहे .
तशी ती मुलगी आणि सून, पत्नी ,आई हे सर्व नाती टिकवत आली आहे . माहेर सांभाळून सासर पण सांभाळते आहे . दोन्ही घर सांभाळणारी ही स्त्रीशक्ती खूप खंबीर आहे .माहेर आणि सासर ह्या दोन्ही घरांची मन जिंकणे त्यांना सांभाळणे अशी ही कर्तव्य स्वतः पूर्ण पार पाडत आहे.
स्त्री ही मनमिळावू नाही आहे . ती कोणासोबत चांगली वागू शकत नाही . दोन स्त्री एकत्र राहू शकत नाही , स्त्री ही स्त्रीची वैरी आहे हे सर्व आधुनिक काळातील स्त्री ने पुसून टाकले आहे .सासू सून एकत्र राहू शकत नाही हे देखील आजच्या आधुनिक स्त्री ने पुसून टाकले आहे .आणि एकमेकांना सहकार्य करण्याचे कार्य करत आहे . स्त्री स्त्रीची वैरी नाही आहे हे तिने सिद्ध केलं आहे . अशा ह्या आपल्या आधुनिक काळातील स्त्रिया खूप कर्तृत्ववान ,स्त्रीशक्ती खूपच खंबीर आहे हे सिद्ध होते .
