बळीराजा
बळीराजा
काळया मातीत सोन आम्ही पिकवतो!
त्याला भाव मातीचाच मिळतो!!
होत नव्हतं ते नेलं पावसानं अवकाळी!
आज बळीराजा वर आली आत्महत्या करायची पाळी!!
खत बी घेतलं होते कर्ज काढून!
आता कसं बळीराजाने जगायचे,
भाव देता हो तुम्ही मालाले आमच्या पडून!!
वाटलं होतं मिळेल मदत सरकारकडून!
पण नाही, बळीराजाले सगळेच घेतात ओरबाडून!!
पिकाच्या विम्याची भरली आहे रास!
पण खरचं मिळेल का विमा हा उरला फक्त भास!!
काळया मातीत सोन आम्ही पिकवतो!
त्याला भाव मातीचाच मिळतो!!
