Rare View Mirror
Rare View Mirror
Rear View Mirror
रोहन नी हळूच rear mirror मधे बघितले आणि तेवढ्यात आशा चे ओठावरचे हसू दिसले.ती खाली बघत मांडीतल्या बाळाशी काहीतरी बडबडत होती. आशा चे हसरे तोंड बघून रोहन सुद्धा खुश झाला. "काय ग,सरळ घरी घ्यु गाडी की कुठे फिरायचे आहे अजुनी?"त्याने विचारले,पण आशा तिच्याच तंद्रीत होती.तिला बाळा शिवाय काही वेगळं सुचत नव्हते. बाळ पण आईच्या मांडीत पडून, वारा घेत मस्त मजेत होते.रोहनला एकदम कॉलेज चे दिवस आठवले.तो असेच आशा ला फिरायला घऊन जायचा आणि rear mirror मध्ये तिचे गुलाबी गाल,लिपस्टिक व चेहऱ्यावरील येणाऱ्या केसांच्या लटा बघत गाडी चालवायचा.त्यांचे प्रेम विवाह होऊन ३ वर्ष झाली होती व आता ते एक बाळाचे आई बाबा झाले होते!
रोहन मोठ्या कंपनी मध्ये उच्च पदावर होता त्यामुळे आलिशान घर, नोकर,गाडी म्हणाल ते सर्व होते. आशा मात्र कॉलेज मधे lecturer असल्यामुळे नेहमीच कामात व्यस्त असायची.तिला pregnancy ची बातमी dr नी दिल्यावर,थोडी नाराजी ही झाआली कारण आता तिला काही महिन्यात घरी बसावे लागले असते.तीनी राजीनामा दिला पण घरात तिला कर्मायचे नाही.आता मात्र बाळ आल्यावर तिची झोप भूक सर्व काही विसरली होती.
गाडीने करकश ब्रेक मारला आणि आशा भानावर आली.रोहन नी गाडी घराच्या आवारात लावली व बायको साठी गाडीचे दार उघडुन बाळ आणि आईच्या स्वागताला उभा राहिला.बायको बाळावर अमाप प्रेम होते रोहन चे!
हळू हळू दिवस सरले,महिने , वर्ष ओलांडली आणि बघता बघता नुपूर १८ वर्षाची झाली सुद्धा!आशा थोडी थकायला लागली
होती.कॉलेज मध्ये नोकरी परत सुरू झाली होती पण तबीयत थोडी नाजूक होयला लागली होती.चक्कर येऊन दोन वेळा कॉलेज मध्ये पडली होती.सर्व tests केल्या गेल्या पण काहीच विशेष लक्षात आले नव्हते.रोहन ने आपला धंदा सुरू केला होता व जास्त वेळा घराबाहेर असायचा.
आशाच्या कॉलेज मध्येच नुपूरची admission झाली होती.त्या दिवशी आशा कॉलेज ला गेलीच नव्हती तिला काही काम होते online म्हणून ती घरीच होती.अचानक recess मध्ये नुपूर ला peon सांगायला आला की घरी लवकर बोलावले आहे आई ला बरे नव्हते. नुपर धावतच घरी गेली.आशा चे श्वास जड झाले होते,ती सोफ्यावर पडली होती आणि बाजूच्या कुंठे काकू तिच्या जवळ वारा घालत बसल्या होत्या.लगेच रोहनला फोन लावला तो गावातच होता नशिबाने म्हणून घरी पोचला.
गाडीत कुंठे काका पुढे व नुपूर आणि आशा मागे बसले.आशा ला श्वास घेताना त्रास होत होताच. Hospital ला भर वेगाने रोहन गाडी चालवत होता.मध्येच त्याने rear view mirror मधे बघितले - अगदी आई सारखेच रूप घ्युन आलेली नुपूर आज त्याच मग्नतेनी आईचे डोके मांडीवर घ्यून तिच्याशी बोलत होती.दोघी आपल्याच दुनियेत मग्न होत्या!आईच्या केसांवरून हात फिरवीत ती आईला जगण्याचे बळ देत होती!२० वर्ष पालथी पडली होती पण rear view mirror मधे रोहन नी बघितलेले आई लेकीचे रूप and चेहऱ्यावरचे हावभाव अगदी अविस्मरणीय होते!
Dr नी लगेच tests करून चेक करत इंजेक्शन आणि गोळ्या लिहून दिल्या.सर्व reports नॉर्मल होते.खूप Stress मुळे झाले होते असे म्हणाले. आशाला चांगला आराम आणि खाण्याचे महत्त्व सांगून dr नी डिस्चार्ज दिला.औषधामुळे आशा ला पण बरे वाटत होते.परत घरी जाताना रोहनने आशा व नुपूर चे हासरे चेहरे rear view मधे टिपले आणि त्याच्या चेहऱ्यावरती सुद्धा एक हास्य पसरले!
