STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance

4  

Sakharam Aachrekar

Romance

व्यक्तता

व्यक्तता

1 min
322

मना वेधती का, तिचे हे इशारे

खरे वाटती हे, कसे भास सारे


तिला पाहताना, किती काळ गेला

छुप्या भावनांनो, अता व्यक्त व्हा रे


कितीदा लिहू मी, प्रिये या फुलांनी

किती वाहवू मी, इथे प्रीतवारे


नयनसागरी या, बुडालो असा की

कधी भेटले ना, मनाला किनारे


मला भेटण्या ये, प्रिये सांजवेळी

किती रोज पाहू, नभी तेच तारे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance