STORYMIRROR

SATISH KAMBLE

Tragedy

4  

SATISH KAMBLE

Tragedy

व्यसनमुक्ती

व्यसनमुक्ती

1 min
482

मुले झालीत मोठी

मला सोडायचीय दारू

तुम्हीच सांगा गड्यांनो

आता मी काय करू ?


दारू पिऊन घरी जातो

दार उघडाया पोरगं येतं

त्याला पाहिल्यावर लाजेनं

मुंडकं माझं खाली जातं


विचारांचं थैमान माजतं

घालमेल होते मनात सुरू

तुम्हीच सांगा गड्यांनो

आता मी काय करू ?


टेन्शन आलं की घेतो मी

सिगारेटचा झुरका

वीस तरी सिगारेट पितो

एका दिवसात मी बरं का


खोकून खोकून जीव जातो

लागलो आता मी मरू

तुम्हीच सांगा गड्यांनो

आता मी काय करू ?


दारू सिगारेट तंबाखू

ही व्यसने आहेतच वाईट

पण मी मात्र अडकलोय

या व्यसनांच्या खाईत


क्षीण होतंय शरीर माझं

लागलो जीवनाची बाजी मी हारू

तुम्हीच सांगा गड्यांनो

आता मी काय करू ?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy