STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational

3  

Pandit Warade

Inspirational

विठुराया

विठुराया

1 min
202

उभा आहे तुझ्या दारी विठूराया

अशी का थांबली वारी विठूराया


मनाला दर्शनाची लागली आशा

कशी आली महामारी विठूराया


किती बेकार आहे हाल भक्तांचे

लबाडांची मजा भारी विठूराया


जरी मी सांगतो गोष्टी बढाईच्या

तुझी आहे कृपा सारी विठूराया


कसोटी जानकीची आजही होते

कधी संपेल लाचारी विठूराया?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational