Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Rahul Shinde

Tragedy


2.5  

Rahul Shinde

Tragedy


पहिली रात्र

पहिली रात्र

4 mins 24.8K 4 mins 24.8K


लग्नानंतर त्यांची एकांतातील पहिली रात्र होती.

खोलीचा दरवाजा लॉक करून सुरज तिच्याजवळ आला तेव्हा तिच्या छातीत धडधडायला लागलं...तो तिला हळुवार स्पर्श करू लागला. तिचा हात हातात घेतला तेव्हा तिला विशेष काहीच जाणवले नाही.त्याने तिला मिठीत घेतले, नंतर तो तिच्या केसांतून हात फिरवू लागला, तेव्हाही तिच्या मनात कसल्याच 'भावना' निर्माण झाल्या नाहीत...आपलं प्रेम एकेरी होतंय हे त्याच्या लक्षात आलं आणि तो घाबरला. तिला आपल्या स्पर्शाचा, प्रेमाचा 'काहीच न वाटण्याचा' संदर्भ लावताना त्याला अस्वस्थ वाटू लागले. तो तिच्यापासून चार हात दूर जाऊन उठून बसला.

"मी तुला लग्नाआधीच सांगितलं होतं सगळं, पण तूच ते गंभीरपणे घेतलं नाहीस..तुझ्या स्पर्शाने मला काहीच का होत नाही रे ? निर्जीव झालंय माझं शरीर..निर्जीव.."भीषणपणे खचलेल्या तिच्या या बोलण्याने त्याचे हात थरथरू लागले.

****

'Virtual अँपवर ती सूरजला भेटली आणि खूप आवडली, नंतर ऑनलाईन भेटीचं रूपांतर प्रत्यक्ष भेटीत झालं. भेटी होत राहिल्या. तिच्यावर सुरजचं प्रेम जडलं, पण एकदा भेटीत तिचा भूतकाळ तिने सूरजला प्रामाणिकपणे सांगितला.

"दोन मुलांबरोबर मी रिलेशनशिपमध्ये होते, त्या दोघांसोबत ब्रेकअप झालं. त्याच डिप्रेशनमध्ये ग्रॅड्युएशनच्या फायनल एअरलाच नापास झाले. घरच्या कडक शिस्तीमुळे मी नापास होण्याचं नेमकं कारण त्यांना सांगू शकले नाही. माझ्यासोबतच्या मित्र-मैत्रिणींना नोकऱ्या लागल्या, पण मी भरकटले होते. ब्रेकअप झाल्यानंतर ‘आपलं’ कोणीतरी पाहिजे, असं जास्तच वाटत होतं. दिवसभर घरी बसून असल्यामुळे वडील जास्तच टोकायचे. नापास झालेले वर्ष सोडवत असतानाच वडिलांनी मला इकडे शहरात राहणाऱ्या माझ्या मोठ्या भावाकडे पाठवून दिले. रिकामटेकडी बसून राहण्यापेक्षा काही वेळ इकडे काहीतरी काम करत करत राहिलेले विषय सोडव म्हणाले. माझा होकार, नकार काही विचारला नाही. स्वतःपुरते पैसे कमावण्याइतपत तरी अक्कल येऊ दे म्हणाले."

"एवढं सिरीयस होऊन का सांगतेयस ? कमी पगाराची का असेना, पण लॅब असिस्टंटची नोकरी करून स्वतःच्या पायावर उभी आहेस, आणि तुझी आधीची रिलेशनशिप्स हा तुझा भूतकाळ झाला. मीही होतो एकीसोबत रिलेशनशिपमध्ये, पण आता आठवलं तरी हसू येतं इतकं ते immature होतं.." सुरज सहजपणे म्हणाला.

