STORYMIRROR

sant janabai

Classics

2  

sant janabai

Classics

येग येग विठाबाई, माझे पंढरीचे

येग येग विठाबाई, माझे पंढरीचे

1 min
15.6K


येग येग विठाबाई,

माझे पंढरीचे आई ।। धृ ।।


भीमा आणि चंद्रभागा,

तुझे चरणीची गंगा ।। १ ।।


इतुक्यासहित त्वा बा यावे,

माझ्या रंगणी नाचावे ।। २ ।।


माझा रंग तुझे गुणी,

म्हणे नामयाची जनी ।। ३ ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics