आज मी उडतेय
आज मी उडतेय
रिना आणि अजिंक्य दोघेही एकमेकांना तीन वर्षापासूनओळखत होते.एका ऑफिसात काम करत होते.त्यांचीचांगली मैत्रीही झाली होती.मैत्रीच रूपांतर कधी प्रेमातझाल त्यांनाही कळल नाही.पण दोघेही खूप समजदारहोते.दोघेही घरच्यांच्या विरोधात जात नव्हते.त्यांनीठरवल होत की काही झाल तरी आपली मैत्री कधीच तुटणार नाही.अजिंक्य एकटाच होता.त्याचे आईबाबात्याच्या आनंदातच आपला आनंद मानत होते. त्याच्याघरच्यांना पण रिना आवडत होती.पण रिनाच्या घरीसांगितल तरी बाबा नकारच देतील.म्हणून ती कधीच विषय काढत नसे.अजिंक्य रिनाचा चांगला मित्र आहे.हे तिच्या घरच्यांना माहीत होत.तो तिच्या घरी अधूनमधून येत असे. एक दिवस रिनाला आॅफीसमधून घरी यायला खुपउशीर झाला.बाबा रिनाची वाट बघत खिडकीत बसलेहोते.अजिंक्य रिनाला सोडायला आला तेव्हा रिनाच्या बाबांनी त्याला पाहील.
बाबांना त्या क्षणी त्याला पाहून काय त्यांच्या मनात आल काय माहीत ? ते आज खूप खुश होते.त्याच दिवशी ते रिनाला म्हटले, रिना अजिंक्यतुझा चांगला मित्र आहे.मग तु त्याचा लग्नासाठी कानाही विचार करत ? तिला काही समजल नाही.तिचातिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता.तिने परत विचारल.बाबा म्हटले हो मी अजिंक्यबद्दल च बोलत आहे.तिला खुप आनंद झाला.बाबा म्हटले मी पाहील आहे त्यालातुला उशीर झाला की सोडवायला येतो,काळजी घेतो.समजदार आहे,स्वभावही मला आवडतो.अजिंक्यसारखामुलगा शोधून सापडणार नाही.म्हणून मी ठरवल तोचतुझ्यासाठी योग्यच आहे.हे ऐकून तिने आनंदाने आईबाबांना मिठी मारली.तिला हे ऐकून काय करू नि कायनको अस झाल होत.तिने अजिंक्यला फोन करून बाबांचा निर्णय कळवला,त्यालाही खुप आनंद झाला.रिनाचा आनंद तर गगनात मावत नव्हता...अगदी तिला आपण आकाशात उडतोय परीसारख....असचकाहीतरी मनाला वाटत होत...अगदी त्या गाण्यासारख
आज मैं उपर, आसमाँ नीचे
आज मैं आगे , जमाना है पीछे...

