आगळे वेगळे
आगळे वेगळे
अहो लक्षात आहे ना येताना ऑफिस मधून थोडी भाजी घ्युन या.....
अरे वाह!केवढे मस्त मार्क मिळाले सुरेशला बोर्डात!.....
वहिनी,तुम्ही पण एकदा ट्राय करा,छान आहे ते नवीन पार्लर....
ए रोहीत,किती वेळा कॉल करायचा?उचलत का नव्हता फोन?.....
इश्श ,काय बोलता,हळू बोला,ऐकू येईल आजूबाजूला....
ए,कधी आपलं लग्नं होईल फार घायी लागलीआहे,आता नाही राहवत तुझ्या हून लांब.....
बाळा,रडू नकोस,मी लवकरच येते बघ,बरोबर २ दिवसांनी....
मॅडम,आज वर्गात जे झाले त्याबद्दल मी खूप दिलगीर आहे,pl माला माफ करा.....
सायली चल आज लेक्चर चुकवून सिनेमा ला जाऊ, सलमान चा चित्रपट बघू....
अगं सासू शी नीट बोल,नवीन आहेस त्या घरात,उगाच वाद नको....
आई पटकन सांग मेदू वडा ची रेसिपी,राहुल चे मित्र येता आहेत आज मॅच बघायला....
मला वाटतं आपण ब्रेक अप करूया,दोघांच्या खूपच वेगळ्या अपेक्षा आहेत ,नाही चालणार आयुष्यभर हे नातं....
अगं किती रडतेस,ठीक आहे , बंनी तुझी गेली खरंय पण तू दुसरी कुत्री घ्युन ये ना....
राज ,I am pregnant,! कसं सांगू घरातल्यांना?....
सुमे,आजी आठवण काढत होती तुझी,कधी येतेस भेटायला?....
काका,येत्या शनिवारी मी निघालो ऑस्ट्रेलिया ला २ वर्ष शिकण्यासाठी,आशीर्वाद द्या....
माला जरा वरच्या अधिकारी बरोबर बोलायचे आहे,आमचा रस्ता नीट करून घ्यायचा आहे....
Dr. अजून किती दिवस ट्रीटमेंट चालेल ही?....
ताई आज नाही जमणार कामावर यायला,बाळाला ताप होता रात्रभर...
पोलिस स्टेशन का?आमच्या घरी दरोडा पडला आहे लवकर या....
काकू लग्नाला सर्वांनी यायचे नक्की.काही कारण नाही चालणार....
केतकी आजोबा गेले ग रात्री झोपेतच.तुला कधी निघता येईल?...
सर तुमची नोकरी पक्की झाली आहे.तुम्हाला लवकरच ऑफर लेटर मिळेल....
बाबा पाकिस्तान विरुद्ध आपण मॅच जिंकलो! मी बेट जिंकलो, आता पैशे द्या...
.....अशे अनेक संवाद चालू राहतात एक छोट्या यंत्रणांवर!
Mobile talks!
