STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Comedy Fantasy

4  

akshata alias shubhada Tirodkar

Comedy Fantasy

आधुनिक रामा

आधुनिक रामा

2 mins
275

राजा कृष्ण देवरायाचे राज्य काळानुसार बदले आहे.. इंटरनेट पण राज्यात पोहचला आता फोन वरच इतर राज्याच्या राजाशी हितगुज गेले जाते. चला तर मग आपण पण ह्या नव्या राज्यची सैर करूया..... 

राज महालात राजा कृष्ण देवराया फोन उचलून बोलून कंटाळलेले. राजांनी आपला मोबाईल ऐरप्लॅन मोड वर टाकला व स्वस्थ बसले. 

"पहिली इतर राजा रीतसर परवानगी घेऊन राज दरबारात भेटायला यायचे, पण आत्ता फक्त फोनवर बोलतात तासन तास हात दुखू लागतो. फोन धरून स्पीकर वरही टाकू शकत नाही खाजगी बोलणी असतात "

तेनाली राजा लगबगीने राजमहालात पोचतो पाहत तर राजा स्वस्थ बसलेला. 

"महाराज आपला फोन का बंद आहे मी तुम्हला एक महत्वाची बातमी पाठवणार होतो "?

"काय सांगू रामा फोन घेऊन घेऊन कंटाळा आलाय वर हात पण दुखू लागले "

"महाराज पण आता सगळेच बदले आहे तुम्ही ब्लूईटूथ का नाही वापरत "

"नको रे बाबा केवढा मोठा तो कानाला त्याच्या भार "

"महाराज काळजी नसावी मी पाहीन काहीतरी" 

"मला माहित आहे रामा तू च माझा खरा सांगाती "

रामा राजमहालातून निघतो तो सरळ इलेक्ट्रॉनिक शोरूम मध्ये आणि एक गंम्मत घेऊन राजमहालात परततो 

"महाराज हे घ्या "

"काय तेनाली हि कसली डब्बी "

"महाराज हि आधुनिक डब्बी आहे आणि कामाची सुद्धा" 

"म्हणजे ?

"महाराज याला एअर बड्स म्हणतात जे तुम्ही कानात घालून तुम्हचे आवडीचे संगीत ऐकू शकता बरोबर कोणाचा फोन आला तर बोलू शकत.. फोन हातात न घेता आणि ह्या दिसायला पण छोट्या आहेत आणि वापरायला हलक्या म्हणजे तुमचे हात हि नाही दुखणार "

"वाह रामा "

"घ्या महाराज फक्त ह्या डबीला चार्ज करा मग कुठे हि घेऊन जा उघडून पहा महाराज "

"राजा कानात फिक्स करतो आणि आपले म्युझिक प्लेअर व करून आवडीचे गाणे लावतो """

"वाह काय आवाज आहे" 

एवढ्यात महाराजांना फोन येतो, रामाच्या सांगण्यानुसार राजा एअर बड्स च्या एका क्लिक वर फोन रेसिइव्ह करतो राजाला एकदम भारी वाटू लागले.

"मानलं रामा तुला, माझ्या टेन्शन वर रामबाण उपाय म्हणजे तू "

"थँक क्यू महाराज "

"थँक क्यू तुला ह्या बद्दल "

"महाराज मी हे गिफ्ट नाही दिलंय तुम्हाला बिल येईल उद्या "

"काय बिल ?

"हो बिल क्रेडिट वर आणलंय" 

"चालतंय रामा येऊ दे बिल "

दोघे पण मोठयाने हसू लागले पूर्वीचा रामा आपली छाप पडायचा पण आता तो आधुनिक झाला होता. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy