घट रंगांचे
घट रंगांचे
1 min
41
कुणी ओतले निळ्या नभांगणी,
घट रंगांचे जणू असे.....
पिवळा-तांबूस, गर्द निळ्यावर
वस्त्र नेसला नभ जणू भासे...
सरता दिस अन उरता संध्या
लोभसवाणे रूप दिसें.....
कोणी मोहिनी अस्त्र फेकले
रंगांमधूनी काय कसे??? ....
मनडोहामधे उधळण होता
आनंद रंग जणू हेच जसे...
घट रंगाचा जसा पहुडला
सांज मनोहर रूप विलसे....
त्या मोहकतेचे बहुरूपी रूप हे
संग मनाला भावतसे......
सरता संध्या रंगाबरोबर त्या ....
भाव विभोर मन होतसे, ....