वेदना...
वेदना...
वेदनेचा आणि माझा
तसा काहीच संबंध नव्हता...
अगदी अनैतिकही नव्हता...
दुःखही मी
मजा म्हणून स्वीकारल होतं...
माझ्या सतत आनंदी राहण्याचं
रहस्य जगाला अजूनही
उलगडत नव्हत...
म्हणूनच की काय !
त्याला माझ्या निर्मळ
हसण्याचाही राग येतो...
माझ्या आयुष्यात मी
एकदाच खरा रडलो...
पण ते ही एकांतात...
तिला ! म्हणजे सध्या मी
जिच्या प्रेमात आहे
तिला वाटतं
माझं हृदय पाषाणाचं आहे...
कारण मी तिच्यावरील प्रेम
व्यक्त करत नाही...
माझ्या व्यक्त होणाची किंमत
ती चुकवू शकणार नाही
याची मला खात्री आहे
कारण ती एक राजकुमारी आहे
आणि मी उपाशी...ज्ञानाचा...
भविष्य मला
दोघांचेही माहीत आहे...दुर्दैवी...
हीच एक वेदना होती
जिने मला रडवलं एकांतात...
नाहीतर वेदनाही माझी दासी आहे...
