विचार केला..
विचार केला..
खूप दिवसाचा हा अबोला
आज कुठेतरी थांबवावं
एकांतात जाऊन काही क्षण
विचार केला की तिला एकदातरी बोलावं..
मनातील माझ्या दुःख हे आज
तिच्या खांद्यावर थोडस ठेवावं
माझ्या डोळ्यातील अश्रू अलगत
नकळतपणे तिच्या पदराला मी पुसावं..
माझ्या डोळ्यात ओलावा असला जरी
तिच्यासमोर आज जाताना तरी
प्रेमाचा मुखवटा मी घालावं..
प्रवास होता हा काही पावलांचा
मैत्रीच्या दुराव्यात असे होतेच किती अंतर
तरीही मनात होता तिच्या विचाराचा गोंधळ..
विचाराचा गोंधळ शेवटी मनातच थांबवलं
तिच्या माझ्या नात्याला पुन्हा नव्यानं आठवलं
आठवून ते काही तुझ्यासोबतचे क्षण..
विचार केला आज मी नव्यानं पुन्हा
मैत्रीचं नात पूर्णतः संपण्याआधी
मनातील तिला सगळं काही सांगावं
विचार केला की तिला एकदातरी बोलावं....

