STORYMIRROR

Priyanka Shinde

Inspirational Others

2  

Priyanka Shinde

Inspirational Others

आजची स्त्री कशी असावी..?

आजची स्त्री कशी असावी..?

1 min
138

   स्त्रिया पूर्वीपासूनच अपमानास्पद आयुष्य जगत आल्या आहेत... जुनाट रूढी - परंंपरेमुुळे स्त्रियांवर होणारे अन्याय - अत्याचार, शारीरिक व मानसिक खच्चीकरणामुळे त्यांच्यावर लागलेला "अबला" हा शिक्का... या सगळ्या कुप्रथांंचे मुळापासून उच्चाटन व्हायला हवे.


   आजच्या स्त्रियांनी समाजात व बाहेरच्या जगात वावरताना मानाने जगणं शिकायला हवं. "चूल आणि मूल" या पलीकडे जाऊन स्त्रियांनी स्वतःची ओळख निर्माण करायला हवी, स्वतःचं एक नवं विश्व उभारायला हवं, स्त्रियांनी स्वतःवर होणारे अन्याय - अत्याचार सहन न करता त्यावर प्रतिकार करणं शिकायला हवं. एक माणुस म्हणुन स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा.  


   आजची स्त्री ही पुर्वीसारखं गुलामगिरीत जगत नाहीये कारण आजची स्त्री ही स्वतंत्र आहे. स्वतंत्र असणं म्हणजे नुुुसतचं आपल्याला बाहेर जाता येतयं अर्थात बाहेरच्या जगात वावरता येतयं, किंंवा आपण खुप उच्चभ्रू आहोत अशी आशा बाळगणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. स्वातंत्र्य हे विचारांचे असायला हवे... आजच्या स्त्री ने विचारांची देवाणघेवाण करायला हवी, काळानुसार स्वतःमध्ये बदल घडवायला हवेत. आजच्या स्त्रीने नवनवीन गोष्टींतुन पळ काढण्याएवजी त्या आत्मसात करायला हव्यात. आजच्या स्त्री ने शैैक्षणिक पातळीवर ही स्पर्धा करायला शिकलं पाहिजे.   


  आजचं युग हे वैज्ञानिक युग असल्यामुळे आजच्या स्त्री ने जुने थोतांड मागे सोडून वैैज्ञानिक तत्वज्ञान आत्मसात करून विज्ञानाला पाठबळ द्यायाला हवं जेणेकरून आपला समाज व आपला देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेेल.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational