Bharati Sawant

Tragedy Others

2  

Bharati Sawant

Tragedy Others

आजचा विषय - सामाजिक भान

आजचा विषय - सामाजिक भान

2 mins
819


स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा करणाऱ्यांसाठी


   मध्यमवर्गीय घरातून आजही स्त्री किंवा मुलीने 'सातच्या आत घरात' 'चूल आणि मूल' 'पायीची वहाण पायातच बरी' अशा पुरुषप्रधान संस्कृतीने बनवलेल्या रूढीनुसारच वागावे अशी रीत आहे. घरात वडील, भाऊ, नवरा, सासरे, दीर यांच्या सल्ल्यानुसार जीवनक्रमणिका ठरवावी लागते.


    'आभाळाला हात टेकण्याचे' फक्त स्वप्नच पहावे लागते. आजही घराघरात अशा अबला वाढत आहेत, जगत आहेत. रात्री किती पर्यंत घरात असायलाच हवे, शिक्षणासाठी कोणता मार्ग चोखाळायचा किंवा वडिलांनी पसंत केलेल्या मुलाशीच तिने विवाह करायचा हे आजही तिला ठरवायचे अधिकार नाहीत. 'पुरुषांच्या हातातली कठपुतली' असेच तिचे वर्णन समर्पक ठरेल.   


     मुलाच्या बेफाम वर्तनाला कधीच पायबंद नसतो. त्याला प्रश्न किंवा शंका विचारल्या जात नाहीत. परंतु मुलीला या सगळ्यातून तावून-सुलाखून निघावे लागते. माहेरी आणि सासरीही स्त्री खर्‍या अर्थाने मुक्त नाही हेच या कथेतून लेखकास समाजापुढे मांडायचे आहे. आज कितीतरी क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, पण तिचे बुद्धिमान असणे ही पुरुषांच्या अहंकाराला डिवचल्यासारखे वाटते. बऱ्याच अंशी साक्षरतेमुळे जरी समाजात कायापालट होत आहे पण त्याचे प्रमाण फार कमी आहे. स्वतःच्या आवडीचे क्षेत्र निवडण्याचेही मुलीला स्वातंत्र्य असू नये हे ज्वलंत उदाहरण अनेक कविता नि कथांतून पाहायला, वाचायला मिळते.

     आजही हूंड्याच्या छळासाठी मुली प्राणास मूकतात.सासू सासऱ्यांच्या अत्याचारास बळी पडतात.नवऱ्याच्या मनमानीचे भक्ष्य बनतात.कितीतरी घरात आजही स्त्री कमावती असूनही नवऱ्याच्या तालावर नाचतअसते. मानसिक, 

शारिरीक शोषण सहन करत असते.तिला कोणतेही स्वातंत्र्य नसते. नवऱ्याच्या मर्जीप्रमाणेच वागावे लागते.मग कसे ठरविणार की आजची स्त्री स्वतंत्र झाली आहे?. काहीजणी तरी कमवलेल्या धनाचा उपभोगही घेवू शकत नाहीत.पगाराच्या चेकवर सही करण्यापुरताच तिचा पगाराशी संबंध येतो.


     त्यातुन एकच साध्य होते की आजची स्त्रीदेखील पूर्णतः स्वतंत्र झाली नाही. बंधनांच्या श्रुखल्यांमध्ये आजही जखडली आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy