Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Vivek Nachane

Action Thriller


3  

Vivek Nachane

Action Thriller


आजच्या काळातील सिंदबादची खरी गोष्ट - भाग १

आजच्या काळातील सिंदबादची खरी गोष्ट - भाग १

3 mins 68 3 mins 68

पंचवीस जून 2001 सालची गोष्ट. रात्रीचे दहा वाजले होते आणि जेवण संपवून वडिलांबरोबर मी अमिताभ बच्चनच्या केबीसी शो बद्दल गप्पा मारत होतो. माझे वडिल श्री विवेक प्रभाकर नाचणे तेव्हा बोटीवर कॅप्टन होते आणि माझ्या दृष्टीने ते अतिशय आरामशीर आयुष्य जगत होते. जेव्हा ते जहाजावर असतात तेव्हा त्यांचा शब्द म्हणजे हुकुम! म्हणून माझ्या दृष्टीने त्यांना काही काम नव्हते! आणि घरी आले की म्हणायचे ... मला विश्रांती पाहिजे। मी सुट्टीवर आलो आहे.


तेव्हा गप्पांच्या ओघात मी त्यांना विचारले की, तुम्ही पहावे तेव्हा अगदी ऐशोआरामाचे जीवन जगताहात आणि उलट मी इथे कॉलेजचे विद्यार्थ्यांचे खडतर आयुष्य घालवत आहे. एवढा अभ्यास असतो की स्वतःला काही वेळच नसतो. माझ्या वडिलांनी क्षण भर डोळे मिटले आणि नंतर हसून म्हणाले, "गबरू जवान! 27 वर्षांपूर्वी मी अरबी समुद्रात प्रचंड मोठ्या लाटांशी झुंज देत जीवासाठी लढत होतो. आज तुला सांगतो की आत्ता जे तू माझ्या ऐशोआरामाचे जीवन समजतोस तिथपर्यंत पोहोचायला मला कोणकोणती दिव्ये पार पाडावी लागली, त्याची आज गोष्ट सांगतो... आणि हा कान टवकारलेल्या हिंदबाद श्रोत्याला सिंदबाद खलाश्यासारखे त्याची गोष्ट सांगू लागले.


त्यावेळी मी 16 वर्षांचा होतो. डेक कॅडेट म्हणून मी सौदी नावाच्या पॅसेंजर आणि कार्गो शिपवर पहिल्यांदाच सफर करत होतो. त्यामुळे जहाजाची पूर्ण रचना, त्याचे बारकावे, ह्यांच्याशी मी अपरीचित होतो. इतर चालक दल, क्रू सदस्य देखील तसे अनोळखी होते.


सौदी जहाजे खते व तत्सम माल घेऊन जॉर्डनच्या अॅक्वाबा बंदरावरुन 1973 साली मध्यम जून महिन्यात कोचीनकडे अरेबियन समुद्रामार्गे प्रवास करु लागली.

बोटीमध्ये प्रवासी असल्यामुळे स्टेवर्ड कारभारी, क्रू मेंबर म्हणून घेतले होते. एकूण चालक दलाची संख्या 97 होती. शिवाय शिपचे मालगोदाम रॉक फॉस्फेट खताने भरगच्च भरले होता. इतके की माल गोदामांची दारे नीट बद होत नव्हती.


लाल समुद्रातला प्रवास आम्ही शांतीपूर्वक केला. रोज मला इतर वरिष्ठ क्रू मेंबरबरोबर माल गोदामांची स्थिती बघायला सांगितले जायचे. शिवाय मला रोज मुख्य अधिकाऱ्यांसोबत सकाळ आणि संध्याकाळ 4 ते 8 नेव्हिगेशन वॉचची ड्यूटी असायची.


25 जून रोजी मी संध्याकाळी 4 वाजता नेव्हिगेशन ब्रिजवर वॉचसाठी गेलो. शिप सोमालियाच्या केप गार्डफुई जो हॉर्न ऑफ आफ्रिकेच्या टोकाला आहे, येथून मार्ग आक्रमित होता. साऊथ वेस्ट मॉन्सूनपासून सुरक्षित असा खाडी अदेन बंदर सोडून बोटीने खुल्या विशाल अरबी समुद्रात शिरकाव / प्रवेश केला. आता किनाऱ्याजवळच्या उथळ जमिनीचे स्थैर्य किंवा संरक्षण तिला नव्हते, उलट सखोल समुद्राच्या आणि पिसाट वाऱ्याच्या हेलकाव्याने बोट अस्थिर होऊन एका बाजूला कलंडू लागली.


खवळलेल्या समुद्राच्या महाभयंकर अशा ऊंच लाटांमुळे आतील खत, जे पावडरसारखे पटकन सहज कलंडते, माल गोदाममध्ये एका बाजूला आधिक कलू लागले आणि बोट त्या बाजूला आणखी झुकू लागली. चीफ ऑफिसरने त्वरित मला कॅप्टनला हाय धोक्याची बत्ती द्यायला पिटाळले. कॅप्टननी ही आणीबाणीची परिस्थिती मुख्य अभियंत्याला कळवावी म्हणून मला त्यांच्याकडे त्वरीत धाडले. मुख्य अभियंत्याने मला रेडिओ ऑफिसरकडे रेडिओ रूममध्ये संकटाची खबर द्यायला व पोर्ट व इतर बोटींना ती खबर प्रसारीत करायला पिटाळले!


म्हणतात ना गाढव मेले ओझ्याने आणि शिंगरू मेले हेलपाट्याने ! तसे त्या वादळात बोट खताच्या ओझ्याने भयंकर हेलकावे खात होती आणी त्या हेलकाव्यात मी शिंगरूसारखे परिस्थितीचे गांभीर्य समजून ज्येष्ठांच्या आदेशाप्रमाणे धावत होतो.


ह्या सगळ्या वेळात शिप एकाच दिशेला खूपच तीव्र झुकत जात होती. त्यामुळे बिनाआधाराने चालणेदेखील कठीण झाले होते. इथपर्यंत डेकवर पूर्ण गोंधळ उडून हलकल्लोळ माजला होता. स्टेवर्ड्स आणी क्रू मेंबर्स जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळत होते.


मी पाहिले कि काही क्रू मेंबर्सनी लाईफ जॅकेट घालून समुद्रात उड्यादेखील मारल्या होत्या! मी भोळा विचार करत होतो की, ह्या खवळलेल्या समुद्रात आणि भीषण वादळात ह्यांना परत बोटीवर खेचून किंवा उचलून आणायचे तरी कसे? म्हणजे अजूनही बोट बुडेल ह्याची कल्पना माझ्या नवशिक्या आकलनात शिरली नव्हती!


कॅप्टनने इतक्यात मला त्याच्या केबिनमधून त्याचे लाइफ जॅकेट आणायला पाठवले आणि मलादेखील लाइफ जॅकेट घालायला सांगितले. मी केबिनमध्ये शिरलो. पण बोटीच्य़ा जबरदस्त हेलकाव्याने केबिनचे दार जोराने बंद झाले! जलद गतीने कलंडून बुडत असलेल्या बोटीच्या कॅप्टनच्या केबिनमध्ये मी एकटाच आत अ‍डकून पडलो होतो ! पण वादळी वाऱ्याच्या घोंघावात माझा मदतीसाठी केलेला आरडाओरडा आणि केविलवाण्या हाका कोणालाच बाहेर ऐकू जात नव्हत्या!


Rate this content
Log in

More marathi story from Vivek Nachane

Similar marathi story from Action