"पण माझ्या बाबतीत हे इतकंच नाही....इकडे शहरात आल्यावर मी जास्तच भरकटले रे.ऑनलाईन डेटिंग अँपवर आवडलेल्या एकाला प्रत्यक्षात भेटले. पण त्यानेही फसवलं मला, टाईमपास म्हणून हवं तेवढं डेटिंग केलं आणि निघून गेला. नंतर इथेच अँपवर भेटलेला एकजण मला फारसा आवडला नव्हता, पण तो माझ्या खूपच मागं लागला. मी त्याची टाळाटाळ करत होते, पण त्याने माझ्यासमोर एक वेगळाच प्रस्ताव ठेवला. माझ्यासोबत फक्त एकतास बेडवर घालवण्याचे पैसे देतो म्हणाला. विचारांच्या द्वंद्वात सापडलेली मी शेवटी तयार झाले. त्याने माझ्या अवयवांचा उपभोग करून घेतला,अगदी पुरेपूर... त्यानंतरही असंच कधी आकर्षणापायी आणि बहुतेकदा पैशाच्या गरजेमुळे मी खूप जणांना शरीराचा उपभोग करू दिला. नोकरीतल्या तुटक पगारापेक्षा इथे आपल्याला इतका पैसा मिळतोय की आपल्याला घरच्यांच्या पैशावर अवलंबून राहावे लागत नाही, आपण स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो या मोहात मी वाहवत गेले."

तिच्या या सगळ्या अनपेक्षित धक्कादायक बोलण्याने सुरजने यांत्रिकपणे कपाळाला हात लावला, त्याचे डोळे मिटले गेले.

" तुझ्यावर मी मनापासून प्रेम केलं..तू जो काय निर्णय घेशील तो मला मान्य आहे." असं म्हणून तिनं त्याच्या हातावर हात ठेवताना तिलाच आधाराची गरज आहे, हा तिचा स्पर्शच त्याला सांगत होता.

त्या दिवशी तो फारसा काही बोलू शकला नाही, पण दुसऱ्या दिवशी सावरल्यावर त्याने तिला त्याचा निर्णय सांगितला ,"तुझ्या भूतकाळासहित मला तू हवी आहेस. मागचं सगळं विसरू आपण."

********

‘आपण तिचा भूतकाळ स्वीकारला खरा, पण आता तिची अशी शारीरिक अवस्था व्हावी ? तिच्या शरीराला प्रेमाचा स्पर्शच कळत नाही..आमचं दोघांचं प्रेम कसं बहरणार मग ?' पहिल्या रात्रीच बसल्या जागी त्याच्या मनात विचार येत होते.

त्याची ही अवस्था लक्षात येऊन धीराने ती म्हणाली,

"आपलं लग्न झालं असलं तरी अजूनही निर्णय बदलू शकतोस तू. माझं आयुष्य मी स्वतः उध्वस्त केलंय, पुढे माझं मी बघून घेईन.. पण माझ्यामुळे तुझं आयुष्य उध्वस्त करायचं नाही मला."

या बोलण्यानं स्तब्धपणे तो तिच्याकडे बघू लागला.

"परत एकदा विचारतो, तुला मी खरंच आवडतो ? तुझ्या काही वेगळ्या अपेक्षा आहेत का ?" त्याने स्पष्टपणे विचारले.

"काय वेड्यासारखं विचारतोयस ?आवडतोस रे ..पण बघ ना शरीर काही प्रतिसाद देत नाही. त्यात काही भावनाच निर्माण होत नाहीत..मग तुझी एकतर्फी ओढाताण का ?" हतबल होऊन बोलताना ती गळाली.

कितीतरी वेळ तो शांतपणे बसून राहिला. नंतर निर्धारपूर्वक तिच्या अगदी जवळ जाऊन तो म्हणाला, "माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे..आणि बघू ते किती खरं आहे. माझ्या प्रेमानं तुझं हे निर्जीव झालेलं शरीर बदलेल हळूहळू. ते स्पर्शानं मोहरेल. तू काही काळजी करू नकोस, माझ्या प्रेमाने तुझ्यात 'भावना' परत जागृत होतील. .काही काळ जाऊ दे, अगदीच काही नाही झालं तर मग ठरवू नंतर आपण."

त्याच्या या पुन्हा एकदा निर्णयात्मक बोलण्यानं ती एकटक त्याच्या डोळ्यात पाहू लागली. त्यानं तिचा हात हातात घेतला.

त्याच्या आश्वासक स्पर्शाने तिच्या डोळ्यात अश्रू आले होते.


Rate this content
Log in

More marathi story from Rahul Shinde

Similar marathi story from Tragedy