आदिमानव विरुद्ध एलियन
आदिमानव विरुद्ध एलियन
राजन सहावीतला मुलगा. त्याला एक उत्क्रांती वर पाठय पुस्तकात एक धडा असतो तो राजन वाचतो आणि एक एलियन वर आधारित पुस्तकही वाचतो. आणि झोपी जातो.
स्वप्नात त्याला आदिमानव दिसतात.ते गुहेत राहतात.अंगावर प्राण्यांच्या कातडीचे कपडे घालतात. शिकार करून खातात. दगडावर दगड घासून आग निर्माण करून भाजून मांस खातात. झाडाची कच्ची फळे खातात.आणि एकमेकांशी खाणाखुणाने बोलतात. असे आयुष्य जगत असतात. तेव्हड्यात त्यांना एक तबकडी आकाशातून त्यांच्या दिशेने येताना दिसते.ते भीतीयुक्त आचार्याने त्याकडे बघतात.लगेच दगडावर दगड घासून आग निर्माण करतात.आणि टेम्भ्याला आग लावून हमला करायला तयार राहतो. तेव्हड्यात तबकडी अचानक वेगाने जमिनीवर येते. व त्यातून एक विचित्र माणूस बाहेर येतो.ते बघून आदिमानव खूपच नवलाने त्याच्या कडे बघतात. तो एलिअन ही त्यांच्याकडे नवलाने बघतो. पण काही वेळानी एकमेकांची खात्री पटते की ते दोघेही हानिकारक नाहीत. आदिमानव एलिअन शी मैत्री करतात. आदिमानव एलिअनला भाजलेली प्राणी खाऊ घालतात. वेगवेगळी फळे खाऊ घालतात. एलिअनही आदिमानवाला तबकडीतून फिरवतात. त्यांना उंच वर आकाशात फिरतांना खूप मजा येते.
तेव्हड्यात राजनला जाग येते. व स्वप्न होते ह्याची खात्री पटते.
स्वाती वक्ते, पुणे