वसुंधरा
वसुंधरा
सजली नक्षत्र कटी
नयनी रेखीली उटी
झंकारल्या भावना
सुगंधली अखंड जरा
आसमंत बरसला
सुखावली वसुंधरा..
उमटल्या पाऊल खुणा
फळा आली साधना
उदरात उठल्या कळां
जन्मला थेंब गोजिरा
आसमंत फाटला
सुखावली वसुंधरा..
उदयले स्वप्न साजिरे
वाहू लागल्या नद्या
हर्षल्या जलपऱ्या
आनंदला शुष्क झरा
आसमंत दाटला
सुखावली वसुंधरा..
लागली डुलू
धरली मोत्यांची खडे
भिरभिरती गोफणी
उडवीती पाखरा
आसमंत मोहरला
सुखावली वसुंधरा..
पायधूळ चाटूनी
उठती लाटांचे थवे
कुणाला का नं कळे
वागणे तुझे सागरा
आसमंत गरजला
सुखावली वसुंधरा