STORYMIRROR

Vandana Deshpande

Tragedy

3  

Vandana Deshpande

Tragedy

विरह

विरह

1 min
304

असा दूर वाटे, मज जेंव्हा किनारा

तुझाच आठव मनाला मनाला...


क्षितिजा सम भासे, तुझा भास जेंव्हा

विरह तोचि दाटे क्षणाला क्षणाला...


किती दूर राहशी असा तू सख्या रे

पुन्हा दोष देसी अभागीपणाला...


नको शांत वाहू असा तू प्रवाही

कसे दुःख सांगू कुणाला कुणाला...


मज दाटू येता असा कंठ तोही

क्षण एक जाळी तनाला मनाला...


फिरुनी विशाला, वेध घे तू किनारा

नको अंत लावू पनाला पनाला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Vandana Deshpande

Similar marathi poem from Tragedy