STORYMIRROR

Vasant Brahmakar

Inspirational

3  

Vasant Brahmakar

Inspirational

वसंतोत्सव - उत्तरार्धातील स्वप्ने

वसंतोत्सव - उत्तरार्धातील स्वप्ने

1 min
393

आयुष्याच्या उत्तरार्धात अजूनही,स्वप्ने आहेत बाकी !

हसत अन् हसवत,लखलखण्याचा,निश्चय आहे बाकी !!१!!


आयुष्याची,सुंदर सकाळ सरून गेली !

फिकीर नाही मजला संध्याकाळची,लखलखती दुपार अजून आहे बाकी !!२!!


आधाराविना जगण्याची,मजाच आहे वेगळी ।

संगीत-योगा,हसणं-हसवण्यासाठी,मनात ऊर्जा आहे अजून बाकी !!३!!


प्रसिध्दीविना,निर्मळ हसणे-हसवणे,हेच माझे ध्येय !

थकलो जरी शरीराने,तरी संगीत-योगा-हास्याची रुपेरी किनार आहे बाकी !!४!!


सुख-दुःखाचा आस्वाद घेत,जीवनाची बनली शिदोरी !

हसत-खेळत,जगण्याचा सुविचार,आहे अजून बाकी !!५!!


मावळत्या सूर्याला,हसत-हसत सामोरे जाणे हेच आहे खरे जगणे !

आयुष्याच्या उत्तरार्धात,अजूनही स्वप्ने आहेत बाकी !!६!!


Rate this content
Log in

More marathi poem from Vasant Brahmakar

Similar marathi poem from Inspirational