आभास
आभास
पिकलेल्या आंब्यांना गळती लागायचे दिवस होते, दुर्दैवाने माणसांनाच गळती लागायला लागली.'रस' घ्यायच्या दिवसात 'लस' घ्यायचे दिवस आले. जितक्या सहजतेने लोकं सॉरी, थँक्स म्हणायचे तितक्या सहजतेने 'भावपूर्ण श्रद्धांजली' म्हणायला लागले आहेत. आयुष्यभर मर-मर करून कमावलेली संपत्ती, गाडी, बंगला, प्लॉट, फ्लॅट, कपडे, इस्तरी, अहंकार, वावर, बांध, पद, खुर्ची, ईर्ष्या सगळं सगळं सोडून जावं लागतं.
लोकं फार फार तर इमोशनल लिहतील, चार-दोन दिवस स्टेटस, डी.पी ठेवतील. पुन्हा पुढचा जाईल तसा डी.पी बदलत राहील. त्यामुळे आहेत तो पर्यंत एकमेकांशी प्रेमानं वागणं, सहकार्य करणं, भेटणं-बोलणं झालं पाहिजे.
फोटो आभास देतो, स्पर्श नाही.
