Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Rahul Shinde

Inspirational


4.9  

Rahul Shinde

Inspirational


आध्यात्मिक उत्तरे

आध्यात्मिक उत्तरे

2 mins 1.3K 2 mins 1.3K

'देव कुठे अस्तित्वात आहे का? आत्मे अमर असतात म्हणे, एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश करत असतात. जगाची इतकी लोकसंख्या वाढतच आहे, तर मग नवीन आत्म्यांचा जन्म कसा होतो? एका पुस्तकात आपण वाचलं आहे की आपले आई-वडील आपण निवडतो..असं खरंच असतं? मग आपल्या वडिलांशी तर आपलं कधीच का पटत नाही? ''जीवनाच्या प्रवासात तिला असे प्रश्न पडू लागले.

'आत्मज्ञान' झाल्यानंतर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं तिच्या वाचनात आलं, पण हे आत्मज्ञान मिळवायचं कसं, आणि ते मिळवायला किती वेळ लागू शकतो आणि ते मिळेलंच का, हे सांगता येत नाही. म्हणजे एक जोखीमच आहे ही. जेव्हाजेव्हा अनेक प्रश्न तिच्या शरीरात उतरायचे, तेव्हा ठोस उत्तराच्या अपेक्षेने ती अस्वस्थ व्हायची. जगण्याची कला, मनःशांती शिकण्यासाठी तिने शिबिरं केली, त्यात सांगितल्यानुसार ती साधनाही करायची. परंतु प्रत्यक्ष कुठलीतरी परिस्थिती समोर येऊन ठाकली की तिच्या साधनेत खंड पडायचा. तिला वाटायचं सर्वच बाबतीत परत आपण शून्यात आलो...

***

एकदा खोल दुःखाच्या आवर्तनात असतानाच तिला शरीराच्या आतून काहीतरी जाणवू लागलं. तिला कळेना नक्की काय होतंय, पण काहीतरी अंतर्ज्ञान झाल्यासारखं वाटू लागलं. 'कुठलीही गोष्ट अनुभवण्यासाठी ठाम विश्वास असायला हवा." तिच्यात ही जाणीव निर्माण झाली. जाणीव शरीराचीच, पण शरीराबाहेर नेणारी... आणि जणू तिला वाटले की पटापट उत्तरं मिळत आहेत. 'आपण काम करतो तिथेही आपली काहीच चूक नसताना आपली बाजू पडते. आपल्या वडिलांसोबत आपलं जमत नाही, पण या अशा परिस्थितीची निवड आपणच केलेली असावी. काही काळातील भौतिक जगात आव्हान स्वीकारून अध्यात्मिक जगात प्रगती करण्यासाठी.' विश्वासपूर्वक निर्माण झालेल्या ज्ञानाने तिला शरीर हलके हलके वाटू लागले.' आपल्याला प्रश्न पडायचा, नवीन वाढलेले आत्मे कुठून आले? त्याचं एक उत्तर म्हणजे, कधीकधी एकच आत्मा दोन-तीन आत्म्यांमध्ये विभागला जातो. दुसरं उत्तर म्हणजे पृथ्वीबाहेरही अवकाश आहे तिथून नवीन आत्मे येतात... प्रकाशाची मशाल आपल्या आतच आहे आणि त्याचाच उपयोग आपण आपलं आणि इतरांचं आयुष्य उजळण्यासाठी करायचा आहे.' ध्यानात डोळे मिटल्यानंतर तिला स्वतःच्या आतूनच काही उत्तरं मिळू लागली...


तिला अजून एक समजले, जीवनाच्या प्रवासात असंख्य प्रश्न अजूनही पडतील. त्या प्रश्नांकडे आता हतबल होऊन न बघता अद्भुतपणे बघायचे.


Rate this content
Log in

More marathi story from Rahul Shinde

Similar marathi story from Inspirational